स्वप्नातील कालव्यांचे गाव : गिएथूर्न
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
गिएथूर्न हे नेदरलंड येथील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. याला ‘दक्षिण चे वेनिस’ किंवा ‘नेदरलंड चा वेनिस’ देखील म्हणतात. येथे वर्षभर पर्यटकांची रीघ लागलेली असते. कारण हे एक स्वप्नातील गाव आहे, एक असं गाव ज्याचा विचार आपण केवळ स्वप्नातच करू शकतो, एक असं गाव जिथली सौंदर्य बघून आपल्याला तिथेच राहण्याची इच्छा होते.
या गावाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे पूर्ण गाव कालव्यांनी वेढलेलं आहे. या गावात एक पण गाडी किंवा बाईक नाही कारण ते चालवायला येथे रस्तेच नाही. इथे जर कुणाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे असेल तर ते नावेने प्रवास करतात. इथल्या कालव्यांत इलेक्ट्रिक मोटार नी नाव चालते, कुठेही येण्या-जाण्यासाठी यांचाच वापर केल्या जातो. या नावेचा आवाज कमी येतो आणि लोकांना यामुळे त्रास देखील नाही होत. तर काही ठिकाणी एका जागेहून दुसऱ्या गाजेवर जाण्याकरिता कालव्यांवर लाकडी पूल बनविण्यात आले आहेत.
आता हे गाव जलमय झाल कस, तर ११७० मध्ये आलेल्या भयावह पुराने या गावात एवढ पाणी साचल. पण या गावाची स्थापना १२३० साली झाली. जेव्हा लोक येथे राहायला आली तेव्हा त्यांना येथे जंगली बकरींची शिंगे आढळून आली. जे संभवतः ११७० च्या पुरात वाहून आलेल्या बक्रींची असेल. त्यामुळे सुरवातीला या गावाचे नाव ‘गेटनहॉर्न’ (Geytenhorn) आलं. याच अर्थ होतो ‘बकरींची शिंग’, नंतर या गावच नाव बदलून गिएथूर्न (Giethroon) ठेवण्यात आले.
एवढचं नाही तर या गावातील या कालव्यांची निर्मितीही accidently झाली होती. जेव्हा लोक येथे राहण्यास आली तेव्हा त्यांना दिसले की, ११७०च्य पुरामुळे येथे प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते, या खड्ड्यांच्या एका बाजूला दलदलची माती आणि वनस्पती असतात. यांचा वापर इंधन स्वरुपात केला जाऊ शकतो, म्हणून त्या लोकांनी येथे खोदायला सुरवात केली. खोदल्यामुळे काही वर्षांत या खड्ड्यांचे रुपांतर कालव्यात झाले. तेव्हा कदाचित कोणी विचार देखील नसेल केलेला की या खड्ड्यामुळे निर्माण झालेल्या कालव्यांमुळे ही जागा एक सुंदर असं पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल.
या गावात एकूण ७.५ किलोमीटर लांब कालवे आहेत.
१९५८ साली बर्ट हांस्त्राच्या डच कॉमेडी फिल्म फेनफेयर (Fanfare) ची शुटींग येथे झाली होती त्यामुळे गिएथूर्न हे गाव आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले.
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.