बॉडी कमवायचीये? फिट व्हायचंय? फक्त प्रोटीनवर अवलंबून राहू नका!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जिम लावून बॉडी बिल्डिंग करणं ही हल्लीच्या तरुणाईची आवड झाली आहे. एकदा जिम लावली, की प्रोटीन शेक, अंडी, प्रोटीन रिच डाएट अशा गोष्टी अगदी ओघाने येतात. ‘मसल्स वाढवायचे म्हणजे प्रोटीन शिवाय पर्याय नाही’ हे प्रत्येकाच्या मनावर अगदी ठासून बिंबवलेलं असतं.
यात तथ्य आहेच, कारण मसल्सच्या वाढीसाठी प्रोटीनची गरज असते. मात्र केवळ प्रोटिन्स खाऊनच मसल्स वाढतात असं जर तुम्ही समजत असाल, तर थोडं थांबा. याविषयी तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे, तेही जाणून घ्या. म्हणजे इथून पुढे मसल्स वाढीसाठी फक्त प्रोटीनवर अवलंबून राहायचं की नाही, हे ठरवणं सोपं जाईल.
मसल्स वाढवायचे असतील तर…
मसल्स वाढवण्यासाठी योग्य वर्कआऊट करणं गरजेचं असतं. या वर्कआऊटला साजेसं डाएट असेल, तरच, मसल्सची नीट आणि उत्तम वाढ होऊ शकते. वर्कआऊटच्या बरोबरीने कॅलरीज आणि इतर पोषक द्रव्य योग्य मात्रेत खाणं आवश्यक असतं. मसल्सच्या वाढीसाठी प्रोटीनसह हीदेखील पोषकद्रव्य आवश्यक असतात.
१. कार्बोहायड्रेट
कुठल्याही बॉडी बिल्डरला विचाराल, तर कार्ब्स म्हणजेच कर्बोदकं शरीरासाठी चांगली नसतात असंच उत्तर तुम्हाला मिळेल. मात्र हे पूर्णपणे सत्य नाही. गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्स मसल्सच्या वाढीसाठी चांगली नसतात, मात्र धान्य, कडधान्य, भाज्या, फळं, अशा पदार्थांमधून मिळणारी कर्बोदकं मसल्सच्या वाढीसाठी पूरक ठरतात.
२. फॅट्स
कार्ब्सच्या बरोबरीने फॅट्स हादेखील असाच एक दुर्लक्षित घटक आहे. फॅट्समुळे वजन वाढतं ही बाब असत्य नसली, तरीही फॅट्सची शरीराला आणि विशेषतः मसल्स ना गरज नसते हा फार मोठा गैरसमज आहे. चांगल्या प्रकारचे फॅट्स योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट असणं आवशयक असतं. मसल सेल्सच्या वाढीसाठी फॅटी ऍसिड्सची सुद्धा गरज असते, जी दुर्लक्षित करून चालणार नाही.
३. कॅल्शियम
कॅल्शियमचा आहारात समावेश असणं हार्ट रेट नियंत्रित राहण्यासाठी गरजेचं असतं. हार्ट हा मसल्सचा असा समूह आहे, जो रक्तप्रवाह नीट राखण्याचं काम करत असतो.
प्रोटीनसह या इतर पोषक द्रव्यांची सुद्धा मसल्सच्या वाढीसाठी आवश्यकता असते. त्यामुळे प्रोटीन हा एकमेव घटक मसल्स वाढीसाठी फायदेशीर आहे, हा गैरसमज दूर होणं गरजेचं आहे.
हे गैरसमज नाहीत ना?
केवळ प्रोटिन्स मसल्स वाढीसाठी फायदेशीर असतात, हा गैरसमज तर आता दूर झाला असेल. मात्र प्रोटीन विषयी आणखीही काही गैरसमज असतात. चला तेही जाणून घेऊयात.
१. प्रोटीनच्या बरोबरीने
प्रोटीनमधील अमिनो ऍसिडस् मसल्सची पुनर्बांधणी करण्यात महत्त्वाचा वाटा उचलतात. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर पदार्थांची आवश्यकता असते. मसल मास आणि ताकद वाढवण्यासाठी फक्त प्रोटीन खात राहणं आरोग्यासाठी चांगलं नसतं.
२. पाणी सोडून सगळ्यात प्रोटीन असतं
प्रोटीनचा उत्तम स्रोत म्हणून काही पदार्थांची यादी बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येते. मात्र फक्त त्याच पदार्थांमध्ये प्रोटीन असतं असं जर तुम्ही समजत असाल, तर तो तुमचा गैरसमज आहे. पाणी आणि सोड्याव्यतिरिक्त प्रत्येक पदार्थात काही प्रमाणात प्रोटीन असतं.या प्रोटीनच्या बरोबरीने आवश्यक असणारी अमिनो ऍसिड्स मात्र प्रत्येक पदार्थातून मिळत नाहीत.
३. जास्त प्रोटीन खाणं चांगलं
प्रोटीन शरीराच्या आणि विशेषतः मसल्सच्या वाढीसाठी महत्त्वाचे असले, तरीही जास्तीत जास्त प्रोटीनचा आहारात समावेश असणं हा एक गैरसमज आहे. साधारणपणे तुमचं वजन जेवढं असेल, तेवढे ग्रॅम प्रोटीन रोजच्या आहारात असणं पुरेसं असतं. त्याहून अधिक प्रोटीन खाणं हे बैठी किंवा साधारण जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींसाठी आजाराला निमंत्रण ठरू शकतं.
–
वाढतं वजन, डाएटविषयी बॉलिवूड स्टार्सनी तोडलेले अकलेचे तारे पाहून तुम्ही पोट धरून हसाल!
स्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…
–
४. वर्कआऊट झाल्यावर लगेच प्रोटीन खायला हवं
वर्कआऊट करून झालं की लगेच प्रोटीन शेक घेणारी अनेक मंडळी तुम्ही आजूबाजूला पाहिली असतील. जिममधील ट्रेनर सुद्धा असा सल्ला देतो. मात्र वर्कआऊट झाल्यावर लगेचंच प्रोटीन खायला हवं, अशी आवश्यकता नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. नेहमीच्या आहारात, त्या-त्या वेळी योग्य प्रमाणात प्रोटीन खात असल्यास मसल्सची वाढ होण्यास आपोआपच मदत होते.
५. तुम्ही दमला आहेत म्हणजे…
सतत थकवा येणं हे तुमच्याकडे प्रोटीनची कमतरता आहे, हे स्पष्ट करतं यात काहीच शंका नाही. मात्र प्रोटीनची ही कमतरता सातत्याने निर्माण झालेली असते. एखाद-दोन जेवणांमध्ये प्रोटीनचा कमी खाल्लं तर त्यामुळे हा असा थकवा येतं नाही.
६. प्रोटीन जास्त खाल्लं तर वजन नियंत्रणात राहतं
प्रोटीन अधिक खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते. कारण तुम्हाला हवी असणाऱ्या कॅलरीजची गरज प्रोटीन पूर्ण करत असतं. मात्र हे होण्यासाठी कार्ब्समधून मिळणाऱ्या कॅलरीज कमी होणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. केवळ प्रोटीनचा आहारात अधिक समावेश केला, तर ते अपायकारक आणि वजन वाढण्यास कारणीभूत होऊ शकतं.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.