' मिशन इम्पॉसिबल – भारतीय गुप्तचर संस्था RAW च्या ७ धाडसी मोहिमा… – InMarathi

मिशन इम्पॉसिबल – भारतीय गुप्तचर संस्था RAW च्या ७ धाडसी मोहिमा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुप्तहेर संस्था कसं काम करत असतील? याबद्दल प्रत्येकाच्या मनात नेहमीच एक उत्सुकता असते. गुप्तहेर संघटनांमुळे वाचलेले अपघात, हल्ले, पकडले गेलेले अतिरेकी यांची माहिती प्रकाशित केली जाते. पण, यश मिळवण्यासाठी या संघटनांनी काय शर्थीचे प्रयत्न केले होते?

ते मात्र आपल्याला वृत्त वाहिनीवर किंवा एखाद्या सिनेमातून अगदी ओझरतं कळत असतं. ‘रिसर्च अँड अनॅलिसीस विंग’ म्हणजेच ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेचे ‘प्रतिनिधी’ बनून एखाद्या प्रकरणाचा छडा लावतांना आपण कित्येक बॉलिवूड अभिनेत्यांना बघितलं आहे.

गुप्तहेर संघटना जेव्हा विविध ‘मिशन’ प्रत्यक्षात राबवत असतात, तेव्हा त्या घटनांचं हे प्रतिनिधी नियोजन कसं करतात? एक कोड वर्ड नाव देऊन ठरवलेलं ‘मिशन’ तडीस कसं नेलं जातं?

 

raw IM

 

हे गोपनीय ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. काही काळ लोटल्यानंतर ही माहिती उपलब्ध केली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९६८ मध्ये स्थापन झालेल्या भारताच्या सर्वात मोठ्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेने आजवर हजारो मोहीम फत्ते केल्या असणार यात वादच नाही. ‘रॉ’ने यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ७ मिशनची माहिती या लेखात देत आहोत :

१. ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा :

 

operation smiling buddha IM

 

१९७४ मध्ये भारताचा अणूचाचणी कार्यक्रम व्यवस्थितपणे राबवता यावा यासाठी ‘रॉ’ची मदत घेण्यात आली होती. या मिशन मध्ये आपले शास्त्रज्ञ काय करत आहेत? त्यांचं पुढचं पाऊल काय असेल? याबद्दल गोपनीयता राखणे ही ‘रॉ’ची प्रमुख जबाबदारी होती.

अणूचाचणी होत असतांना कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये, त्यासाठी लागणारी सर्व सामुग्री पोखरणमध्ये उपलब्ध करून देणे हे काम ‘रॉ’ने चोखपणे केलं होतं. १५ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे १५ किलोटन प्लुटोनियम यंत्राची यशस्वीपणे चाचणी केली.

भारताने ज्या गुप्ततेने हे संपूर्ण मिशन पूर्ण केलं त्यावरून अमेरिका, चीन आणि पाकिस्तान या देशातील गुप्तहेर संघटनांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

२. खलिस्तान चळवळ :

 

khalistan IM

 

१९८० च्या दशकात काही शीख समुदायाने आपल्यासाठी ‘खलिस्तान’ नावाचा स्वतंत्र देश असावा अशी मागणी केली होती. ‘खलिस्तानी मिलिटंट’ ही संस्था सतत आंदोलनं करत होती. या आंदोलनाचा फायदा घेऊन ‘आयएसआय’ या अतिरेकी संघटनेचे लोक भारतात दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करत होते.

स्थिती केंद्र सरकारच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची वेळ आली तेव्हा ‘रॉ’ला पाचारण करण्यात आलं होतं. ‘रॉ’ने ‘सीआयटी-एक्स’ आणि ‘सीआयटी-जे’ नावाच्या दोन तुकड्या तयार केल्या.

‘काउंटर इंटेलिजन्स टीम जे’ या तुकडीने खलिस्तानी मिलिटंटच्या आंदोलनाला हाणून पाडलं. इतकंच नाही तर, ‘सीआयटी-जे’ने ‘आयएसआय’च्या अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केलं आणि त्यांना छुप्या मार्गाने मदत करणाऱ्या पाकिस्तानला सुद्धा त्यांनी सज्जड दम भरला आणि ही चळवळ थांबवली.

३. ऑपरेशन मेघदूत :

 

operation meghdoot IM

 

‘रॉ’च्या या ऑपरेशनमुळे हजारो लोकांचा जीव वाचला होता. लंडनच्या एका कंपनीकडून ‘रॉ’ला ही माहिती मिळाली होती की, एक विशिष्ठ प्रकारचा ‘गियर’ आहे जो की उत्तरेकडील लडाखच्या सैन्याने लंडनहून मागवला होता आणि त्याच प्रकारचा ‘आर्क्टिक गियर’ हा पाकिस्तानच्या सैन्याने सुद्धा मागवला आहे.

यामध्ये काहीतरी गडबड असल्याचं भारतीय गुप्तहेर संघटनेच्या लक्षात आलं. अधिक तपास केल्यावर ‘रॉ’ला ही माहिती कळली की, या गियर द्वारे पाकिस्तान सियाचीन भागात हल्ला करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा असल्याची पक्की माहिती आपल्या गुप्तहेरांना कळली होती.

