' पत्नी युक्रेन युद्धात, पती येमेनमध्ये बंदीवासात; वाचा मायदेशी येण्यासाठी त्यांनी केलेला खडतर संघर्ष – InMarathi

पत्नी युक्रेन युद्धात, पती येमेनमध्ये बंदीवासात; वाचा मायदेशी येण्यासाठी त्यांनी केलेला खडतर संघर्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. या भारतातल्या एका कपलनं २ युद्धांचा सामना केला. तोही एकत्र नव्हे तर पती एका ठिकाणी आणि पत्नी वेगळ्याच ठिकाणी.

आपण भारतीय आहोतच चिवट! भारतातल्या लोकांना कोणीच टफ देऊ शकत नाही या जगात. खरंतर आपल्या देशाला आणि देशातल्या लोकांना युद्ध नकोच असतं, मग ते कसंही असेना. म्हणजे ते सीमेवर दुसऱ्या देशासोबत लढलं जात असो किंवा भारतात अंतर्गत व्यक्तिसमूहांमध्ये लढलं जात असो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मात्र हे कितीही खरं असलं तरीही प्रत्येक भारतीयाला जशास तसे उत्तर द्यायची सवय आहे. आपल्याला हे बऱ्याच उदाहरणांवरून लक्षात आलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपली बाजूच्या देशांबरोबर युद्ध झाली आहेत. मात्र त्यात आपण खोडी काढली नव्हती. समोरच्यांना त्यांनी खोडी काढल्यानंतर धडा शिकवला होता.

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं हे युद्ध आता तिसऱ्या महायुद्धात रूपांतरित होऊ नये हीच संपूर्ण जगाची इच्छा आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची भारत सरकारनं सुटकाही केली. अनेक विद्यार्थी, आपले तिथं राहणारे नागरिक परत आले आहेत. सुरुवातीला उल्लेख केला ती पत्नीही युक्रेनमध्येच अडकली होती.

युद्धजन्य परिस्थितीत तग धरून होती. पण तिच्या डोक्यावर फक्त स्वतःचं टेन्शन नव्हतं तर आपला नवरा सुखरूप असेल का नाही याचंही तिला टेन्शन होतं. कारण तिचा नवरा दुसऱ्या एका देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकला होता. नेमकी काय आहे या धाडसी कपलची कहाणी?

 

couple in war imv

 

पती-पत्नी दोघेही वेगवेगळ्या देशात युद्धजन्य परिस्थितीत…

२६ वर्षांचा अखिल रेघू आणि २३ वर्षांची जिथिना जयकुमार हे जोडपं केरळमधल्या एका गावातले रहिवासी. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्येच या दोघांचंही लग्न झालं होतं.

लग्न झाल्यावर अवघ्या एका महिन्यात रेघू संयुक्त अरब अमिरातीचा झेंडा असलेल्या रवाबी नावाच्या एका मालवाहू जहाजात डेक कॅडेट म्हणून सामील झाला. दुसरीकडं सहाव्या वर्षाची मेडिकल स्टुडंट असलेली जिथिना कीव्हच्या मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत गेली.

इकडं रेघूनं त्याच्या जहाजावर २ जानेवारी २०२२ ला गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. हुथी बंडखोरांनी रवाबी जहाजावर कब्जा केला. कारण त्यांना वाटलं की हे जहाज सौदी अरेबियाला लष्करी पुरवठा करत आहे.

 

couple in war im1

 

सात वर्षांहून अधिक काळ सौदी समर्थित अधिकृत सरकार आणि बंडखोर यांच्यातील संघर्षामुळे येमेन उद्ध्वस्त झालं आहे. जहाज हायजॅक केलेल्या अपहरणकर्त्यांनी येमेनची ११ सदस्यांच्या क्रूला राजधानी साना येथील जहाज आणि एका हॉटेलमध्ये दर १५ दिवसांनी पुढे-मागे हलवले.

नंतर या घटनेविषयी विचारलं असता रेघू काही बोलू शकला नाही. त्याचे सहकारी आणि जहाजावर ऑइलर असलेल्या श्रीजीथ सजीवन यांनी बीबीसी हिंदीला माहिती दिली.

ते म्हणाले, “अंदाजे ४० लोकांनी लहान बोटींमधून आमच्या जहाजाला वेढा घातला होता, तेव्हाच आम्हाला समजलं की हे जहाज हायजॅक होतंय. आम्हाला बाथरूम असलेल्या एका सूटमध्ये ठेवण्यात आलं होतं.

बाहेर पडण्याची परवानगी नव्हती मात्र मेन्यू कार्डवरून हवं ते मागवण्याची परवानगी होती. हौथींच्या ताब्यात असलेल्या सण शहरात होणाऱ्या बॉम्बस्फोटामुळं आम्ही घाबरलो होतो. आम्ही टीव्हीवर पाहिले, की आमच्या हॉटेलपासून १०० मीटर अंतरावर एका शाळेत बॉम्बस्फोट झाला.”

या ओलीसांना पहिल्या २ महिन्यांमध्ये दर २५ दिवसांनी कुटुंबियांशी बोलायची परवानगी होती. नंतर ते दिवसांचं प्रमाण १५ वर आणण्यात आलं. हे अपहरणकर्ते आधी आक्रमक होते. मात्र सर्व लोक निर्दोष असल्याची खात्री होताच ते निश्चिन्त झाले. सुटका कधी होणार असं विचारल्यानंतर ते फक्त इन्शाअल्लाह म्हणायचे.

..तर इकडे दुसऱ्या युद्धात अडकली पत्नी!

 

couple in war im2

 

आपला पती उत्तर देत नसल्यानं तो कोणत्या तरी संकटात सापडला असण्याची शंका कीव्हमध्ये असलेली रेघूची पत्नी जिथिनाला आली. पती ज्या कंपनीत काम करत होता त्याच कंपनीत त्याचा मोठा भाऊही होता. त्याच्याकडून जिथिनाला तिचा पती असलेल्या जहाजाचं हायजॅक झाल्याचं तिला समजलं.

तिनं लगेचच भारतातल्या सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यामुळं जिथिना आणि त्याच्या मैत्रिणींना बंकरचा आश्रय घेणं भाग पडलं.

ही कीव्हमध्ये घडत असलेली घटना येमेनमध्ये बंदिवासात असलेल्या रेघूनं पाहिली. त्यामुळं त्याला स्वतःसोबत पत्नीच्या आयुष्याबाबत चिंता वाटू लागली. मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जिथिना युक्रेनमधून बाहेर पडून भारतात परत आली.

 

couple in war im3

 

आल्यावर तिला पतीला सोडवण्यासाठी जेथून सानामधलं भारतीय दूतावास तात्पुरतं कार्यरत आहे अशा जिबूतीमधील भारताचे राजदूत रामचंद्रन चंद्रमौली यांची फार मदत झाली.

अखेर एप्रिलमध्ये, सौदीच्या नेतृत्वाखालील युती आणि हुथी बंडखोरांनी मुस्लिम पवित्र रमजान महिना सुरू झाल्यावर दोन महिन्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शविली.

त्यानंतर भारत सरकारनं ओमान आणि इतर देशांच्या मदतीनं अडकलेल्या सगळ्या खलाशांची सुटका केली. शेवटी गेल्या आठवड्यात पत्नीसाठी हार आणि अपहरणकर्त्यांनीच दिलेल्या जाम्बिया नावाच्या येमेनमधल्या पारंपरिक खंजिरासह रेघू केरळमध्ये परत आला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?