वाढत्या पेट्रोल दरवाढीने सगळेच त्रस्त आहेत, मग ही गुडन्यूज तुमच्यासाठीच! वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“पेट्रोल शंभरी गाठेल” असं आपण कित्येक वर्ष म्हणत होतो आणि यावर्षी ते झालंच. पेट्रोलच्या पाठोपाठ डिझेलने सुद्धा काही राज्यात नुकतीच शंभरी पार केली आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही पेट्रोल, डिझेलचे भाव नियंत्रणात ठेवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत हे मान्यच करावं लागेल.
पेट्रोल, डिझेल महागण्याचे कारणं काहीही असतील. पण, यात भरडला जातोय तो सामान्य नागरिक. पेट्रोल पंपावर शंभरची नोट दिल्यावर त्याला पेट्रोलचा काटा निदान १ लिटरच्या पुढे जातांना बघण्याची सवय होती.
आता मात्र हे शक्य नाही आणि त्यामुळेच पेट्रोलच्या नावाने डोळ्यात पाणी येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण विविध वृत्तवाहिन्यांवर बघत आहोत.
सततच्या पेट्रोल दरवाढीचा जटील झालेला हा प्रश्न सुटेल तरी कधी आणि कसा? हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. केंद्रीय वाहतूक आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी ‘फ्लेक्स इंजिन’ चा पर्याय सुचवला आहे. काय आहे हे तंत्रज्ञान? जाणून घेऊयात.
“इथेनॉल हा पेट्रोल हा पर्याय असू शकतो” हे पण आपण खूप वर्षांपासून ऐकत आहोत. यावर बरेच प्रयोग झालेसुद्धा पण ते एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे यशस्वी झाले नाहीत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – सावधान! पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते!
–
इथेनॉलला लागणारा कच्चा माल आणि भारतातील पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या पेट्रोल, डिझेल इंजिनच्या गाड्यांमुळे भारतात पेट्रोलचा प्रश्न मधल्या काळात भीषण होत गेला.
नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे की, इथून पुढे भारतातील सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांनी ‘इथेनॉल बेस्ड फ्लेक्स इंजिन’ची निर्मिती करावी जेणेकरून सर्व गाड्या या इथेनॉलवर धावू शकतील.
पुढील तीन महिन्यांत फ्लेक्स इंजिनचा वापर भारतीय गाड्यांमध्ये कसा आमलात आणता येईल यासाठी केंद्र सरकार नियमावली जाहीर करणार आहे.
‘इथेनॉल – पॉवर्ड इंजिन व्हीकल्स प्रोजेक्ट’ हे या प्रकल्पाला नाव देण्यात आलं आहे. इथेनॉल बेस्ड फ्लेक्स इंजिनचा वापर हा ब्राझील, अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये खूप वर्षांपासून सुरू झाला आहे.
कार तयार करणाऱ्या कंपनी BMW, मर्सिडीज आणि टोयोटाने फ्लेक्स इंजिनची निर्मिती करण्यासाठी संमती दर्शवली आहे. इथेनॉलचा वापर जर भारतीय वाहनांमध्ये सुरू झाला तर त्याची किंमत ही प्रति लिटर रुपये ६० ते ६२ इतकी असेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
इथेनॉलची विक्री करण्यासाठी लागणाऱ्या इंधन विक्री केंद्रांचा परवाना देण्याची प्रक्रिया अगदी सोपी असेल अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक मंत्री यांनी लोकांना दिली आहे.
इथेनॉल इंधन मिळेल अश्या दोन पंप्सचं उदघाटन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं आहे.
नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केलं आहे की, “सुरुवातीचे काही वर्ष ग्राहकांना पेट्रोल, डिझेल किंवा फ्लेक्स इंजिनच्या गाड्या विकत घेण्याचा पर्याय असेल. पण, त्यानंतर भारतातील सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांना फ्लेक्स इंजिनच्या गाड्या तयार करणं हे बंधनकारक असणार आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधन दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. आम्ही दुचाकी गाड्या बनवणाऱ्या टीव्हीएस आणि बजाज या कंपन्यांना सुद्धा इथेनॉल पॉवर्ड इंजिन्स तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
इथेनॉलच्या वापराने भारताची क्रूड तेल आयात करण्याची खूप मोठी रक्कम ही वाचणार आहे. इथेनॉलची निर्मिती ही उसाच्या रसाच्या मळीपासून केली जाते. येणाऱ्या काही दिवसांत इथेनॉलची निर्मिती ही तांदूळ, मका यांच्यापासून सुद्धा शक्य आहे असं संशोधनातून समोर आलं आहे.
या प्रकारच्या इथेनॉल निर्मितीसाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांना आवाहन करण्यात आलं आहे. भारतात सध्या क्षमतेपेक्षा फक्त २०% इतक्या इथेनॉलची निर्मिती होते.
ही क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जावेत अश्या सूचना केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी संबंधित खात्याला दिल्या आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय लोकांचं महिन्याचं कोलमडलेलं बजेट जर का इथेनॉल मुळे नियंत्रणात येणार असेल तर या निर्णयाचं स्वागत होईल हे नक्की. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या सुचनांचं पालन होऊन हा बदल आपल्याला प्रत्यक्षात लवकरच दिसेल अशी आशा करूयात.
===
हे ही वाचा – ४ इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आणि तरीही महिन्याचा वीजबिलाचा खर्च फक्त ७० रुपये…
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
—
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.