' एकतर्फी प्रेमातून घडला अपघात, शेफालीने सांगितला बालपणीचा किस्सा – InMarathi

एकतर्फी प्रेमातून घडला अपघात, शेफालीने सांगितला बालपणीचा किस्सा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं…’ डिसेंबर- जानेवारी हे महिने प्रेमाचे महिने म्हणून ओळखले जातात. छान गुलाबी थंडी पडलेली असते, अशातच आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण आली नाही तरच नवल.

शाळेत असताना तर या गोष्टी जास्तच लोभसवाण्या वाटतात, पहिलं प्रेम माणूस विसरू शकत नाही असं म्हणतात. आणि हे पहिलं प्रेम मिळवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची माणसाची तयारी असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्रेमापायी अनेक माणसांनी आपला जीव दिल्याच्या, समोरच्याचा जीव घेतल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. त्यातून प्रेम एकतर्फी असेल तर संपलंच.. एकतर्फी प्रेमाच्या नादात माणसं सर्वस्व गमावून बसतात.

बऱ्याचदा या एकतर्फी प्रेमात ‘ती माझीच झाली पाहिजे’ असा हट्ट असतो. माझी नाही, तर इतर कोणाचीही होऊ देणार नाही असे डायलॉग तुम्ही अनेक मालिका- चित्रपटांमधून ऐकले असतील.

सध्या झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतही प्रेमाचे गुलाबी दिवस चाललेत, यश आणि नेहाची प्रेमकथा आता कुठे हळूहळू गोड नात्याचं रूप घेतेय. या मालिकेत यशाचा मित्र समीर त्याला ही प्रेमकथा फुलवण्यासाठी मदत करतोय.

 

shreyas prarthna inmarathi

 

पण समीरवर सुद्धा कोणाचंतरी प्रेम आहे बरं का.. नेहाची मैत्रीण शेफाली समीर वर एकतर्फी प्रेम करतेय.. पण खऱ्या आयुष्यात मात्र शेफालीला एकतर्फी प्रेमाचा तिरस्कार आहे.

राजश्री मराठीच्या एका व्हिडिओमध्ये शेफाली म्हणजेच काजल काटेने याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये ती म्हणाली, की ‘मी शाळेत सायकलवर जायचे, एकदा १४ फेब्रुवारीला सायकलच्या बास्केटमध्ये गुलाबाची फुलं आणि एक लेटर होतं. ते बघून मला भयंकर राग आला आणि मी त्या मुलासमोरच गुलाबाच्या पाकळ्या चुरगळून टाकल्या आणि ते लेटरही फाडलं. पुढे त्याने कोणालातरी सांगून माझा अपघात घडवला.’

 

kajal kate inmarathi

 

असे किस्से मुलींच्या बाबतीत सर्रास घडत असतात, आपण कायम सतर्क राहणं महत्त्वाचं.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?