' सुरक्षित भारत सोडून धार्मिक कट्टर असणाऱ्या आखाती देशांत जाण्याची वेळ आपल्या लोकांवर का आली? – InMarathi

सुरक्षित भारत सोडून धार्मिक कट्टर असणाऱ्या आखाती देशांत जाण्याची वेळ आपल्या लोकांवर का आली?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तब्बल १५० वर्ष भारतीयांनी नेटाने इंग्रजांशी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या स्वातंत्र्यसंग्रामात अनेकजण धारातीर्थी पडले. काहींनी तुरुंगवास भोगला. देशाला स्वातंत्र्य मिळालं खरं मात्र अनेक प्रश्न देशासमोर होते ते म्हणजे गरिबी, शिक्षणाची कमतरता आणि बेरोजगारी.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खरं तर देश चाचपडतं होता, सरकारी नोकऱ्या सोडल्या तर देशात आद्योगिक क्षेत्रात फारशी प्रगती झाली नव्हती. लोक आपले पारंपरिक व्यवसायच पुढे नेत होते. अशातच ७० च्या दशकात आखाती देशांमध्ये तेल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आणि तिथं काम करण्यासाठी कुशल अशा कामगारांची नितांत आवश्यकता होती.

 

indian guy at job inmarathi

 

कमी तिथे आम्ही या आपल्या भारतीयांच्या मानसिकतेमुळे दिवसागणिक हजारो भारतीय कामगार आखाती देशांमध्ये जाऊ लागले. ७०च्या दशकांत लोक दोनच ठिकाणी गर्दी करू लागले होते ते म्हणजे बॉलीवूड आणि दुसरं म्हणजे आखाती देश, नेमकं भारतीयांचं आखाती देशांमध्ये जायचं प्रमाण का वाढलं? हे आज आपण जाणून घेणार आहोत…

शहरीकरण :

भारत हा आधीपासून खेड्यांचा देश म्हणून ओळखला गेला आहे. महात्मा गांधींनी देखील खेड्यांकडे चला हा संदेश खूप आधीच दिला होता. आज जरी मुंबई, चेन्नई बंगलोर, दिल्ली या मेट्रो सिटीज म्हणून उदयाला जरी आल्या असल्या तरी तीस वर्षांपूर्वी आजच्या सारखी परिस्थती नव्हती.

 

old-mumbai-inmarathi

 

शहरीकरण हा स्थलांतरचा एक महत्वाचा घटक आहे. कारण ग्रामीण भागात आजही शहराच्या तुलनेत कामाचा मोबदला कमी मिळतो. त्यामुळेच कधीकाळी वाळवंटात असलेले आखाती देश हळूहळू शहरीकरणाकडे वळत होते अशा वेळी कामगारांची त्यांना गरज होती. त्यामुळेच अनेक भारतीय देशात मोबदला मिळत नाही निदान बाहेर तरी मिळेल या एका अपेक्षेनं आखाती देशांकडे वळू लागले.

बेरोजगारी :

सरकारी नोकऱ्यांमध्ये शहरी भागातील लोकांचे प्रमाण मोठे होते. मात्र गावातील कुशल कारागीर यांच्या हाती काम नव्हते. त्यातच वर म्हंटल्याप्रमाणे देशात औद्योगिकरण  मोठ्या प्रमाणावर झाले नव्हते. त्यामुळे अशा कारागिरांना आपल्या हातातील कौशल्यांना वाव मिळावा तसेच मोठ्या कारख्यानात, जहाजावर रोजगार हवा होता.

 

Prison_job_fair inmarathi
thenewsminute

 

राजकीय अस्वस्थता :

स्वातंत्र्य मिळायच्या आधीच काही वैचारिक मंडळींचा असा दावा होता की, देशाला जरी स्वातंत्र्य जरी मिळालं तरी त्याचा काही फायदा नाही. लोकांच्या अडाणीपणच आणि त्यांना वेगवेगळ्या जाती धर्माचा वापर करून त्यांची माथी भडकवून केवळ राजकारण केलं जाईल असा त्यांचा दावा होता.

