' ज्या sleep apnea मुळे बप्पीदांचे निधन झाले, ते नेमकं काय आहे? – InMarathi

ज्या sleep apnea मुळे बप्पीदांचे निधन झाले, ते नेमकं काय आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याच जणांना झोपेत घोरण्याची सवय असते. थकूनभागून घरी आल्यानंतर आपल्या प्रत्येकालाच कधी गादीवर अंग टाकू असं झालेलं असतं. काही जण रोजच झोपेत घोरत असले तरी कधीकधी तब्येत बरी नसेल किंवा कधीतरी फारच दमायला झालं असेल तरी माणसं घोरतात.

 

snoring-inmarathi

 

घरात कुणी घोरणारी व्यक्ती असेल तर अर्ध्या रात्रीत आपली झोपमोड होते म्हणून आपण वैतागतो. पण तरीही घरातल्या व्यक्तीच्या किंवा स्वतःच्या घोरण्याच्या या सवयीकडे फार लक्ष द्यावं असं आपल्याला वाटत नाही. या वरकरणी अगदीच साध्या वाटणाऱ्या गोष्टीमुळे एखादा गंभीर आजार होत असेल तर? हा विचारही कदाचित आजवर आपल्या मनाला शिवला नसेल. पण बॉलीवूडमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने डिस्को संगीत आणलं त्या बप्पीदांचं निधन अशाच एका झोपेशी संबंधित आजारामुळे झालंय.

 

bappi da 2 IM

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बप्पी दांच्या जाण्यामागे प्रकृती अस्वास्थ्याची अनेक कारणं होती. पण त्यांना असलेला ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनी’ हा आजार त्यामागचं मुख्य कारण असल्याचं समजतंय. मुंबईतील जुहूमधल्या ‘क्रिटीकेअर’ या रुग्णालयात मंगळवारी रात्री वयाच्या ६९व्या वर्षी बप्पीदांचं निधन झालं.

बप्पीदा ज्यामुळे गेले तो ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनी’ हा आजार नेमका आहे तरी काय? त्याची लक्षणं कोणती? आपण डॉक्टरांकडे जाऊन केव्हा तपासणी केली पाहिजे? या सगळ्याविषयी जाणून घेऊ.

‘पीटीआय’शी बोलताना बप्पीदांचे डॉक्टर दीपक नामजोशी म्हणाले, “बप्पीदा महिनाभर रुग्णालयात ऍडमिट होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज दिला गेला होता. पण मंगळवारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना फोन करून घरी बोलावून घेतलं आणि त्यांना पुन्हा ऍडमिट केलं गेलं.” ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप’ हा आजार हे त्यांच्या मृत्यूमागचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

bappi da im

 

या विकाराचे बरेच प्रकार आहेत. पण ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप’ हा त्यातला वारंवार आढळणारा विकार आहे. हा विकार होतो त्यावेळी झोपेत तुमच्या घश्यातले स्नायू अधूनमधून ढिले पडतात आणि तुमच्या श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो.

 

snoring im

 

‘घोरणे’ हे या आजाराचे एक लक्षण आहे. या विकारामुळे तुमचं वजन वाढतं आणि रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी कमी होते.

‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप’ ची ही लक्षणं आहेत :

१. दिवसा प्रचंड झोप येणे
२. मोठ्यांदा घोरणे
३. लक्षात येईल इतपत झोपेत श्वासोच्छ्वास थांबणे
४. धाप लागल्यामुळे किंवा गुदमरल्यासारखं होऊन अचानक झोपेतून जागं होणे
५. तोंडाला कोरड पडल्यामुळे किंवा घसा खवखवल्यामुळे अचानक जाग येणे
६. सकाळी डोकं दुखणे
७. दिवसभरात कामावर लक्ष केंद्रित करताना अडथळे येणे
८. नैराश्य आणि चीडचीड होणे ; सतत मूड बदलणे
९. उच्च रक्तदाब
१०. कामवासना कमी होणे

 

headache inmarathi

 

जर स्वतःची किंवा इतरांची झोपमोड होईल इतपत जोरात तुम्ही घोरत असाल, धाप लागून किंवा गुदमरल्यासारखं होऊन झोपेतून जागे होत असाल, झोपताना मध्येच तुमचा श्वास रोखला जात असेल, दिवसा काम करताना, टीव्ही बघताना, गाडी चालवतानाही फार झोप येत असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.

बऱ्याचदा घोरण्यात काही गंभीर नसतं. पण जर तुम्ही अचानक काही दिवसांपासून मोठ्यांदा घोरू लागले असाल तर डॉक्टरकडे जाणं टाळू नका. जर तुम्हाला पाठीवर झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप’ होऊ शकतो.

 

snoring inmarathi
mgsfl.com

 

या विकारात तुम्ही मोठ्यांदा घोरत असलात तरी दुसऱ्या कुशीवर वळलात की घोरायचे थांबता. तुम्हाला जर बराच काळ थकल्यासारखं वाटत असेल, गुंगी येत असेल, चिडचिड होत असेल तर आपल्याला झोपेशी संबंधित कुठली समस्या नाही ना याची डॉक्टरांकडे जाऊन खात्री करून घ्या.

शक्यतो कुशीवर झोपावं हा सल्ला आपण सगळ्यांनीच ऐकलेला असतो. पण बऱ्याचदा आपण आपल्या मर्जीप्रमाणे हवं तसं झोपतो. यापुढे झोपताना आणि झोपून उठल्यावर आपल्याला कसं वाटतंय याकडे आपण लक्ष देऊ.

आपण क्षुल्लक समजत असलेली कुठली गोष्ट आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध राहू आणि नसते आजार ओढवून घेणं टाळू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?