हिऱ्यांच्या खाणी, ८७ बुरूज आणि बरंच काही…या किल्ल्याचं स्थापत्यशास्त्र थक्कच करतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इतिहासात डोकावून पाहिलं तर इतके वेगवेगळे प्रसंग दिसतात..कितीतरी शासकांनी चालवलेले राज्य कारभार..त्या त्या वेळी राबविलेले कायदे. वेगवेगळ्या इमारती..गडकोट किल्ल्यांच्या मोहीमा..अशा अनेक गोष्टी!
धारातीर्थी पडलेले अनाम योद्धे दिसतील. गडांची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी दिसेल. पाणीपुरवठा करायला केलेली सोय दिसेल.. त्याकाळी अतिशय प्रगत असलेली स्थापत्यकला दिसेल. सुंदर सुंदर संस्कृतीचा वारसा सांगणारी अनेक स्थळं दिसतील.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
खूपदा आपण गड किल्ले बघायला जातो, तेव्हा गाईड बारकाईने आपल्याला गडाचा इतिहास सांगतात. कोणता गड अभेद्य होता. गड बांधताना कसं शिसं ओतून बांधकाम प्रचंड मजबूत केलं.. एक ना अनेक!
आता गंमत बघा, आपल्या देशातील काही गडकिल्ले आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत, पण हल्ली हल्ली बांधलेल्या इमारती, पूल धडाधड कोसळतात. का असं?
गड बांधताना त्या वेळी असणारे कारागीर जीव ओतून काम करत. बांधकाम मजबूत रहावं, आपल्या राजाला -राज्याला सहजासहजी धोका पोहोचू नये, राज्य किल्ले टिकून रहावं या भावनेने झपाटून काम करत. त्या वेळी असणारी स्थापत्यकला इतकी सुधारलेली होती, की आजही ते बांधकाम तसंच मजबूत आहे. त्यावरील कलाकुसर, नक्काशीकाम आजही तशीच सुंदर आहे.
===
हे ही वाचा : अंधेरी मार्ग, खंदक…यामुळे मराठवाड्याची शान असलेला अभेद्य किल्ला!
===
आज आपण अशा एका किल्याची माहिती घेणार आहोत जो आजही त्या स्थापत्यकलेचा उत्तम उदाहरण म्हणून पाहीला जातो. तो आहे गोवळकोंडा किल्ला.
हैदराबाद ही आंध्रप्रदेशची राजधानी. हैदराबाद मोत्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता तर फिल्मसिटी हे आकर्षण केंद्र झाले आहे. पण याशिवाय हैदराबाद येथील वैशिष्ट्य म्हणजे गोवळकोंडा किल्ला. हैदराबादच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष, वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेला हा गोवळकोंडा किल्ला.
४०० वर्षं जुना असलेला हा दिमाखदार किल्ला शहराच्या पश्चिमेस आहे. १३ व्या शतकात बांलेला हा किल्ला वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे.नवाबी थाटाचा हा किल्ला आजही पर्यटकांना भुरळ घालतो. आता पडझड झाली आहे.. पण शेवटी राजा हा राजाच असतो. बहामनी साम्राज्याची राजधानी असलेलं हे किल्ल्यातील गाव आजही दिमाखात उभं आहे… भग्नावस्थेत!
११ व्या शतकात वारंगळचा राजा ककातिया प्रतापरुद्र याने हा किल्ला बांधला आहे. एका गुराख्याच्या प्रेरणेने हा किल्ला साध्या चिखलाने बांधला. गोवळकोंडा किंवा गोलकोंडा अशा नावाने हा किल्ला ओळखला जातो. डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला असा गोलकोंडा या शब्दाचा अर्थ आहे.
नंतर १४ व्या शतकात बहामनी साम्राज्याच्या काळात बहामनी सुलतानाच्या ताब्यात हा किल्ला आला. १७ व्या शतकात कुली कुतुबशहा याने हा किल्ला पाडून त्याचे बांधकाम केले. त्यावेळी ग्रॅनाईट वापरुन हा किल्ला परत एकदा बांधला. अतिशय मजबूत आणि सुरक्षित!
एकूण ८७ बुरुज आणि ८ दरवाजे असलेला हा किल्ला सर्वाधिक सुरक्षित किल्ला मानला जातो. किल्ल्याच्या आत असलेले शहर पण चांगले बांधलेले आहे. गोवळकोंडा हा एकेकाळी हिऱ्याची बाजारपेठ होती. जगाला फार उत्तमोत्तम हिरे इथेच मिळाले. कोहीनूर ही पण याचीच देणगी.
नूतनीकरण करताना कुली कुतुबशहा याने गोवळकोंडा प्रवेशद्वारापासूनच मजबूत बनवला. दरवाजावर मोठमोठ्या सळया लावल्या. ज्यामुळे शत्रु हत्तीच्या मदतीने ही धडका देऊन दरवाजा तोडून आत येऊ नये.
या किल्ल्याच्या वैशिष्ट्यांपैकी एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे गोवळकोंड्याच्या प्रवेशद्वारावर घुमटाखाली उभे राहून जर टाळी वाजवली तर ४८० फुटांपर्यंत किल्ल्यावर त्या टाळीचा आवाज पोहोचतो. म्हणजे वरुन बघता येईल की कोण आलं आहे.. दरवाजा उघडून त्याला किल्ल्यावर येऊ द्यायचं की नाही! म्हणजे स्थापत्यकला त्याकाळातही किती प्रगत होती बघा…
त्याचबरोबरीने आंध्रप्रदेश मधील गरम दमट हवामानाचा त्रास होऊ नये म्हणून किल्ल्यावर इतकी पद्धतशीर बांधणी केली आहे, की आपण थक्कच होतो. तुम्ही इथे फिरायला गेलात तर एक “लाईट आणि साऊंड शो”देखील पाहू शकता.
शाही नगिना बाग ही खास राजपरिवारातील स्त्रिया व मुलांच्या मनोरंजनासाठी उभारलेली बाग. या बागेमध्ये पाणीपुरवठा करायला इतकी सोपी सोय केली आहे की आश्चर्यच वाटतं.
१२ मीटर खोल पाण्याचे टाके संपूर्ण किल्ल्याला पाणीपुरवठा करायची क्षमता बाळगतात. किल्ल्याच्या टोकावर दरबार होता. त्याची बांधणी अशी आहे की तिथून अख्खं हैदराबाद दिसतं.
===
हे ही वाचा : मराठ्यांची भूतं, १०० तोळे सोन्याचा नाग: मंत्रतंत्रानंतरही अभेद्य राहिलेल्या किल्ल्याची गोष्ट!
===
त्यानंतर दोन वेगवेगळ्या सभागृहांची बांधणी केली आहे.. तारामती गायन मंदिर आणि प्रेमाती नृत्य मंदिर. दरबारात बसून बादशहा कार्यक्रम पाहू शकायचा. चार मिनार हे मुस्लिम वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
औरंगजेबाने या किल्ल्यावर हल्ला करुन फितुरीने तो काबिज केला आणि बराचसा भाग उध्वस्त करुन टाकला. शेवटचा बादशहा तानाशाह याला दौलताबादच्या किल्ल्यावर बंदी बनवून टाकलं, पण त्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व कमी होत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.