 

farmer protest inmarathi

 

त्याकाळात देखील राजकीय अस्थिरता होतीच आजही आहेच, आज भाजपच्या एका कार्यकर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारत आणि आखाती देश आणि त्यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंध हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच ७० च्या दशकांत केवळ राजकीय अस्थिरतेमुळे अनेकजण आखाती देशांमध्ये जाऊ लागले.

गरजा :

मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या तर अन्न वस्त्र निवारा, या मूलभूत गरज भागल्या नाहीत तर माणूस स्थलांतराचा विचार करतो. भारतात नैसर्गिक आपत्ती, गरीबी, कामाचा अभाव तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता, जमिनीचे असमान वाटप, लोकसंख्या याउलट उभरत्या आखाती देशांमध्ये कामाचा उत्तम मोबदला, राहणीमान, आरोग्य सेवा आणि अशा बऱ्याच गोष्टी भारतीयांना आकर्षित करणाऱ्या होत्या.

 

dubai inmarathi

 

 

भारतीय अर्थव्यवस्थेता फायदा :

तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? आखाती देशांममध्ये काम करणारे आपले कारागीर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसे फायद्याचे? तर आखाती देशांमध्ये काम करणारे भारतीय कामगार आपल्या भारतातील नातेवाईकांना खर्चासाठी जे पैसे पाठवतात आणि हे पैसे परिणामी राष्ट्रीय उत्पन्नांत वाढ होतेच आणि भांडवलचा प्रवाह देखील निश्चित करतो.

 

currency notes inmarathi
livemint

 

भारत हा सातत्याने जगातील सर्वात मोठा देश आहे ज्यात मोठ्या प्रमाणावर इतर देशांमधून पैसे ( remittance) येतात. २०२० साली भारताला ८३ अब्ज डॉलर्स रूपात remittance मिळाले आहेत. यात बहुतांश प्रमाणात remittance हा आखाती देशांमधून येत आहे. आलिशान भव्य दिव्य अशी पर्यटन स्थळं मोठमोठाली पंचतारांकित हॉटेल्स यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीयांना रोजगार मिळतो.

कामगारांची अवस्था :

दरमहा आखाती देशांमध्ये जरी भारताच्या मानाने पैसे जास्त मिळत असतील तरी त्यांना अनेक अडचणींना सामोरे  जावे लागते. अशा कामगारांना राहण्याची सोय चांगली नसते. कामाचे तास, कामाचा कोणताही करारनामा नसणे. कारखान्यांमध्ये होणारे अपघात त्याची नुकसान भरपाई न मिळणे. अशा ठिकाणी पांढरपेशा वर्गाला कामगारांच्या तुलनेत पगार देखील जास्त मिळतो तसेच सोयीसुविधा देखील असतात.

 

worker im

आजच्या काळातल्या या १० नोकऱ्यांवर भविष्यात येऊ शकते गदा!!

अवघ्या ३ मिनिटांच्या मीटिंगमध्ये, कंपनीने झूम कॉलवर काढून टाकले ८०० लोकांना

परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२० च्या अहवालानुसार आकडेवारीनुसार जवळपास १३.६ दशलक्ष भारतीय परदेशात राहत आहेत. त्यातील सर्वात मोठा हिस्सा हा ३,४१,००० एवढे संयुक्त अरब अमरितीमध्ये राहतात. सौदीमध्ये २५९४९५७, कुवेतमध्ये १०,२९, ८६१ तर ओमानमध्ये ७,७९,३५१ भारतीय राहतात. यात प्रामुख्याने केरळ मधली लोकं मोठ्या प्रमाणावर आहेत.

नुकतंच मोदीजी युरोपमधील तीन देशांचा, जपानचा दौरा करून आले त्यामध्ये अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली आहे. मात्र आता एका विधानामुळे आशिया खंडातीलच आखाती देश आणि भारत यांच्या संबंधांमध्ये कितपत बिघाड होतील हे कळलेच. धार्मिक मुद्दे हे दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये यायला नको.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?