' झोपेत बडबडण्याला हसण्यावारी नेऊ नका, वेळीच हे ५ उपाय केले नाहीत तर… – InMarathi

झोपेत बडबडण्याला हसण्यावारी नेऊ नका, वेळीच हे ५ उपाय केले नाहीत तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गाढ झोपेत प्रत्येकालाच स्वप्न पडतात. काही वेळा ही स्वप्न अगदी ठळक लक्षात राहतात तर बहुतांश वेळेला आपल्याला आपली स्वप्नं लक्षात राहत नाहीत. रात्री एखादं भितीदायक स्वप्न पडलं तर आपण दचकून जागे होतो. बरेच लोक भितीदायक स्वप्न बघितलं तर झोपेतून ओरडत किंचाळत जागे होतात. पण काही लोक चक्क झोपेत बोलतात आणि त्यांना सकाळी त्यातलं काहीही लक्षात नसतं.

 

scary dreams inmarathi1

 

लहान मुले तर झोपेत हसतात, रडतात अगदी बोलतातसुद्धा! काही लोकांना झोपेत चालण्याची सवय असते. अशा लोकांकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. काही लहान मुलांना “नाईट टेरर” चा त्रास होतो. म्हणजे रात्री झोपेत ही मुले भीतीने रडत जागी होतात, चालतात, पळतात अगदी बोलतात सुद्धा! पण त्यातलं त्यांना सकाळी काहीही लक्षात राहत नाहीत कारण ती मुले तेव्हा अर्धवट झोपेत असतात.

काही मोठी माणसे सुद्धा झोपेत बोलतात. अगदी जागेपणी बोलावे तसे झोपेत स्पष्ट बोलतात पण त्यातलं काहीही त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे इतरांना ते कितपत खरं आहे हा प्रश्न पडतो. पण ह्यामुळे त्या व्यक्तीच्या आणि मुख्य म्हणजे इतरांच्या झोपेचं खोबरं होतं हे मात्र नक्की!

 

sleep talking inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

– – –

झोपेत बडबड करणे हे हानीकारक नाही पण ही सवय म्हणजे भविष्यातील काही आजारांचे संकेत असू शकते. त्यामुळे ही सवय हसण्यावारी घेणे चांगले नाही. अनिद्रा, जास्त प्रमाणात असलेला ताप, ताणतणाव, मद्यपान, चिंता ह्यामुळे ही समस्या येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

तुमच्यापैकी देखील कुणाच्या बाबतीत असे घडत असेल तर पुढील उपाय करून बघा. कदाचित काही फरक पडेल.

१. पुरेशी झोप घेणे

शरीराची सगळी कार्ये सुरळीत चालण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. शांत झोपेमुळे शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी सगळी कामे करण्यासाठी शरीरात ऊर्जा असते. पण जर पुरेशी शांत झोप मिळाली नाही तर मेंदूला, शरीरालाही आवश्यक ती विश्रांती मिळत नाही.

 

sleeping inmarathi

 

झोपेची कमतरता हे झोपेत बडबडण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. जर तुम्ही झोपेत बोलत असाल आणि रोज आवश्यक असलेली सात ते नऊ तासांची झोप तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळापत्रकाचे मूल्यांकन करू शकता.

रात्रीचे जागरण किंवा पहाटे खूप लवकर उठणे ह्यामुळे झोप पूर्ण होत नाही. तुमचे झोपेचे वेळापत्रक निश्चित करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे हळूहळू सुरुवात करणे. झोपणे आणि उठणे ह्यात १५ मिनिटांची हळूहळू वाढ केल्याने हळूहळू तुमची झोपेची वेळ वाढेल.

जर तुम्हाला सकाळी उठण्यास त्रास होत असेल तर उठल्या उठल्या लगेच सूर्यप्रकाशात जा. किंवा खिडकीतून सकाळचा सूर्यप्रकाश खोलीत येईल अशी व्यवस्था करा.

 

guy wakes up early featured inmarathi
times of india

 

सूर्यप्रकाश तुमची सर्कॅडियन लय रीसेट करू शकतो आणि तुमच्या मेंदूला सिग्नल देईल की आता जागे होण्याची वेळ आली आहे.

२. चहा/ कॉफीचे सेवन कमी करा

तुम्हाला जर रात्री झोपेत बोलण्याची सवय असेल तर रात्री चहा किंवा कॉफीचे सेवन करू नका किंबहुना दिवसा सुद्धा चहा किंवा कॉफीचे अतिरिक्त प्रमाणात सेवन करू नये.

