' फ्लेक्स फ्युएल इंजिन्स म्हणजे काय? देशाची इंधन समस्या खरंच सुटणार का? – InMarathi

फ्लेक्स फ्युएल इंजिन्स म्हणजे काय? देशाची इंधन समस्या खरंच सुटणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वेहिकल स्क्रॅप पॉलिसीपासून ते ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरपर्यंत; भारताच्या वाहन व्यवसाय क्षेत्रात गेल्या वर्षभरात अनेक मोठे आणि लक्षणीय बदल झालेले पाहायला मिळाले आहे.

वाहन इंधनाची वाढत असलेली किंमत, काही प्रमाणात त्याचा देशातील महागाईवर होणारा परिणाम आणि त्यावरून सुरु असणारं राजकारण असे सगळेच विषय गेल्या काही महिन्यात प्रत्येक सामान्य व्यक्तीसाठी चर्चेचा विषय ठरलेले आहेत.

 

mahagai inmarathi 2

 

त्यातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स फ्युएल इंजिन हा विषय सुद्धा चर्चेत आणला आहे.

नजीकच्या भविष्यात फेल्क्स-फ्युएल इंजिन अनिवार्य ठरतील असं मत नितीन गडकरी यांनी मांडलं आहे. मात्र हे फ्लेक्स-फ्युएल इंजिन नेमकं आहे तरी काय? देशासाठी ही बाब नक्की का गरजेची ठरू शकते, ते समजून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

फ्लेक्स फ्युएल इंजिन म्हणजे…

फ्लेक्स-फ्युएल इंजिन म्हणजे फ्लेक्सिबल फ्युएल इंजिन! म्हणजेच एकाहून अधिक इंधनाचे पर्याय ज्या इंजिनच्या वापरासाठी चालू शकतात असं इंजिन होय. थोडक्यात काय, तर कुठलीही गाडी चालवण्यासाठी एकाच इंधनाचा पर्याय नसावा, तर किमान दोन इंधनांच्या साहाय्याने ती गाडी चालवता यावी.

 

flex fuel inmarathi

 

अशाप्रकारच्या इंजिन्समध्ये गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलचं मिश्रण असलेलं इंधन वापरलं जातं. असं इंधन वापरणं पर्यावरणपूरक सुद्धा ठरतं.

नितीन गडकरी यांनी फ्लेक्स-फ्युएलचं महत्त्व सांगताना हा मुद्दा अधोरेखित केला आहे. वायू प्रदूषण कमी करणारं हे इंधन स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतं, हादेखील त्याचा एक मोठा फायदा आहे.

देशाच्या इंधनासाठी होणार खर्च

भारताला वर्षभराची इंधनाची गरज भागवण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागतात, हे कळलं तर तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. वर्षभरात जवळपास ८ लाख कोटींची रक्कम निव्वळ खनिज तेलाची आयात करण्यासाठी खर्च होते.

येत्या पाच वर्षात हीच रक्कम जवळपास तिप्पट झालेली असेल असा अंदाज बांधण्यात आला आहे. म्हणजेच २५ लाख कोटी रुपये खनिज तेलाच्या आयातीवर खर्च होतील. अशावेळी खनिज तेलाची आयात कमी करण्यासाठी फ्लेक्स-फ्युएल हा एक उत्तम पर्याय ठरेल.

गडकरींचा फ्लेक्स-फ्युएलकडे ओढा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कामाची सचोटी, कामाची पद्धत आणि हाती घेतलेलं काम चोख पार पाडण्याची हातोटी नेहमीच दिसून येते. दूरदृष्टीने विचार करणारा हा नेता, आज या नव्या इंधनाचा वापर अत्यावश्यक असल्याचं सांगत आहे.

 

nitin gadkari flex engine inmarathi

 

येत्या काळात फ्लेक्स-फ्युएल हे इंधन वापरू शकणाऱ्या गाड्या बनवल्या जाव्यात, तसा नियम करण्यात यावा यासाठी ते आग्रही आहेत.

फ्लेक्स फ्युएलच्या वापराचा नेमका फायदा काय?

या इंधनाचा वापर वाढला, तर भारताला खनिज तेलावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागणार नाही. परिणामी भारताची आयात मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकेल. याशिवाय साखर कारखाने आणि उसाची शेती करणारे शेतकरी यांच्यासाठी ही एक फार मोठी सुवर्णसंधी ठरेल.

एवढंच नाही तर, सामान्य माणसाकरिता सुद्धा फ्लेक्स-फ्युएल हा चांगला पर्याय आहे. गगनाला भिडलेले, शंभरी पार गेलेले इंधनाचे भाव जर पुन्हा एकदा ६०-७० रुपये झालेले तुम्हाला पाहायला मिळाले तर?

 

petrol hike inmarathi

 

फ्लेक्स-फ्युएलचा वापर होऊ लागला, तर ही बाबा सहजशक्य आहे. हळूहळू पेट्रोल पंपांऐवजी ठिकठिकाणी इथेनॉल पंप दिसू लागणं ही काळाची गरज आहे, असं म्हणायला हवं.

गडकरी यांनी असंही सांगितलं आहे, की किर्लोस्कर आणि टोयोटासारख्या बड्या कंपन्या अशा प्रकारची इंजिन्स बनवू शकतात.

वायू प्रदूषण असो की इंधन दर, आयात कमी करून भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करणं असो किंवा भारतातील ऊस उत्पादकांसाठी वरदान ठरू शकणं; फ्लेक्स-फ्युएलचा वापर भारतासाठी नक्कीच फायद्याचा आणि आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं मंडळी?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?