' एका क्रांतिवीराला सलामी देण्यासाठी भारतीय रेल्वे इथे २ मिनिटे थांबते…!! – InMarathi

एका क्रांतिवीराला सलामी देण्यासाठी भारतीय रेल्वे इथे २ मिनिटे थांबते…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज भारतीय रेल्वे तुम्हाला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत नेऊ शकते, काश्मीर सारख्या दुर्गम भागात सुद्धा रेल्वे पोहचली आहे. काही दिवसाततच ती लोकांच्या सेवेत येईलच.

आज भारतासारख्या देशात ट्रेनचे पसरलेले जाळे जगाच्या एकूण रेल्वेच्या जाळ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर येते. आज जरी अनेक सेक्टर प्रायव्हेट होत असले तरी भारतीय रेल्वे पूर्णपणे प्रायव्हेट होणार नाही, असे खुद्द मागे रेल्वेमंत्री म्हणाले होते.

 

Indian railway InMarathi

 

भारतीय रेल्वे रोज हजारो कि.मी प्रवास करते अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेपासून दक्षिणेकडे, सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच रेल्वे फार कमी प्रमाणात सेवेत आहेत.

आज आपण कोकणात जाताना अथवा मुंबई पुणे हायवे वरून जात असताना घाटात ट्रेन थांबलेली दिसते, अनेकदा समोरून एक्सप्रेस येणार असेल तर साधी ट्रेन थांबते. पण भारतात अशा एका ठिकाणी जर ट्रेन थांबली नाही तर नक्कीच पुढे त्या ट्रेनचा अपघात होण्याची शक्यता असते.

 

khandwa inmarathi

 

मध्यप्रदेशातील खांडवा स्टेशनपासून जवळच असणाऱ्या एका मंदिरापाशी येऊन ही ट्रेन थांबते.याच मंदिराच्या आसपास तंट्या मामा या क्रांतिकारकाला इंग्रजांनी मारले होते. म्हणून दोन मिनटे थांबून त्यांना सलामी दिली जाते. त्यामुळे प्रवासी सुद्धा सुखरूप घरी पोहचतात. या परिसरातून जाताना इथे न थांबल्यास अपघात होतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तंट्या मामा कोण होते?

भारतात स्वातंत्र्याची पहाट जरी उशिराने उगवली असली तरी, त्यासाठी अनेकांनी आपली आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खर्ची घातली आहेत. त्याकाळात अनेक क्रांतिकारक आपापल्या क्षेत्रात उठाव करत होते. महाराष्ट्रात वासुदेव फडके असतील राजगुरू असतील, उत्तरेत रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद असतील.

 

tantay mama inmarathi

हे ही वाचा – रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते, का ते जाणून घ्या..

मध्यप्रदेश तेव्हा वेगळे राज्य म्हणून ओळखले गेले नव्हते, तेव्हा तंट्या मामा हे खांडवा जिल्ह्यातले भिल्ल समाजातले क्रांतिकारक होते. लहानपणापासूनच त्यांनी गोळाफेक, भालाफेक शिकले होते.

समाजातील गरिबी त्यांनी पहिली होती. उपासमारीमुळे अनेकजण मरत होते. तेव्हा त्यांनी ठरवले कुठला ही गरीब उपाशी राहणार नाही. म्हणून त्यांनी धनाढ्य व्यापाऱ्यांना लुटायला सुरवात केली.

इंग्रजांच्या जाणाऱ्या रेल्वेमधून भरभरून धान्य असते, हे लक्षत आल्यावर त्यांनी या ट्रेन लुटायला सुरवात केली. गरिबांचे नुसते पोट भरले नाही तर त्यांच्या मुलींची लग्न सुद्धा मामांनी लावून दिली होती.

 

mp mahar border inmarathi

 

मामांची एक खासियत होती ती म्हणजे ते कुठल्या एका गावात राहत नसायचे. सतत गाव बदलत असल्याचे. त्यामुळे त्यांना पकडणे मुश्कीलचे होते. त्यात अनेक गरिबांची मदत त्यांना मिळत असल्याने ते गरीबांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले होते. खांडवा जिल्ह्यपासून ते आपल्या खान्देश प्रांतापर्यंत त्यांची दहशत होती.

असा हा गरिबांचा मसीहा एके दिवशी पकडला गेला, कोर्टात त्यांच्यावर केस चालली आणि शिक्षा म्हणून फाशी द्यायचे ठरवले. मात्र क्रूर इंग्रजांनी त्यांना आज जिथे ट्रेन थांबते त्या परिसरात नेऊन गोळ्या घालून ठार केले आणि त्यांचा मृतदेह तिथेच फेकून दिला. त्यानंतर या मार्गावर अनेक रेल्वेअपघात झाले होते.

मामांच्या स्मरणार्थ भिल्ल स्थनिकांनी  तिकडे मंदिर बांधले आहे. आज त्या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे मामांना सलामी देण्यासाठी थांबतात.

रेल्वेचं काय म्हणणं आहे?

 

patalkund inmarathi

हे ही वाचा – कित्येक वर्षांपासून मोफत सेवा देणारा जगातील एकमेव रेल्वेमार्ग भारतात आहे!

भारतीय रेल्वेच म्हणणं आहे की, ‘हा भाग कठीण चढ़णाचा आहे,  इथे रेल्वेचा ट्रॅक बदलतो त्यामुळे ट्रेनचे ब्रेक तपासण्यासाठी इथे ट्रेन थांबवली जाते. इथेच मंदिर असल्यामुळे देवाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला लागतो.

==

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?