‘रॉ’च्या माहितीनुसार भारतीय आर्मीची एक तुकडी सियाचीनमध्ये पाठवण्यात आली आणि संपूर्ण भागावर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं. भारताला पाकिस्तानचा हा कट उलथवून टाकण्यात ‘रॉ’च्या तत्पर कृतींमुळे यश आलं.

४. ऑपरेशन चाणक्य :

 

operation chanakya IM

 

१९८५ मध्ये काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असतांना या हिंसाचारामागे कोण आहे? हे शोधण्यासाठी आणि वातावरण पूर्ववत करण्याची जबाबदारी ‘रॉ’ला देण्यात आली होती.

‘रॉ’ने ही कामगिरी देखील चोखपणे बजावली आणि त्यांनी काश्मीरच्या लोकांमध्ये समाविष्ट होऊन त्यांना भांडणासाठी चिथवणारे ‘आयएसआय’चे अतिरेकी शोधून काढले आणि त्यांना कंठस्नान दिलं. ‘रॉ’ने या सर्व घडामोडींमागे ‘आयएसआय’चा असलेला हस्तक्षेप सिद्ध करून दाखवला.

ऑपरेशन चाणक्यमुळे सुंदर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली. या ऑपरेशननंतर भारतावर नितांत प्रेम करणारे लोक एकत्र आले हे या ऑपरेशनचं सर्वात मोठं यश मानलं जातं.

५. ऑपरेशन कॅक्टस :

 

operation cactus IM

 

नोव्हेंबर १९८८ मध्ये ‘पीपल्स लीबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तामिल इलेम’ या विद्रोही संस्थेत काम करणारे २०० तामिळ लोक एकत्र आले आणि त्यांनी ‘मालदीव’वर हल्ला केला होता.

मालदीवला कोणत्याही प्रकारची झळ पोहोचू नये यासाठी भारतीय नेव्ही, आर्मी आणि रॉ एकत्र आले आणि त्यांनी ‘ऑपरेशन कॅक्टस’चं नियोजन केलं.

हे ऑपरेशन प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वात आधी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संवाद साधून त्यांना विश्वासात घेण्यात आलं आणि त्या बेटावर आलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.

‘इंडियन एअरफोर्स’ने आग्राहून मालदीवला एक विमान पथक पाठवलं आणि त्यांनी तामिळ लोकांचा हल्ला परतवून लावला आणि या मोहिमेत आपलं महत्वाचं योगदान दिलं. आर्मी, नेव्ही आणि रॉ एकत्र येऊन पार पाडण्यात आलेलं हे आजवरचं एकमेव मिशन आहे.

६. ऑपरेशन लीच :

 

operation leech IM

 

‘म्यानमार’ हा देश भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. ‘म्यानमार’च्या चारी बाजूने जंगल असल्याने तिथे गुन्हेगारी, अतिरेकी कारवायांचं प्रमाण वाढत चाललं होतं.

म्यानमारच्या दिशेने भारतावर हल्ला होऊ शकतो अशी बातमी मिळताच ‘रॉ’ने सुरक्षेच्या दृष्टीने तर पावलं उचललीच, त्याशिवाय म्यानमारमध्ये कचीन स्वतंत्र आर्मीची (किया) स्थापना ‘रॉ’ने घडवून आणली. ‘रॉ’ने किया ला अवजारे सुद्धा पुरवली. पण, कालांतराने असं लक्षात आलं की, या अवजारांचा गैरवापर होत आहे.

‘बर्मी’ नावाने एक अतिरेकी संघटना म्यानमारमध्ये कार्यरत झाली होती ज्यांनी लोकांना भडकावून त्यांना भारता विरुद्ध अतिरेकी कारवाई करण्यासाठी तयार केलं होतं.

१९९८ मध्ये ‘रॉ’ला हे कळताच त्यांनी ‘ऑपरेशन लीच’ तयार केलं आणि त्यांनी ६ अतिरेक्यांचा खात्मा केला आणि त्यांना मदत करणाऱ्या ३४ लोकांना म्यानमार सरकारच्या मदतीने त्यांनी अटक केली.

७. परदेशी गुन्हेगारांना अटक :

भारतात अपराध करून परदेशात पळून गेलेले कित्येक गुन्हेगार असतात. ‘रॉ’ या सर्व अपराधी लोकांवर नेहमीच करडी नजर ठेवून असते. संबंधित देशांना विनंती करून ‘रॉ’ या देशातील संशयितांना भारतात घेऊन येते आणि अज्ञातस्थळी ठेवते. लांबलचक प्रक्रिया वाचवण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते.

अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे आजवर ‘रॉ’ने नेपाळ, बांगलादेश या देशांमधून ४०० गुन्हेगारांना अटक केल्याची नोंद आहे.

 

baby movie scene IM

 

खलिस्तान कमांडो फोर्सचा अतिरेकी भुपिंदर सिंग भुदा, लष्कर मिलिटंट्सचा तारीक मोहम्मद आणि अब्दुल करीम, मुंबईत २००८ मध्ये दंगल घडवून आणणारा इंडियन मुजाहिद्दीनचा यासिन हे परदेशात जाऊन अटक केलेल्या काही अतिरेक्यांची नावं आहेत.

‘रिसर्च अँड अनॅलिसीस विंग’ ही भारताच्या सुरक्षेसाठी किती महत्वाची संस्था आहे हे या उदाहरणांवरून लक्षात येतं. ‘आपण सुरक्षित आहोत’ ही भावना सर्वांच्या मनात निर्माण करणाऱ्या ‘रॉ’च्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?