डॉ आंबेडकरांना “सेक्युलर” आणि “सोशॅलिस्ट” हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नको होते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मथळा वाचून आश्चर्य वाटून घेऊ नका. हे खुद्द डॉ आंबेडकरांनी, स्पष्टपणे, घटना समितीच्या चर्चांदरम्यान म्हटलं आहे!
सरसंघचालक, मोहन भागवत, ह्यांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सेक्युलर आणि समाजवादी/सोशलिस्ट हे शब्द कशाला हवेत हा प्रश्न विचारला होता. मजेशीर प्रश्न आहे हा. अर्थात, ह्या मागचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मूळ घटनेच्या प्रस्तावनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द नव्हते. आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करून घेऊन हे दोन्ही शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घातले गेले. डॉ आंबेडकर कृत घटनेच्या प्रस्तावनेतील हा एकमेव बदल होय. त्यामुळे मोहन भगवतांनी हा प्रश्न विचारणं “चूक” नाही. पण मजेशीर नक्कीच आहे.
भागवतांच्या विधानाचं दैनिक लोकमतचं वृत्त असं :
राज्यघटनेच्या प्रस्तावनेत घातले गेलेले ‘सोशलिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द कायम ठेवावेत का, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ते म्हणाले की, ‘सोशलिस्ट’ आणि ‘सेक्युलर’ हे शब्द आणीबाणीत राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडले गेले. त्यापूर्वी ते नव्हते. आज प्रत्येक जण सोशलिस्ट शब्द स्वत:च्या सोयीप्रमाणे वापरतो. त्याच्या मूळ अर्थाचे औचित्यच हरवले आहे. भारत सेक्युलर आहेच मग घटनेत त्याचा उल्लेख कशासाठी? राज्यघटना तयार झाली त्या वेळीही ही चर्चा झालीच होती. राज्यघटनेच्या पुनर्विचाराची लगेच आवश्यकता नसली तरी घटनेच्या प्रस्तावनेत सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द असावेत काय, असे प्रश्न लोक विचारतात, गांभीर्याने त्याचा विचार झाला पाहिजे.
वृत्त इथे क्लिक करून वाचू शकता : राज्यघटनेत ‘सोशलिस्ट’, ‘सेक्युलर’ हवे कशाला? : सरसंघचालक मोहन भागवत
आता हे विधान मजेशीर का आहे हे बघूया.
राज्यघटना प्रस्तावनेतील शब्दांवरून फक्त डिफाईन होते. अंमलबजावणी पुढील कलमानुसार होते. त्यामुळे सेक्युलर हा शब्द “घुसवण्याआधी” सुद्धा आपली राज्यघटना सेक्युलरच होती (थँक गॉड! आपल्या राज्यघटनेने सेक्युलर असणं हा घटनेच्या सर्वोत्तम गुणांपैकी एक आहे!) आणि आता सोशलिस्ट हा शब्द काढून टाकला तरी आपले कायदे, यंत्रणा, पॉलिसीज ह्या सोशलिस्टच असणार आहेत.
त्यामुळे शब्द घुसवल्याने किंवा काढून टाकल्याने फरक पडत नाही, पडणार नाही. म्हणूनच हे शब्द वगैरे वर ऊर्जा खर्च करणं मजेशीर आहे. पण – ह्या निमित्ताने सेक्युलर, सोशलिस्ट ह्या शब्दांची आणि मूल्यांची चिकित्सा झाली तर उत्तम होईल.
सेक्युरिझमचा अर्थ काय आहे? घटनेने सेक्युलर असावं ते “इहवादी” ह्या अर्थाने. तेच अपेक्षित आहे. पण आपल्याकडे सेक्युलरचा अर्थ “सर्वधर्मसमभाव” असा घेतला जातो. मग “टोपी नाकारली” म्हणून मोदी कम्युनल ठरतात आणि राहुल गांधी “मंदिरातही जातात अन मस्जिदीतही” म्हणून ते सेक्युलर आहेत अशी हास्यास्पद सर्कस होते.
घटनेच्या “सेक्युलर” असण्याचा “कुणाचेही फालतू लाड होणार नाहीत” हा अर्थ गळून पडून “सर्वांचे थोडे थोडे लाड होतील” असा अर्थ रूढ झालाय. हे करेक्शन व्हायला हवं.
