' बॉलिवूड धुंद पार्ट्यांमध्ये बिझी; माधवन मात्र मुलाच्या भविष्यासाठी मेहनत घेतोय! – InMarathi

बॉलिवूड धुंद पार्ट्यांमध्ये बिझी; माधवन मात्र मुलाच्या भविष्यासाठी मेहनत घेतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यंतरी आर्यन खान ड्रग प्रकरण चांगलंच गाजलं, बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खानच्या मुलाला NCB ने अटक केली आणि पुन्हा लोकं संपूर्ण बॉलिवूडवर बोट ठेवू लागले. बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन आपल्याला नवीन नाही, पण गेल्या काही दिवसांपासून या गोष्टी लोकांच्या समोर येऊ लागल्याने लोकांच्या मनातला बॉलिवूडबद्दलचा होता नव्हता तो सगळा आदरही कमी व्हायला लागला आहे.

आर्यन खान प्रकरण जेव्हा चांगलंच तापलं होतं तेव्हा मात्र सोशल मीडियावर अशाच एका सेलिब्रिटीच्या मुलाची चर्चा होत होती, चर्चा काय तर तुलनाच होत होती, तो अभिनेता म्हणजे आर. माधवन आणि त्याचा मुलगा वेदांत माधवन!

एकीकडे शाहरुखसारख्या सुपरस्टारचा मुलगा ड्रग्स प्रकरणात तुरुंगात जातो तर दुसरीकडे आर.माधवनचा मुलगा स्विमिंग या खेळात देशाचं नाव मोठं करतो अशा अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर पाहिल्या असतील.

 

madhvan son IM

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शिवाय कशाप्रकारे शाहरुख त्याच्या मुलांवर संस्कार करण्यात कमी पडला आणि माधवन त्यांच्या मुलांची कशा रीतीने जडणघडण करतो आहे याची तुलनासुद्धा होऊ लागली.अर्थात या दोन्हीमध्ये तुलना करणं मूर्खपणाच ठरेल कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण नक्कीच या सगळ्या बाबतीत शाहरुखपेक्षा माधवन कसा वरचढ ठरतो हे आपण पाहिलं आहेच.

आता तर याच कारणासाठी माधवन पुन्हा चर्चेत आलाय, नेटफ्लिक्सवर त्याची नवीन वेबसिरिज प्रदर्शीत झाली त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधला आणि त्यातूनच हे स्पष्ट झालं की मुलाच्या भवितव्यासाठी तो काही काही बाहेरच्या देशात स्थलांतरित होणार आहे. माधवनने नेमका असा निर्णय कशासाठी घेतलाय तेच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!

आपल्या स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी आणि त्याच्या पुढच्या तयारीसाठी माधवन हा त्याच्या पत्नीसह दुबईमध्ये शिफ्ट झाला असल्याचं त्याने मीडियाला स्पष्ट केलं आहे.

 

madhvan and family IM

 

“मुंबईतले मोठे स्विमिंग पूल्स कोरोनाच्या कारणामुळे बंद आहेत, आणि मुलाच्या सरावासाठी आणि पुढील ऑलिंपिकच्या तयारीसाठी मी आणि माझी बायको त्याच्याबरोबरच दुबईत आलो आहोत!” असं माधवनने स्पष्ट केलं आहे.

वडिलांप्रमाणेच माधवनचा मुलगाही अभिनयात नशीब आजमावेल अशी चर्चा गेले काही दिवस झाले रंगत होती, पण माधवन आणि त्याच्या पत्नीने ती शक्यता पूर्णपणे खोडून काढली आहे. आपला मुलगा स्विमिंगमध्ये चॅम्पियन आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.

“तुमच्या मुलांना उंच झेप घेऊ द्या, त्यांना कोणत्याही क्षेत्रात करियर घडवण्यापासून रोखू नका, माझ्या मुलाने अॅक्टिंग निवडली नाही याचा मला जराही पश्चात्ताप नाही, त्याच्या निवडीसमोर माझं करियर खूप छोटं आहे, आणि त्याच्यासाठी मी हवी ती मदत करायला तयार आहे!” असं म्हणत त्याने एक वडीलधारा सल्लासुद्धा लोकांना दिला आहे.

माधवनची नेटफ्लिक्सवरची नवीन सिरीज अशाच एका विवाहित माणसाची कथा आहे ज्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार आहेत, शिवाय त्याचा सुपरहीट विक्रम वेधा या सिनेमाचासुद्धा हिंदी रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 

madhvan series IM

 

कोल्हापुरच्या राजाराम कॉलेजमधून इंजीनीयरिंगचं शिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत स्वतःच्या अभिनयाची इतरांना दखल घ्यायला लावणारा सगळ्यांचाच लाडका मॅडी स्वतःच्या परंपरा, रूढी, संस्कारांना धरून आहे, आणि आपल्या मुलावरसुद्धा तो तसेच संस्कार करतोय हे त्याच्या मुलाच्या प्रगतीमधून दिसतंय.

इतका मोठा अभिनेता असूनसुद्धा स्वतःच्या मुलासाठी माधवन जी मेहनत घेतोय त्यासाठी त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, बॉलिवूडच्या इतर स्टार लोकांनीसुद्धा स्वतःच्या पोरांना सेलिब्रिटी बनवण्याआधी चांगला माणूस म्हणून घडवलं पाहिजे.

 

madhvan family IM

 

पुढच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये वेदांतने सुवर्णपदक जिंकून माधवनचं आणि देशाचं नाव आणखीन मोठं करावं यासाठी या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?