एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही ५ खरी कारणं राजकीय भूकंपाला कारणीभूत?…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
”गद्दारांना क्षमा नाही” ही धर्मवीर आनंद दिघे यांची ताकीद आठवत असेल तर त्यामागील कारणही तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. श्रीधर खोपकर हा ठाण्यातील नगरसेवक फुटल्याने शिवसेनेला निवडणूकीत हार पत्करावी लागली अशी चर्चा सुरु झाली आणि मग ठाण्यात सुडाचं राजकारण पेटलं.
फोडाफोडीचं असंच काहीसं राजकारण सध्या महाराष्ट्रात धुमसतंय. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे महत्वाचे आमदार फुटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असली तरी भुकंपाचा खरा हाजरा बसला तो एकनाश शिंदे या नावामुळे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
उद्धव ठाकरेंनंतर शिवसेनेतील एक प्रमुख नाव म्हणजे एकनाथ शिंदे. दिघेंचा वारसा सांभाळणारे, बाळासाहेबांच्या मर्जीतील, शिवसेनेच्या जडणघडणीपासून सोबत असलेले एकनाथ शिंदे फुटणार? मग शिवसेनेचं काय होणार? एवढ्या महत्वाच्या प्रसंगी एकनाथ शिंदेंनी ‘नॉट रिचेबल” राहण्याचा पवित्रा नेमका का घेतला? अशा अनेक प्रश्नांची वादळं सध्या घोंघावतायत.
एकनाथ शिंदेंचा अधिकृत निर्णय अद्याप समोर आला नसला तरी ही नाराजी काही आजची नाही. यापुर्वीच्या अनेक घटनांमधूनही शिंदेंची नाराजी समोर आली होती. पण तेव्हा याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही.
जाणून घेऊयात एकनाथ शिंदेच्या नाराजीमागील संभाव्य कारणांची यादी…
१. वरिष्ठ म्हणून मान नाही…
वय, अनुभव, राजकारणाची समज या सर्वार्थाने एकनाथ शिंदे हे वरिष्ठ नेते आहेत. शिवसेनेत त्यांना त्यानुसार मानही दिला जातो. मात्र असं असलं तरी प्रत्यक्ष निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मात्र डावललं गेल्याची खंत यापुर्वीही शिंदे यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.
राज्यसभा, विधानसभा या निवडणूकीच्या रणनिती प्रक्रियेतही शिंदे यांचा फारसा सहभाग नव्हता. अशावेळी पक्षातील अनुभवी नेत्याला डावललं जाणं हे शिंदेंच्या जिव्हारी लागल्याची चर्चा सध्या रंगता दिसत आहे.
२. मुख्यमंत्रीपद हुकलं
महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि सत्ता हाती मळाली. त्यानंतर ”मुख्यमंत्री शिवसेनेचाच” अशी घोषणा दिल्यानंतर हे पद कुणाला मिळणार यावर चर्चा सुरु झाली.
अनुभवाच्या योग्यतेनुसार मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदेंच्या गळ्यात पडणार यावर जवळपास एकमत झालं होतं. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद, राष्ट्रवादी कॉंग्रेसची या निर्णयाला नसलेली मंजुरी या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना सत्ता राखण्यासाठी सर्वांचं मन जपणं गरजेचं होतं. पर्यायाने अखेर बहुमताने उद्धव ठाकरेंनी हे पद स्विकारलं.
या परिस्थितीत सत्ता मिळाली, मात्र शिंदेंच्या समर्थकांमध्ये तेव्हापासून जी आग धुमसत राहिली त्याचाच हा स्फोट म्हणावा लागेल.
३. राष्ट्रवादीचं वाढतं महत्व
त्रिशंकु सरकार आलं खरं मात्र त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचीच जवळीक वाढत गेली. परिणामी प्रत्येक निर्णयात राष्ट्रवादीचा मुद्दा आधी विचारात घेतला जाऊ लागला.
एकंदरित सत्तेच्या किल्ल्या आपल्या हातात राखणाऱ्या शरद पवारांमुळे शिवसेनेतील अनेक नेते नाराज होत गेले, त्यातील मुख्य नाव म्हणजे एकनाथ शिंदे! शिंदे समर्थकांनी वेळोवेळी ही बाब जाहीरही केली, मात्र त्याची फारशी दखल घेतली गेली नाही असाही सूर सध्या ऐकू येत आहे.
—
- एकनाथ शिंदे: कोणत्याही पार्श्वभूमी विना राजकीय स्थान भक्कम करणारा ठाण्याचा वाघ
- मविआ सरकार पडण्याची शक्यता किती : समजून घ्या सरकार नेमकं कसं कोसळतं
—
४. शब्दाला किंमत नाही
राज्यसभेच्या पराभवाच्या कारणांबाबत बरीच चर्चा झाली. खरंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या रणनितीनुसार ही निवडणूक लढवली गेली होती. मात्र त्यातील चुकांमुळे हा पराभव पत्करावा लागला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी या पराभवाच्या कारणांबाबत सुचना, मार्गदर्शन करण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्यांचं म्हणणं फारसं विचारात घेतलं गेलं नाही, असा आरोपही झाला होता.
५. महत्वाच्या जबाबदाऱ्यांपासून वंचित
उद्धव ठाकरेंचं आजारपण, त्याकाळी सत्तेतील अस्थिरता, विरोधकांच्या टिका या काळात शिवसेनेतील जाणत्या नेत्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या देणे अपेक्षित होते, किंबहूना एकनाश शिंदे यांनाही हीच अपेक्षा असावी.
प्रत्यक्षात संजय राऊत यांनीच बरीचशी सुत्र आपल्या हाती घेत प्रतार परिषदांचा सपाटा लावला होता. सरकारचे धोरण, निर्णय, विरोधकांना खडेबोल या सर्वांची जबाबदारी संजय राऊतांनी स्विकारली, मात्र या काळातही एकनाथ शिंदेंना हा मान दिला गेला नसल्याने शिंदे समर्थक अस्वस्थ होते.
अर्थात ही सर्व संभाव्य कारणं असून भूकंपाच्या मुळाशी नेमकं काय खदखदतंय? त्याचा उद्रेक आणखी होणार का? ही वादळापुर्वीची शांतता आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल.
एकनाथ शिंदेंसह आणखी किती आमदार पाठ फिरवणार? याचा परिमाम सरकारवर होणार का? एकनाथ शिंदेंसारख्या जुन्याजाणत्या नेत्याचा हा तडकाफडकी घेतला गेलेला निर्णय राजकारणात दिर्घकालीन ठसा उमटवणार हे नक्की…
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.