' फडणवीस की ठाकरे? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण? कमेंट करा – InMarathi

फडणवीस की ठाकरे? तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण? कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”मी पुन्हा येईन” म्हणत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा पुन्हा आपल्या हाती यावी यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बराच खटाटोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी छुपी युती करत त्यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली मात्र अवघ्या काही तासात हे सरकार पडलं.

 

ajit pawar devendra fadnavis inmarathi

 

त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच महाविकास आघाडीने सत्तेची दोरी आपल्या हाती घेतली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर आपले नाव कोरले.

विरोधी पक्षातील भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसले असले तरीही सुरुवातीचे अनेक दिवस आपण मुख्यमंत्री राहिलो नाही यावर विश्वास बसत नसल्याची कबुली त्यांनी दिली होती.

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांची युती अर्थात महाविकास आघाडीचे हे नवे सरकार फारकाळ टिकणार नाही असा भाजपचा आरोप अजूनही सुरुच आहे.

 

mahavikas aghadi inmarathi

 

ठाकरे सरकारने कार्यभार स्विकारला तेंव्हापासून सरकारला सातत्याने नव्या अडचणींना सामोरे जावे लागले. निसर्ग, तौक्ते यांसारख्या वेगवेगळ्या वादळांनी नुकसान केलं तर कोरोनासारख्या महामारीने तर सरकारचे कंबरडे मोडले.

रुग्णांची वाढती संख्या, कोलमडलेली रुग्णसेवा, अपुरी ऑक्सिजन सुविधा ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हदारे जनतेशी संवाद साधला. मात्र याच मुद्द्याचा आधार घेत मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याबाबत विरोधकांनी त्यांच्यावर पुरेपर टिकाही केली.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती राज्याचा कारभार येणार अशी भाजपला आशा असतानाच उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जात आहे.

 

devendra im

 

देशपातळीवर झालेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांना भारतातील सर्वोत्तम ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीतही स्थान मिळाले होते. असे असले तरी विरोधकांनी त्यांच्या कामातील चुकांवर बोट ठेवले होते.

यापुर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याव्दारे चालवले जाणारे सध्याचे सरकार यांची तुलना केली तर तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण?

 

devendra uddhav im

 

देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?