' केसांना फाटे फुटत आहेत? या टिप्स वापरा, केसही घनदाट होतील – InMarathi

केसांना फाटे फुटत आहेत? या टिप्स वापरा, केसही घनदाट होतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाढत्या प्रदूषणामुळे, अन्नातील भेसळीमुळे, बदलत्या हवामानामुळे आपल्या शरीरावर भरपूर परिणाम होतो. सध्या बऱ्याच मुलींना केसांना फाटे फुटण्याची समस्या जाणवते आहे. त्यामुळे केस राठ आणि निस्तेज दिसतात, नाजूक होऊन मधूनच तुटायला लागतात.

पूर्वीच्या काळी ही समस्या फार क्वचितच स्त्रियांना होत असे, पण अलीकडे शाळेत जाणाऱ्या लहान मुलींपासून ते सगळ्याच वयोगटातील महिलांना याचा त्रास होतोय. या फाटे फुटलेल्या केसांवर आतापर्यंत आपल्याला एकच उपाय माहित होता, तो म्हणजे केस कापणे.

इतक्या हौसेने वाढवलेले केस कापावे लागतात, तेव्हा खूप वाईट वाटतं, हो ना? पण केस न कापता काही घरगुती उपायांनी, घरच्या घरीच आपण हे फाटे अवघ्या १५ दिवसात घालवू शकतो. कसे ते जाणून घेऊया!

१) केस थोडेसे कापा –

 

hair cut inmarathi2

 

ट्रिम करणे म्हणजे केस खालून अगदी इंच भर भाग कापून घेणे. ३-४ महिन्यांतून एकदा आपण आपले केस ट्रिम करायला हवेत, याने केस भरभर वाढतात व फाटे फुटत नाहीत.

२) भरपूर पाणी प्या –

 

water-health-inmarathi05

 

पाणी म्हणजेच सुदृढ शरीर! हे समीकरण कायम लक्षात असू द्या. आपल्या केसांसाठी आपण नेहमी हायड्रेटेड राहणे फार आवश्यक असते. याने आपल्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि केस निरोगी राहतात.

म्हणूनच, रोज ८-१० ग्लास पाणी प्याच.

===

हे ही वाचा – गळणाऱ्या केसांना घरगुती उपायांनी ब्रेक लावायचा असेल तर या टिप्स उपयोगी ठरतील

===

३) केमिकलयुक्त उत्पादने टाळा –

 

hair-colour-inmarathi

 

केसांना स्ट्रेट, कुरळे करण्यासाठी, रंगवण्यासाठी, केसांची स्टाईल सेट करण्यासाठी आपण केमिकलयुक्त उत्पादने वापरतो. केसांची सगळ्यात जास्त हानी या सगळ्या उत्पादनांमुळे होत असते. त्यामुळे यांपासून लांबच राहिलेलं बरं!

४) सतत केस धुणे टाळा –

 

hair wash inmarathi1

 

आठवड्यातून २ वेळा केस धुवावेत. तुम्ही जर एक दिवसाआड केस धूत असाल, तर शरीरातील नैसर्गिक तेल व बॅक्टरीया यांना इजा पोहोचवत आहात, शिवाय शॅम्पूमुळे केस खराब होतात.

५) अंड्याचा वापर करा –

 

-Eggs-on-Hair inmarathi

 

अंड्यात प्रोटीनची मात्रा भरपूर असल्याने, आपल्या केसांना मुळापासून मजबुती देण्यात आणि मॉइश्चरायझर म्हणून त्वचा कोरडी होऊ न देण्यात अंडं फार महत्त्वाचं ठरतं. अंड्याने केसांना चमक आणि मऊपणा पण येतो.

अंड्याचे खाली दिलेले मास्क आठवड्यातून २ वेळा लावल्याने तुम्हाला भरपूर फरक जाणवेल.

कृती –

अंड्यात १ चमचा ऑलिव्ह ऑइल, बदामाचे तेल आणि मध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मास्क आपल्या केसांना लावून, ३०-४५ मिनिटे राहू द्या व त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या.

