' असं काय झालं की राहुल गांधी म्हणाले “मोदींची फेकुगिरी टेलिप्रॉम्पटरलाही सहन नाही होत!” – InMarathi

असं काय झालं की राहुल गांधी म्हणाले “मोदींची फेकुगिरी टेलिप्रॉम्पटरलाही सहन नाही होत!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकीय वर्तुळात नेतेमंडळींनी एकमेकांवर यथेच्छ तोंडसुख घेणं, एकमेकांची खिल्ली उडवणं हे काही आपल्यासाठी नवं नाही. असे किस्से आपण आजवर अनेकवेळा ऐकत आलेलो आहोत. आपलं लोकशाही राष्ट्र असल्यामुळे प्रत्येकालाच ज्याला जे हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य आहे.

राजकीय मंडळींनी केलेल्या वक्तव्यांवर, नेतेमंडळींच्या उडवलेल्या खिल्लीवर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. कुणी तो सगळा प्रकार उचलून धरतं तर कुणी त्यावर टीकेची झोड उठवतं.

 

politician IM

 

या अशा प्रसंगांचा जीवही तसा लहानखुराच असतो तरी ट्रेनच्या, बसच्या प्रवासात केलेल्या गप्पाटप्पांमध्ये लोकांना चघळायला विषय मिळतात.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी असंच एक वक्तव्य केलंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मोदींचं भाषण सुरू असताना टेलीप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि मोदींना आपलं भाषण थांबवावं लागलं. या प्रसंगामुळे मोदींची फिरकी घेत राहुल गांधींनी ट्विट केलंय की, “टेलीप्रॉम्प्टरसुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही.”

 

rahul gandi IM
hindi.oneindia.com

 

प्रसंग असा घडला की सोमवारी ‘जागतिक आर्थिक परिषदे’च्या बैठकीत दाव्होस अजेंड्यात व्हर्चुअल पद्धतीने नरेंद्र मोदींनी भाषण दिले. आपल्या उत्तम वक्तृत्त्वकौशल्यांसाठी ओळखले जाणारे मोदी नेहमीच आपल्या भाषणांमधून जनतेवर छाप पाडतात.

लोकांची नस अचूक ओळखल्यामुळे लोकांच्या मनाला हात घालणं मोदींना अगदी लीलया जमतं.

नेहमीप्रमाणेच मोदींचं हे भाषणही चांगलंच झालं. पण भाषण करत असताना अचानक ज्या टेलीप्रॉम्टरमधून मोदी बोलत होते त्यात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि सुरुवातीलाच आपलं भाषण मोदींना थांबवावं लागलं. भारतीयांच्या इच्छाशक्तीचं मोदी कौतुक करत होते.

दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असं ते म्हणाले मात्र त्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेलीप्रॉम्प्टर अचानक बंद पडला.

या सगळ्या प्रसंगामुळे मोदी गोंधळून गेले आणि काहीश्या संतापलेल्या हावभावांनी त्यांनी स्क्रीनच्या उजवीकडे पाहिलं. नंतर ते निराश झाले आणि हात वर करत, कानात हेडफोन्स लावत आपल्या भाषणात झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना आपलं भाषण ऐकू जातंय की नाही असं ते विचारू लागले.

 

modi teleprompter IM

 

मोदींनी या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला. त्यांनी या जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह कोरोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे असं त्यावेळी मोदींनी जगभरातल्या देशांना सांगितलं.

त्यांनी आपल्या कार्यकाळात देशात झालेले १० मोठे बदल सांगितले. याखेरीज, भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे असं म्हणत त्यांनी गुंतवणूकदारांना आवाहनही केलं.

यावेळी मोदींच्या या भाषणावर जितकी चर्चा झाली त्याहून बरीच अधिक चर्चा भाषणाच्या सुरुवातीलाच टेलीप्रॉम्प्टर बिघडल्यामुळे मोदींना आपलं भाषण थांबवावं लागलं यावर झाली. टेलीप्रॉम्प्टर बंद झाल्यानंतर मोदींना एकही वाक्य न अडखळता बोलता आलं नाही अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

 

modi 3 IM

 

खरंतर अश्याच आव्हानात्मकी प्रसंगी मोदींची वक्तृत्त्वकौशल्यं दिसायला हवी होती पण तशी ती दिसली नाहीत असं एक मत कुणीतरी केलेल्या एका ट्विटमधून समोर आलंय.

राहुल गांधींनी जशी मोदींची फिरकी घ्यायची संधी सोडली नाहीये तशीच काँग्रेसनेही सोडली नाही. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरूनही ‘हमे तो टेलीप्रॉम्प्टरने लूट लिया, अपनों में कहां दम था’ अश्या स्वरूपाच्या ट्विटद्वारे मोदींवर निशाणा साधला गेलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.

हा हॅशटॅग बराच व्हायरल होत सोशल मीडियावर सध्या मिम्सची लाट आली आहे. सिनेमातल्या संवादांचा आधार घेत विनोदी अंगाने #TeleprompterPM, #Teleprompter  हे हॅशटॅग्ज वापरून हे मिम्स केले जात आहेत.

सोमवारी रात्रीपासूनच #TeleprompterPM, #Teleprompter, #TeleprompterFail, #TelepromperJeevi हे हॅशटॅग्ज प्रचंड ट्रेंडिंग असल्याचं आढळून आलं आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे भाजपा नेत्यांकडूनही काँग्रेसवर पलटवार केला गेला आहे.

 

teleprompter 3 IM

 

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी म्हटलं आहे की, “जागतिक आर्थिक परिषदेकडून तांत्रिक त्रुटी आली होती, त्यामुळे पंतप्रधानांनी भाषण थांबवले.”

दरम्यान असे काही व्हिडियोजदेखील समोर आले आहेत ज्यात असं आढळून आलंय की टेलीप्रॉम्प्टर मध्ये दोष नव्हता तर व्यवस्थापकीय टीमने पंतप्रधानांना थांबण्यास सांगितलं होतं आणि प्रत्येकजण त्यांचा आवाज ऐकत आहे की नाही हे विचारलं होतं.

अश्या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं असलं तरी नेमकी परिस्थिती काय होती हे आपल्याला ठाऊक नाही.

राजकीय वर्तुळातला नेतेमंडळींची खिल्ली उडवण्याचा पूर्वापार चालत आलेला सिलसिला याहीपुढे कायम राहील हे नक्की. या प्रसंगातलं मूळ भाषण बाजूलाच राहून भलत्याच गोष्टीची चर्चा झाल्यामुळे लोकांचं मनोरंजन मात्र होतंय.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?