जावेद अख्तर म्हणाले “सिनेमा फ्लॉप होईल”, पण लगान आणि स्वदेसने इतिहास रचला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय सिनेमाचा अभ्यास केला तर त्याचे २ भाग प्रामुख्याने पडतात एक म्हणजे लगानच्या आधीचा भारतीय सिनेमा आणि लगान नंतरचा भारतीय सिनेमा. लगानने जो इतिहास रचला सर्वश्रुत आहे.
लगानने चित्रपटसृष्टीला आशुतोष गोवारीकरसारखा दिग्दर्शक दिला. ब्रिटिश कलाकारांना भारतीय चित्रपटात काम करायला भाग पाडणारा लगान हा पहिला चित्रपट. आजवरच्या सिनेमातले ब्रिटिश आणि लगानच्या सिनेमातले ब्रिटिश यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता.
याबरोबरच सिंक साऊंडच्या मदतीने हा चित्रपट शूट केला गेला, चित्रपटासाठी लागणारं ते छोटं गाव वेगळं उभं केलं गेलं, सगळ्यांनी यासाठी अपार कष्ट घेतले अशा कित्येक गोष्टी आपण ऐकून आहोत.
एकूणच लगान हा भारतीय चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड का ठरला हे आपण सगळेच जाणतो, पण तुम्हाला माहितीये का की या सिनेमासाठी गाणी लिहिणाऱ्या जावेद अख्तर यांनी हा सिनेमा फ्लॉप होईल अशी भविष्यवाणी केली होती.
आशुतोष गोवारीकर यांनी एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. जेव्हा आशुतोष गोवारीकर लगानची कथा घेऊन जावेद अख्तर यांच्याकडे गेले आणि या सिनेमासाठी गाणी लिहिण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली तेव्हा आधी तर त्यांनी गोवारीकर यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं.
सगळं ऐकून घेतल्यावर जावेद साहेब यांनी आशुतोष यांना त्यांच्या सिनेमाच्या कथेतल्या काही मोठ्या चुका दर्शवून दिल्या. कोणत्याही पात्राला धोतर घातलेलं दाखवू नका, क्रिकेटवर सिनेमा बनवू नका, स्थानिक भाषेत सिनेमा बनवू नका अशा सूचना देत त्यांनी आशुतोष यांना हा प्रोजेक्ट रद्द करण्याचा सल्ला दिला.
आशुतोष यांनीसुद्धा जावेद अख्तर यांच्या अनुभवाचा आदर करत त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं पण आशुतोष यांच्या डोक्यात सिनेमाची पूर्ण ब्लुप्रिंट तयार होती आणि त्यांनीसुद्धा अगदी नम्रपणे जावेद अख्तर यांना सांगितलं की “फिल्म ही अशीच तयार होईल!”
जावेद अख्तर यांनी तेव्हा आशुतोष यांना होकार दिला पण आशुतोष तिथून गेल्यानंतर त्यांनी सिनेमाचा निर्माता, अभिनेता आमीर खान आणि त्याची पहिली बायको रिना यांना त्यांच्या घरी बोलावून घेतलं आणि “तुम्ही या सिनेमाची निर्मिती करू नका, हा सिनेमा चालणार नाही” असं सांगत त्यांना समजावायचा प्रयत्न केला.
सुदैवाने आमीरचा आशुतोषवर पूर्ण विश्वास होता आणि आमीरसुद्धा त्याच्या टिपिकल इमेजपेक्षा काहीतरी हटके करण्याच्या तयारीत असल्याने त्याने जावेद अख्तर यांचा गैरसमज दूर केला.
जावेद अख्तर यांनी अप्रतिम गाणी लिहिली, त्यांना लाजवाब चाली देऊन रेहमाननी ती गाणी तयार केली आणि लगानने इतिहास रचला. लगान हीट झाला, बॉक्स ऑफिसची गणितं बदलली, मोठमोठ्या निर्मात्यांनी बोटं तोंडात घातली, पण या सगळ्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती लगानच्या गाण्यांनी.
जावेद अख्तर यांची भविष्यवाणी खोटी ठरली आणि त्याचा त्यांना आनंददेखील झाला ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं. अशीच भविष्यवाणी जावेद साहेब यांनी आशुतोषच्या पुढील सिनेमाच्या बाबतीतसुद्धा केली, जेव्हा आशुतोष स्वदेस चित्रपटासाठी त्यांना विचारणा करायला गेला.
तेव्हासुद्धा जावेद अख्तर यांनी आशुतोष यांना हा सिनेमा न करण्याचा सल्ला दिला, पण तरी आशुतोषने सिनेमा केला, जावेद अख्तर यांनी गाणी लिहिली, पुन्हा रेहमानने ती गाणी संगीतबद्ध केली आणि स्वदेसनेसुद्धा इतिहास रचला.
लगानएवढं यश स्वदेसच्या नशिबी नव्हतं पण तरी आज स्वदेसला कल्ट क्लासिक सिनेमाचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि त्यामागेसुद्धा जावेद अख्तर यांचीच भविष्यवाणीच कारणीभूत ठरली. जोधा अकबरच्या बाबतीतसुद्धा असाच काहीसा अनुभव आशुतोष यांना आला!
जावेद साहेब यांची भविष्यवाणी त्याच्या “खेले हम जी जान से” या सिनेमाच्या बाबतीत मात्र खोटी ठरली नाही असं आशुतोषने या मुलाखतीत मजा मस्करीत सांगितलं.
—
- आमिर खानने दिला होता ‘लगान’ साठी नकार, वाचा ‘लगान’च्या निर्मितीची कथा
- भारतीय चित्रपटांना नवी दिशा देणारा असामान्य दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर
—
त्याच्या या सिनेमाची कथा जावेद अख्तर यांना खूप आवडली आणि त्यांना हा चित्रपट हीट होईल अशी शक्यता वर्तवली खरी, पण प्रत्यक्षात मात्र तो सिनेमा इतका पडला की कधी आला आणि कधी लोकांना काहीच समजलं नाही, काहींना तर या नावाचा सिनेमा होता हेदेखील माहीत नाही.
आशुतोष गोवारीकर यांच्या नवीन आलेल्या मोहेंजो दारो, आणि पानिपत या सिनेमांनी काही खास कमाल दाखवली नाही.
आशुतोष यांनी पुन्हा एकदा वेगळं कथानक घेऊन जावेद अख्तर यांच्याकडे घेऊन जायला हवं आणि जावेद अख्तर यांनी पुन्हा “असा सिनेमा बनवू नका” अशी भविष्यवाणी करायला हवी असं आपल्यासारख्या कित्येक सिनेरसिकांना वाटत असेल नाही का?
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.