समाजवादी मूल्य आज किती प्रॅक्टिकल आहेत, त्यांची अंमलबजावणी किती शक्य आहे, त्याने सर्वोदय साध्य होतोय का, नसेल तर कुठे अन कोणते बदल करावेत ह्यावर मंथन होणं आवश्यक आहे. “समता, सादगी, स्वावलंबन” ह्या समाजवादी मूल्यांमुळे अंत्योदय होऊ शकला आहे का हा प्रश्न विचारून गेल्या ७० वर्षांचा हिशेब मांडला पाहिजे. हे गणित जुळत नसेल तर समता, सादगी, स्वावलंबन सोडून “स्वातंत्र्य समृद्धी सर्वोदय” हा उजवा मार्ग अवलंबून बघितला पाहिजे. किमान ह्या पर्यायाची अभिनिवेश रहित चर्चा झाली पाहिजे.
सेक्युलारीझम असो वा समाजवाद – आता हे मंथन घडून यायला हवं.
—
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्वपूर्ण घटना
- बाबासाहेबांची वैचारिक स्मारके – संविधानापासून शेतीतंत्रज्ञानापर्यंत
—
ज्यांना “मोकळ्या वातावरणात वैचारिक घुसळण घडत रहाणं आवश्यक आहे” हे पटतं, त्यांना ही चर्चा मनापासून आवडेल आणि ते त्यात भाग घेत रहातील असा विश्वास वाटतो. अशी चर्चा घडून येणं आजची गरज आहेच.
परंतु ही गरज फार फार पूर्वी खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती – हे आवर्जून नमूद करायला हवं आणि समजूनही घ्यायला हवं!
घटनेच्या मसुदा समितीच्यावेळी preamble मध्ये हे दोन्ही शब्द यावेत का, ह्यावर बरीच चर्चा झाली होती. त्या चर्चांदरम्यान डॉ आंबेडकरांनी “सेक्युलर” हा शब्द अनावश्यक आहे आणि “सोशालिस्ट” हा भविष्याच्या दृष्टीने चूक ठरू शकेल – असं मत मांडलं होतं.
सेक्युलर बद्दल डॉ आंबेडकर म्हणतात की संपूर्ण राज्यघटनाच धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर उभी आहे. कुठल्याही व्यक्तीला तिच्या जात-धर्मावरून वेगळी वर्तवणूक न मिळणे हा आपल्या राज्यघटनेचा पायाच आहे. त्यामुळे त्या शब्दाची गरज नाही.
सेक्युलर बद्दल फक्त “गरज नाही” म्हणणारे डॉक्टर आंबेडकर, सोशलिस्ट बद्दल मात्र ठाम विरोधक होते आणि त्या विरोधामागचा तर्क अतिशय उत्तम होता. त्यांचं म्हणणं होतं की आपला समाज “कोणत्या प्रकारच्या” यंत्रणेत रहावा ह्याचं बंधन घालून ठेवणं हे लोकशाही तत्वाच्याच मुळावर येणारं आहे!
बाबासाहेब म्हणतात –
It is perfectly possible today, for the majority people to hold that the socialist organisation of society is better than the capitalist organisation of society. But it would be perfectly possible for thinking people to devise some other form of social organisation which might be better than the socialist organisation of today or of tomorrow. I do not see therefore why the Constitution should tie down the people to live in a particular form and not leave it to the people themselves to decide it for themselves.
अर्थात –
वर्तमानात, बहुतांश लोकांना असं वाटणं अगदी शक्य आहे की समाजवादी व्यवस्थेमध्ये रहाणं हे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये रहाण्यापेक्षा चांगलं आहे. पण हे ही अगदीच शक्य आहे की भविष्यात विचारी लोक एखादी दुसरी व्यवस्था तयार करतील जी आजच्या किंवा भविष्यातील समाजवादी व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली असेल. म्हणून, मला आपल्या राज्यघटनेने लोकांवर एकाच व्यवस्थेमध्ये जगण्याचं बंधन घालणं आणि त्यांना त्यांचा निर्णय घेऊ देण्यापासून थांबवणं योग्य वाटत नाही.
हे व्हिजन होतं ह्या महामानवाचं!
म्हणूनच, सेक्युलर ह्या शब्दावर आक्षेप घेणं किंवा त्या शब्दाला काढून टाकण्याकडे ऊर्जा केंद्रित केल्यापेक्षा सेक्युलॅरिझमचा खरा अर्थ अमलात येण्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, आज समाजवादी व्यवस्था बदलून, वेगळा विचार करणारी यंत्रणा उभी करायला हवी का ह्यावरही मंथन होणं गरजेचं आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.