कोरोनाची लस वाया जाते म्हणजे नेमकं काय? ही कारणं आहेत भविष्यातील धोक्याची घंटा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“लस घेतली का ? दुसरा डोस घेतला का ? कुठे उपलब्ध आहे ? कोणत्या वयोगटासाठी आहे ? कोणत्या कंपनीची लस आहे ? ” आज या प्रश्नांनी आपल्या सर्वांचं डोकं जड झालं आहे. फोन हातात घेतल्यावर, टीव्ही लावल्यावर सगळीकडे फक्त लसीकरण हाच विषय बोलला जात आहे. आवश्यक सुद्धा आहे.
कोरोनाने मागच्या आणि या वर्षात जो काही उच्छाद मांडला आहे त्यामध्ये कित्येक लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. लोकांचा धीर सुटत चालला आहे. सतत येणारे ऍम्ब्युलन्सचे आवाज लोकांना घरात सुद्धा शांत बसू देत नाहीयेत.
“घरातच बसा” हे म्हणणं बरोबर आहे. पण, आता गरज आहे ते “लसीकरण करून घ्या आणि मग घरातच बसा” हे सांगण्याची.
एकीकडे लसीकरण दणक्यात सुरू झालं आहे. पण, दुसरीकडे स्टॉक नाही, म्हणून काही ठिकाणी लोकांना वापस यावं लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. तर, काही सेंटर वर लस पाठवण्यात आल्या आहेत. पण, लोकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे लस वाया सुद्धा जात आहेत हे समोर आलं आहे.
काही लोकांमध्ये अजूनही लस बद्दल गैरसमज आहेत हे सुद्धा समोर आलं आहे. “लस घेतल्यावर ताप येतो, मी तर घेणारच नाही” असे मत लोक इतरांना सांगून ते इतरांना सुद्धा संभ्रमित करत आहेत.
लस येईपर्यंत आपण त्याची डोळ्यात तेल घालून वाट बघत होतो. मग लस आल्यावर त्याबद्दल इतकी उदासीनता का ? हा प्रश्न लस न घेणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. लस उपलब्ध असूनही न घेणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की, आपल्यासाठी आहोरात्र झटणाऱ्या शास्त्रज्ञ आणि फार्मा कंपनीतील लोकांचा आपण एकप्रकारे अपमान करत आहोत.
–
हे ही वाचा – कोविड लसीबद्दलचे “हे” हानिकारक गैरसमज मुळापासून दूर होणं अत्यावश्यक आहे
–
आता, लस वाया जाते म्हणजे काय होतं ? हे सुद्धा जाणून घेऊयात.
लस वाया जाण्याचं प्रमुख कारण :
सरकार जेव्हा लस तयार करणाऱ्या कंपनीला प्रत्येक लसीकरणाची ऑर्डर करत असते तेव्हा पूर्ण ऑर्डर पैकी ‘वाया’ जाणारी लस ही बाब सुद्धा सरकारला लक्षात घ्यावी लागते. कारण, लसीकरण केंद्रातून येणाऱ्या मागणीचा काही भाग हा अतिरिक्त साठा म्हणून ऑर्डर करण्यात आलेला असतो.
एक अशी माहिती समोर आली आहे की, प्रत्येक लसीकरण केंद्रावर जवळपास १०० लस वाया जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. लसीकरण केंद्राला मागणीचा अंदाज न आल्याने सुद्धा लस वाया जात आहे हे सुद्धा समोर येत आहे.
लस वाया जाण्यामध्ये तेलंगणा राज्य सर्वात पुढे आहे. महाराष्ट्रात लस वाया जाण्याचं प्रमाण सर्वात कमी आहे. याचं कारण, लोकांची जागरूकता हे सुद्धा आहे आणि मागणीपेक्षा लस पुरवठा कमी झाला आहे हे सुद्धा म्हणता येईल.
लस किती वाया गेल्या ? हे कसं मोजलं जातं ?
१०० लस पैकी किती लसींचं लसीकरण होत नाहीये ही नोंद करून ठेवली जाते. सध्या हे प्रमाण १.१ इतकं आहे हे सांगण्यात येत आहे. एका महिन्यात एका लसीकरण केंद्रावर किती लस लागतील ? हे काढण्यासाठी एक सूत्र वापरलं जातं:
अपेक्षित लस संख्या = (जागेची पूर्ण लोकसंख्या ) x ( वयानुसार किती लोकांना लस द्यायची आहे / कॅम्पेन चा कालावधी ) x प्रत्येकी २ डोस x लस वाया जाण्याचं प्रमाण.