६) मध वापरा –

 

honey inmarathi

 

मधाचे गुणधर्मजो कोरड्या केसांना ओलावा प्रदान करतात त्यामुळे, केस कोरडे होऊन फाटे फुटले असतील, तर ते कमी होतात. मधातल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात.

नुसतंच मध केसांना लावलं, तर केस चिकट होतील त्यामुळे, खाली दिलेला मास्क केसांना लावा.

कृती –

३ चमचे मध घेऊन त्यात २ चमचे दही , थोडे ऑलिव्ह ऑइल आणि जमल्यास एक अंड टाका. हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या आणि मग केसांना लावून २०-२५ मिनिटे वाळू द्या. हे मिश्रण केसांच्या टोकांच्या तुलनेत डोक्याच्या त्वचेला आणि केसांच्या मुळांना जास्त लावा.

७) केमोमाईल टी बॅग्स वापरा –

 

chamomile flower inmarathi

 

यातील अँटीसेप्टिक गुणांमुळे डोक्याच्या त्वचेवरील मृत पेशी पूर्णपणे निघून जातील आणि केस सतेज दिसतील.

कृती –

बाजारात केमोमाईल टी बॅग्ज उपलब्ध असतात. उकळत्या पाण्यात दोन टी बॅग्ज टाकून ठेवा. त्या पाण्याला गार होऊ द्या आणि ह्या पाण्याने आपले केस नीट धुवा. केमोमाईल ऑइलने केसांची मालिश केली, तरीही इतकाच फायदा होईल.

===

हे ही वाचा – तरुण वयातच केस पांढरे का होतात? त्यावर तुम्ही काय करू शकता?

===

८) उडदाच्या डाळीचा मास्क वापरा –

चकित झालात? उडीद डाळ ही लोह, फॉस्फरस, फॉलीक ऍसिड आणि फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. हे सगळे घटक रक्तातील ऑक्सिजन केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. म्हणून, आहारातही आपण उडदाच्या डाळीचा भरपूर समावेश करायला हवा.

कृती –

अर्धी वाटी उडदाची डाळ, १ चमचा मेथीदाणे आणि ओलाव्या साठी थोडे दही घालून या गोष्टी नीट बारीक वाटून घ्या. ही पेस्ट केसांना लावून एक तास वाळू द्या. नंतर केस धुवा.

९) पपईचा वापर करा –

papaya Inmarathi

 

पिकलेल्या पपईत फॉलीक ऍसिड आणि व्हिटॅमिन ए असते. याशिवाय पपई केसांत मॉइश्चर निर्माण करून केस राठ होण्यापासून थांबवते.

कृती –

पपईचे काप आणि दही यांना मिक्सर मध्ये नीट मिक्स करून घ्या आणि ही पेस्ट केसांना लावून ३०-४५ मिनिटे वाळू द्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.

१०) खोबरेल तेल लावा –

 

oiling hair inmarathi3

 

खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी किती महत्वाचे आणि उपयोगी असते हे वेगळे सांगायलाच नको. आपण दैनंदिन जीवनात सुद्धा ह्या तेलाचा वापर करतो, पण आजकाल सिल्की केसांच्या फॅशनमुळे व बाहेर असलेली धूळ केसांना चिकटू नये म्हणून आपण तेल फार लावत नाही.

आठवड्यातून २-३ वेळा कोमट तेलाने मालिश करून ते तेल किमान २ तास तरी त्वचेत मुरू दिले, तर आपल्याला भरपूर फायदे जाणवतील. त्यामुळे आठवड्यातून वेळ काढून २ वेळा २ तासांसाठी तेल केसांना लावून ठेवा व कोमट पाण्याने केस धुवून घ्या. 

११) कोरफडीचा गर लावा –

 

aloe vera juice inmarathi

 

कोरफडीचा गर काढून आपल्या केसांना लावा आणि ३०-४० मिनिटे वाळू द्या व नंतर केस नीट धुवून घ्या. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल.

मग करताय ना ट्राय? तुमच्याकडे असे काही उपाय असतील, तर खाली कमेन्ट करून आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

===

हे ही वाचा – रोज गळणाऱ्या केसांचं कारण आहेत तुमच्याच या १० सवयी, आजपासूनच बदला

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?