Site icon InMarathi

शिक्षकी पेशा, दुर्गापूजा आणि सिक्रेट डायरी : वाचा, प्रणबदांच्या १३ “अज्ञात” गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागे काही दिवसांपूर्वी पत्रकार राजदीप सरदेसाई याने प्रणब मुखर्जी यांना श्रद्धांजली या आशयाचे ट्विट करून एकच हडकंप उठवला होता.

प्रणबदांच्या चिरंजीवांनी त्याचे खंडन करून राजदीपला चांगलेच सुनावले होते.

या वादाच्या पार्श्वभूमीवर देशाला कळून चुकलं, की माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.

आज दिनांक ३१ ऑगस्टला त्यांना देवाज्ञा झाली. ते ८४ वर्षाचे होते.

१९६९ ला भारतीय राजकारणात प्रवेश करून २०१७ साली देशाच्या राजकारणातील सर्वोच्च पद- राष्ट्रपती पदावरून ते निवृत्त झाले.

 

dnaindia.com

 

वित्त मंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री ते राष्ट्रपती पदापर्यंत त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांसोबत सुद्धा त्यांचे मैत्रीचे संबंध होते.

तर, आज प्रणबदांबद्दल अज्ञात अशा गोष्टींचा उलगडा करून त्यांना एक छोटीशी श्रद्धांजली द्यायचा हा प्रयत्न!!

१. राजकारणात सक्रिय व्हायच्या आधी प्रणब मुखर्जी प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.

बंगालच्याच विद्यानगर कॉलेज मध्ये ते राज्यशास्त्र शिकवायचे. ते १९६३ पर्यंत तेथे कार्यरत होते.

२.शिक्षकी पेशात यायच्या आधी प्रणबदा देशर डाक (मातृभूमीची साद) या स्थानिक बंगाली भाषिक वर्तमानपत्रासाठी पत्रकाराचे काम करायचे.

 

odishabytes.com

 

३ .स्थानिक राजकारणात ‘लिमिटेड’ सक्रिय असणाऱ्या प्रणबदांना माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय राजकारणात आणले.

१९६९ साली इंदिरा गांधी यांनी प्रणबदांना राज्यसभेची उमेदवारी देऊन संसदेत आणले.

 

indiatvnews.com

 

४. प्रणब मुखर्जी आपल्या कामाशी एकनिष्ठ होते. त्यांची कन्या शर्मिष्ठा सांगते, ते पदावर कार्यरत असताना दिवसाचे १८-१८ तास काम करायचे. सुट्टी घेणे त्यांना माहीतच नव्हतं.

ते फक्त दुर्गापूजेच्या वेळेस आपल्या सुट्या वापरत असत. दुर्गापूजेसाठी ते त्यांच्या मूळ गावी मिरती येथे जात असत. पूजेनंतर मात्र तडक ते आपलं केबीन गाठत असत.

५. प्रणब मुखर्जी हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.

ते एकमेव असे मंत्री आहेत, ज्यांनी चार पेक्षा जास्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. वित्त, संरक्षण, परराष्ट्र आणि राष्ट्रपती.

६. १९८४ मध्ये युरोमनी या मॅक्झिनने केलेल्या सर्व्हे मध्ये “बेस्ट अर्थमंत्री” म्हणून प्रणब मुखर्जी यांना सर्वोच्च स्थान दिले गेले होते.

मंत्री मंडळात आपली टीम उतरवण्याच्या हेतूने राजीव गांधी यांनी प्रणबदांना अर्थमंत्री पदावरून काढून टाकले होते.

 

hindustantimes.com

 

त्याच वेळेस आलेल्या या सर्व्हेने त्याकाळी मोठी उलथापालथ केली होती.

७. प्रणब मुखर्जी हे एकमेव अर्थमंत्री आहेत ज्यांनी ७ वेळा संसदेत बजेट सादर केले आहे.

८. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रणब मुखर्जी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला. ‘राष्ट्रीय समाजवादी पार्टी.’

राजीव गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे प्रणबदा थोडे बाजूला झाले होते.

पुढे १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्या सोबत झालेल्या तडजोडी नंतर प्रणबदांनी आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन केला.

९. प्रणबदा मागच्या ४० वर्षांपासून डायरी लिहीत आहेत. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर ती डायरी सार्वजनिक केली जाईल. त्यामधून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू खुले होतील.

 

thehindu.com

 

१0. भारताचे १३वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, प्रणब मुखर्जी यांनी दहशतवादी अजमल कसाब, याकूब मेनन आणि अफजल गुरू याच्या सहित तब्बल सात गुन्हेगारांचा दयेचा अर्ज नामंजूर केला होता.

११. शिक्षकाने शिक्षकी पेशा जरी सोडला असला, तरी तो शेवट पर्यंत शिक्षकचं असतो हे प्रणबदांनी दाखवून दिले आहे.

५ सप्टेंबर २०१५, शिक्षक दिनादिवशी दिल्लीच्या सरकारी माध्यमिक शाळेतल्या मुलांची प्रणबदांनी दिल्लीच्याच राष्ट्रपतींच्या अखत्यारीत येणाऱ्या इस्टेट मध्ये शाळा भरवली होती आणि त्यांना भारताच्या राजकारणातला इतिहास शिकवला होता.

अशी कृती करणारे ते आतापर्यंतचे एकमेव राष्ट्रपती आहेत.

१२. प्रणब मुखर्जी यांनी अनेक पुस्तकांचे लेखन सुद्धा केले आहे.काही पुस्तके पुढील प्रमाणे : 

Emerging Dimensions of Indian Economy (1984)

Saga of Struggle and Sacrifice (1993)

The Dramatic Decade: The Indira Gandhi Years (2014)

Selected Speeches: Pranab Mukherjee

the President of India (2015)

The Turbulent Years: 1980 – 1996 (2016)

१३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणारे प्रणब मुखर्जी हे पहिलेच आणि एकमेव काँग्रेस संबंधित नेते आहेत. प्रणबदांनी या निर्णयामुळे अनेक काँग्रेसी नेत्यांची निराशा त्यांनी ओढवून घेतली होती.

 

english.mathrubhumi.com

 

अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या बहुगुणी नेत्याला आज देशाने गमावले आहे. प्रणबदांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version