शिवजयंती तिथीनुसार नको! : शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांना मागणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शिवजयंतीच्या तारखेवरून निर्माण होणारे वाद महाराष्ट्रासाठी नवे नाहीत. १९ फेब्रुवारी या तारखेला शिवजयंती साजरी केली जात असली तरी महाराजांची जयंती ही तिथीनुसारच साजरी व्हावी ही भुमिका शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही व्यक्त केली होती. मात्र आता शिवसेनेच्याच आमदारांकडून या भुमिकेच्या विरोधात मागणी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
राज्यात यापुढे दोन-दोन शिवजयंती नकोच. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ तारखेला म्हणजेच जन्मतारखेनुसार असावी अशी मागणी शिवसेनेच्याच आमदार करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेही ते याबाबतचे पत्र देणार असून आता उद्धव ठाकरे याबाबत कोणी भुमिका घेणार? हे येणारा काळच ठरवेल.
न सुटलेला तिढा
शिवजयंती साजरी करण्यावरून सुरवातीपासून दोन गट पडले होते. हा वाद सोडवण्यासाठी १९६६ साली महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमली, मात्र या समितीमध्येही एकवाक्यता झाली नाही.
अखेर २००० साली आमदार रेखा खेडेकर यांनी विधिमंडळात उपलब्ध पुरावे आणि १९६६ च्या समितीचा अहवाल मांडून १९ फेब्रुवारी १६३० हा शिवाजी महाराजांचा जन्म दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने मान्य केला. अशापद्धतीने १९ फेब्रुवारी हा शिवजयंतीचा शासकीय दिवस ठरला.
मात्र आता शिवसेनेच्या आमदारांनी केवळ एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली आहे. दोन वेगवेगळ्या गटांकडून शिवजयंती साजरी केली जाते, मात्र दोनदा हा दिवस साजरा करण्यात अडथळे येतात, त्यापेक्षा एकदाच उत्साहाने हा दिवस साजरा करता येईल अशी भुमिका मांडण्यात आली आहे.
एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील आमदारांची मागणी अशा कोंडीत अडकलेले उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.