हे सूत्र बघितल्यावर लक्षात येईल की, लस वाया जाणार हे गृहीतच धरण्यात आलं आहे.
लस वाया जाण्यासाठी हे ६ प्रमुख कारणं समोर आली आहेत
१. लसीची ‘एक्सपायरी’ तारीख जवळ आली
२. लस गरम ठिकाणी ठेवण्यात आली
३. लस ही प्रमाणापेक्षा अधिक थंड ठिकाणी ठेवली आणि ती गोठली
४. लसीची बाटली लस हाताळतांना फुटली
५. पाठवलेल्या लस आणि मिळालेल्या लस यामध्ये तफावत आल्यास तितक्या लस वाया गेल्याची नोंद केली जाते. ही तफावत रस्त्यात लस ची होणारी चोरी यामुळे सुद्धा होते असं काही ठिकाणी समोर आलं आहे.
६. लस ही लसीकरण केंद्रावर पोहोचली. पण, तितके लोक केंद्रावर आलेच नाहीत.
आपल्याला हे शेवटचं कारण या यादीत असूच नये हे बघायचं आहे.
लसीची बाटली उघडल्या नंतर सुद्धा लस वाया जाण्याचे हे प्रमुख कारण समोर आली आहेत:
१. लसीच्या बाटलीचं झाकण उघडल्यानंतर त्यामध्ये पाण्याचा थेंब पडल्यावर लस खराब होते.
२. लसीकरण थांबवल्यानंतर उरलेल्या लसींची योग्य संख्या न दिल्यावर आणि तितक्या कमी लस परत पाठवल्या जातात आणि तितक्या लस वाया जातात.
३. ज्या लस परत पाठवल्या जातात त्यामध्ये सुद्धा ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा काही लस खराब होतात हे समोर आलं आहे.
–
हे ही वाचा – ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा
–
प्रामुख्याने ट्रान्सपोर्ट मध्ये, लसीचा साठा करण्यात आणि लसीचा वापर करतांना लस वाया जात असल्याचं समोर आलं आहे.
एका लसीच्या बाटलीमध्ये १० जणांना लसीकरण करण्याची क्षमता असते. जर ती बॉटल उघडल्यानंतर त्या केंद्रावर फक्त ६ लोक हजर असतील तर ४ लोकांचा डोस हा वाया जात असतो. हे टाळण्यासाठी सर्व केंद्रांना १० लोकांपेक्षा कमी लोक केंद्रावर हजर असतील तरच लसीची बाटली उघडावी अश्या सूचना नुकत्याच देण्यात आल्या आहेत.
“लोकांना १० लोक पूर्ण होईपर्यंत एक तर थांबवा किंवा दुसऱ्या दिवशी बोलवा” अश्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा काही केंद्रांवर लोकांना परत जावं लागत आहे. अश्या वेळी आपण सुद्धा हे समजून घेऊन लसीकरण केंद्राला सहकार्य केलं पाहिजे.
लस वाया जाण्याचं अजून एक कारण लसीकरण केंद्रावरील लोकांना देण्यात आलेली अपूर्ण माहिती किंवा ट्रेनिंग हे सुद्धा मानलं जात आहे. काही केंद्रावर लसीकरण करतांना १० पैकी ९ डोस घेऊनच बाटली टाकून दिल्याचं समोर आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नुकत्याच केलेल्या निवेदनात लस वाया जाण्याबद्दल तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांना विशेष काळजी घेण्यासाठी सांगितलं आहे. आपल्या निवेदनात त्यांनी खालील सुचनांचं त्वरित पालन व्हावं असं सांगितलं आहे :
१. लसीकरण केंद्रावर आधी आलेल्या लसीचा वापर आधी व्हायला पाहिजे. तसं केल्यावर लसीच्या ‘एक्सपायरी’ तारखेवर नियंत्रण ठेवता येईल.
२. लसीकरण केंद्र वाढवणे. त्यासाठी सरकारी, खाजगी जागांचा वापर सुरू करणे.
“प्रत्येक लस ही महत्वाची आहे. एक वाया गेलेली लस ही कोणाचा जीव वाचवू शकते” ह्या नजरेने त्याकडे बघितल्यास प्रत्येक जण लस वाया न जाण्यास सतर्क प्रयत्न करेल. करायलाच पाहिजे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.