चहा, कॉफी सारख्या उत्तेजक पेयांमुळे झोपेवर परिणाम होतो हे तर अभ्यासाअंती सिद्ध झाले आहेच. चहा, कॉफी अतिरिक्त प्रमाणात प्यायल्याने आपली झोप प्रभावित होते आणि रात्री शांत झोप लागली नाही तर दिवसभर थकवा जाणवतो. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून शांत झोप लागत नाही आणि म्हणून झोपेत बोलण्याची समस्या होऊ शकते.

 

tea inmarathi
pixelproduction.in

 

जर तुम्हाला झोपेत बोलण्याची समस्या असेल तर दुपारी दोन नंतर कॅफिन असेलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

३. तणावापासून लांब राहा

तुमच्या मनावर खूप जास्त ताण असेल तरी झोपेमध्ये बोलण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्ही खूप तणावात असाल तर मनावरचा ताण हलका करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण तणावाचा आपल्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतो.

 

stress inmarathi
Medical News Today

 

ताणतणाव हलका करण्यासाठी कुठेतरी फिरायला जाणे, आवडत्या छंदात मन रमवणे,व्यायाम करणे, संगीत ऐकणे , पुस्तके वाचणे ह्या गोष्टी करू शकता. ह्या सर्व गोष्टींमुळे मनावरील ताण हलका होण्यास मदत होते. शांत झोप लागते आणि झोपेत बोलण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

गाढ झोपेतून खडबडून जाग येते का? मग त्यामागील वैज्ञानिक कारण समजून घ्या…

घोरणं थांबवण्याचे (पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय!

४. मद्यपानापासून लांब राहणे

जर तुम्हाला झोपेत बोलण्याची समस्या असेल आणि तुम्ही मद्यपान देखील करत असाल तर ही सवय कायमची सोडून द्या.

 

stressful guy drinking inmarathi

 

बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळेला मद्यपान करण्याची सवय असते आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि मग झोपेत बोलण्याची समस्या निर्माण होते. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर मद्यपानापासून चार हात लांबच राहा.

५. ध्यानधारणा करणे

हल्ली प्रत्येकाच्याच आयुष्यात ताण वाढला आहे. घरचा ताण, कामाच्या ठिकाणचे टेन्शन ह्यामुळे आयुष्य कठीण वाटू लागते आणि आपल्या दैनंदिन आयुष्यावर ह्याचा परिणाम होतो. परिणामी विविध आजार पाठीमागे लागतात.

उदाहरणार्थ, झोपेत बोलण्याची समस्या! ही समस्या दूर ठेवायची असल्यास आपल्याला तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. पण हे बोलणे सोपे आहे, कृती अवघड आहे. ठरवले तरी माणूस विचार करणे थांबवू शकत नाही. म्हणूनच ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करायला हवे. मेडिटेशन मुळे मन शांत ठेवण्यास मदत होते. तणाव हलका होतो आणि इतरही शारीरिक व मानसिक समस्या कमी होण्यास मदत होते.

 

maliaka yoga inmarathi

 

याशिवाय परिपूर्ण चौरस आहार, योग्य व्यायाम आणि छंदाची जोपासना केल्यास देखील झोपेची व झोपेत बोलण्याची समस्या दूर राहण्यास मदत होते.

झोपेत बोलणे – धोक्याची घंटा

१. झोपेत बोलणे हे शारिरीक आणि मानसिकृदृष्ट्या तणाव असल्याचे चिन्ह आहे हे आपण वाचले, मात्र याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर भविष्यात नैराश्य, अतिताण असे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.

२. अनेकदा झोपेमध्ये बोलल्याने आपण आपल्या मनातील सुप्त विचार नकळतपणे उघड करतो. अनेकदा यामुळे गैरसमज निर्माण होण्याची भिती असते.

३. झोपेत आपण असंबद्ध बोलतो, मात्र समोरील व्यक्ती त्याचा विपर्यास करू शकते. अनेकदा आपण न केलेल्या चुकीची शिक्षाही यामुळे भोगावी लागू शकते.

 

couple 1 inmarathi

 

४. आपण झोपेत बोलल्याने आपल्या कुटुंबियांच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे त्यांना होणारा त्रास, त्यांची चीडचीड थांबवायची असेल तर वेळीच काळजी घ्या.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?