' पाकिस्तानातील ‘हे’ १० विचित्र कायदे ज्याने बनवले, त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा! – InMarathi

पाकिस्तानातील ‘हे’ १० विचित्र कायदे ज्याने बनवले, त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

प्रत्येक देशात काही असे कायदे असतात जे न समजण्यासारखे असतात. पाकिस्तानमध्ये देखील काही असे वेगळे कायदे आहेत, जे तुम्हाला विचारात पाडतील. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या अशाच काही विचित्र आणि मजेशीर कायद्यांविषयी सांगणार आहोत.

pakistani-weird-laws-marathipizza02

 

१. कोणताच पाकिस्तानी इज्राईलला जाऊ शकत  नाही

पाकिस्तान आपल्या कोणत्याच नागरिकाला इज्राईल जाण्यासाठी व्हिसा देत नाही. या कारणामुळे कोणताच पाकिस्तानी येथून सरळ इज्राईलला जाऊ शकत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की या मागे काय कारण असेल?

पाकिस्तान आणि इज्राईल देशाचे राजकीय संबंध जणू अस्तित्त्वातच नाहीत. पाकिस्तानच्या मते इज्राईल नावाचा देशच नाही आहे. या कारणामुळे पाकिस्तान आपल्या नागरिकांना तिथे जाण्यासाठी व्हिसा देत नाही.

 

pakistani-weird-laws-marathipizza01

===

हे ही वाचा : अभिव्यक्ती स्वातंत्र्य नी ईश्वरनिंदा : पंजाब सरकारचा “पाकिस्तानी कायदा” ?

==

२. शिक्षणावर लागतो कर

पाकिस्तानामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर वर्षभरात २ लाखापेक्षा जास्त खर्च होत असेल, तर त्याला ५% कर भरायला लागतो.

३. प्रेयसी बरोबर राहणे आहे बेकायदेशीर

पाकिस्तानच्या कायद्यानुसार तुम्ही लग्नाच्या आधी कोणत्याही मुलीसोबत राहू शकत नाही. हे बेकायदेशीर मानले जाते.

४. अशिक्षित देखील बनू शकतो पंतप्रधान

पाकिस्तान देशात पंतप्रधान किंवा अध्यक्ष बनण्यासाठी व्यक्ती शिकलेला असणे गरजेचे नाही. परंतु एखाद्या शाळेत शिपायाची नोकरी हवी असेल तर मात्र तूम्ही शिकलेले असणे गरजेचे आहे.

 

pakistani-weird-laws-marathipizza03

 

५. तुम्ही पंतप्रधानांची मस्करी करू शकत नाही

पाकिस्तानामध्ये पंतप्रधानांची मस्करी केल्यावर जर तुम्ही पकडले गेलात तर तुम्हाला चांगलाच मोठा दंड भरावा लागतो.

 

imran khan inmarathi

 

६. वर्षातील या महिन्यात बाहेरचे खाण्यास आहे मनाई

रमजानच्या पाक महिन्यात घराच्या बाहेर काहीही खाणे बेकायदेशीर मानले जाते. जर तुम्ही मुसलमान नसाल तरीही तुम्हाला हा नियम लागू पडतो.

==

हे ही वाचा : मुहम्मद अली जिनांना तोंडावर थेट नकार – भारतात विप्रो जन्मण्याची मुहूर्तमेढ!

==

७. तृतीयपंथी सैन्यात भरती होऊ शकत नाहीत

इथे तृतीयपंथीना सैन्यात भरती होण्यास मनाई आहे. ह्या देशात तृतीयपंथीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.

 

pakistani-weird-laws-marathipizza04

 

८. कोणाच्याही फोनला हात लावणे आहे बेकायदेशीर

इथे कोणाच्याही परवानगीशिवाय त्याच्या फोनला हात लावणे बेकायदेशीर मानले जाते. त्यासाठी तुम्हाला ६ महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

 

child-using-smartphones-inmarathi02

 

९. स्पॅम संदेश पाठवणे आहे बेकायदेशीर

इथे तुम्ही कोणाला फालतुचे संदेश पाठवू शकत नाहीत.असे करताना पकडल्यास तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

१०. काही अरबी शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करणे आहे बेकायदेशीर

काही अरबी शब्द जसे अल्लाह, मस्जिद, रसूल आणि नबी यांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करणे बेकायदेशीर आहे.

==

हे ही वाचा : ….तर कदाचित गिलगीट बाल्टीस्तान भारताचा भाग असता!

==

pakistani-weird-laws-marathipizza05

 

हे कायदे कोणी बनवले त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?