दिलीप कुमारचा तो सल्ला गोविंदाने ऐकला आणि कॉमेडी सिनेमांचा काळ सुरु झाला
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
विरार का छोकरा म्हणून प्रसिद्ध असलेला गोविंदा , बॉलीवूडमध्ये ची ची नावाने ओळखला जातो. त्याच्या करीअरच्या सुरुवातीच्या काळात एकदम लव्हर बॉय भूमिका असलेले इल्जाम, तन बदन, लव्ह ८६ असे चित्रपट त्याने केले. आणि काही काळानंतर एकदम तो विनोदी भूमिका करू लागला.
तुम्हाला कल्पना आहे का त्याला ट्रॅक चेंज करायचा सल्ला कुणीतरी दिला आणि त्यानेही तो ऐकला आणि तो कित्ती लोकप्रिय झाला बघा.. कोण होतं असं वेगळा आणि बरोबर सल्ला देणारं? ज्यानं गोविंदाची इमेजच बदलून गेली. साधासुधा गोविंदा एकदम लोकप्रिय झाला?
आयुष्यात कधी कधी अचानक असे काही वळण येते की आयुष्य पार बदलून जाते. साधीभादी माणसे एकदम चमकून उठतात. कुणीतरी तो रस्ता दाखवतात आणि या माणसाचं आयुष्य उजळून जातं. अशीच गोविंदाची कहाणी.
२१ डिसेंबर १९६३ रोजी अरुणकुमार आहुजा आणि गायिका निर्मलादेवी यांना झालेला मुलगा म्हणजे गोविंदा. केवळ १५ वर्षाचं फिल्मी करीअर असलेले अरुणकुमार अहुजा त्यांनी एक सिनेमा काढला आणि तो सिनेमा पडला.
आहुजा कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आलं. कार्टर रोड वरील बंगल्यातून हे सारे विरारमध्ये राहायला आले. तिथेच गोविंदाचा जन्म झाला. गोविंदा हे त्यांचे ६ वे अपत्य. त्याला लाडाने ची ची म्हणत. याचा अर्थच पंजाबीमध्ये छोटे बोट. कारण गोविंदा सगळ्यात धाकटा होता.
बी.कॉम.ची पदवी मिळवल्यानंतर त्याने सिनेमात करीअर करायचा निर्णय घेतला. घरात वातावरण त्याला पोषकच होतं. त्याच्या वयाला अनुसरून त्याचे पहिले काही चित्रपट प्रेमकथांचे होते.
लव्ह ८६,इल्जाम, इत्यादी. मग नंतर त्याने काही कौटुंबिक चित्रपट केले. हत्त्या हा क्राईम थ्रिलर सिनेमा केला. अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्यासोबत हम हा सिनेमा पण हिट झाला. दिव्या भारती त्याची नायिका असलेला शोला और शबनम पण चांगलाच गाजला. मग काही अॅक्शनपट केले. आणि अचानक गोविंदा चक्क कॉमेडी करू लागला.
डेव्हीड धवन बरोबर आँखे हा धमाल कॉमेडी चित्रपट केला. आज ही त्यातील ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता हे गाणे तितकेच आवडीने ऐकतात लोक. मग डेव्हीड धवन सोबत त्याचे भट्टी जमली आणि त्याच्या कॉमेडी चित्रपटांची रांगच लागली. परफेक्ट टायमिंग, देहबोली, आणि गंभीरपणे केला जाणार विनोद हे प्रेक्षकांना हास्यकल्लोळात बुडवायला पुरेसे असते. आणि हे सारे गोविंदा इतका सहजावारी करतो की त्या भूमिकेसाठी फक्त तोच न्याय देतो असे वाटते.
त्याचे त्यावेळी लोकप्रिय झालेले चित्रपट होते, राजाबाबू, कुली नं.१, साजन चले ससुराल, बनारसी बाबू,दिवाना मस्ताना, हिरो नं.१, बडे मियां छोटे मियां,हसीना मान जायेगी. सलग असे विनोदी चित्रपट द्यायचा निर्णय कसा काय घेतला गोविंदाने? त्याला तर नंतर नंतर हिंदीतला दादा कोंडके म्हणू लागले लोक पण तरीही त्याने विनोदी भूमिका करणे सोडले नाही.
असं अचानक गोविंदाने ट्रॅक कसा बदलला? गोविंदा सांगतो त्याला विनोदी चित्रपट करायचा सल्ला दस्तुरखुद्द दिलीपकुमार यांनी दिला होता.
नुकतेच दिलीपकुमार यांचे निधन झाले. दिलीपकुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार. अमिताभ बच्चन पासून शाहरुख खान पर्यंत सगळे कलाकार त्यांची कॉपी करतात असं अभिमानाने सांगतात. त्या दिलीपकुमार यांना ट्रॅजिडी किंग म्हणून ओळखले जाते. त्यांनी गोविंदाला सल्ला दिला तू आता विनोदी भूमिका कर. गंभीर भूमिका खूप केला आहेस, त्यावेळी गोविंदाने ७५ चित्रपट साईन केले होते.
जेव्हा दिलीपकुमार यांना हे समजले तेव्हा त्यांनी गोविंदाला सांगितले हे चित्रपट तू करू नकोस.मग त्यांचा सल्ला मानून गोविंदाने त्यातील २५ चित्रपट सोडायचा निर्णय घेतला. पुढचा मोठा प्रश्न होता तो म्हणजे पैशाचा. दिलीपकुमारनी त्याला सांगितलंहे बघ, देवाच्या मनात असेल तर तू पुन्हा पैसा मिळवू शकशील. पण तू हे करू नकोस.
गोविंदाला इतके सगळे चित्रपट हातात असल्यामुळे एका दिवसात तीन चार शिफ्ट मध्ये शूटिंग करावं लागत होतं. त्याचा परिणाम अर्थातच त्याच्या तब्येतीवर झाला होताच. अतिश्रमाने तब्येत बिघडत होती. दवाखान्यात वारंवार जावे लागत होते. १६ दिवस तो झोपला नव्हता.
त्या सिनेमाच्या निर्मात्यांकडून घेतलेली साइनिंग अमाऊंट त्याने बऱ्यापैकी खर्च करून टाकली होती. मग गोविंदाने मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन त्या त्या निर्मात्यांना परत केले आणि त्यांना कळवले की तो त्या सिनेमात काम करू शकणार नाही. त्याच्या या निर्णयावर खूप जणांनी त्याला पुन्हा एकदा विचार कर असे सांगितले.
अनेकांनी त्याला, ‘तू घेतलेला हा निर्णय आंधळेपणाने घेतला आहेस. हा व्यावसायिक दृष्टीकोन नाही. उद्या तुला कुणीही येऊन काहीही सांगेल आणि तू ऐकशील का? असेही विचारले’. पण गोविंदा आपल्या जागी ठाम होता. तेव्हा तो असं म्हणाल की तो सल्ला देणारा माणूस ‘ ज्याला लोक अभिनयाचा बादशहा मानायचे, त्याने उगीच सांगितलं असेल का?
–
शांतारामबापू म्हणाले, “तिच्यासोबत अभिनय करायचा नसेल तर चित्रपट सोडून निघून जा.”
रजनीकांतने नाकारलेली ही भूमिका केवळ ‘नाना’मुळे अजरामर झाली!
–
दिलीप साब हे लोकांसाठी दैवत होतं, आणि त्यांनी दिला होता. दिलीप साब स्वत: ट्रॅजिडी किंग होते. त्यांना पण माहिती असेलच ना, लोकांना रडवणं खूप सोपं असतं, तुलनेनं हसवणं अतिशय कठीण.
गोविंदा पुढे असंही म्हणाला की, त्यांनी हे सांगितलं आहे म्हणजे त्यांना माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी स्पार्क दिसला असेलच ना? गोविंदाने तो सल्ला मनावर घेतला आणि खरोखर ते चित्रपट सोडले आणि गोविंदाला त्या निर्णयासाठी जराही पश्चाताप करायची वेळ आली नाही.
त्याने विनोदी चित्रपटांची लाट आणली. हद कर दी आपने, जिस देश मे गंगा रहता है, पार्टनर, भागमभाग हे निखळ मनोरंजन करणारे चित्रपट. कधीही आणि कुठूनही बघायला सुरु करा खळखळून हसवतात की नाही? १४ वर्षे गोविंदाच्या करिअरचा आलेख चढता राहिला. रसिकांचे त्याला खूप प्रेम मिळाले.
गोविंदा आपल्या त्या निर्णयावर खुश आहे. बाकी यश अपयश चढ उतार हा आयुष्याचा एक भागच आहे. तो प्रत्येकाला अपरिहार्य आहे. पण दिलीपकुमार यांनी दिलेल्या त्या एका सल्ल्यामुळे आज आपल्याला गोविंदाची भन्नाट कॉमेडी अनुभवता येते आहे. टर्निंग पॉईंट असाच कुणाच्या तरी रुपात येतो आणि आयुष्याला कलाटणी देऊन जातो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.