Site icon InMarathi

आपल्या डिफेन्स फोर्स मधल्या प्रत्येक “सॅल्युट” मागची ही कारणं तुम्हाला ठाऊक नसतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. अनेक चांगल्या – वाईट प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पडत आहे. युद्धात सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला पायलट होण्याचा मान गुंजन सक्सेना यांनी मिळवला आहे.

त्यांचे शौर्य खरोखरंच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळेच या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र हा चित्रपट चर्चेत आला आहे, तो आणखी दोन महत्त्वपूर्ण कारणांमुळे!

भारतीय वायुसेनेची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आली असल्याचं वायुसेनेचं म्हणणं आहे. काही चुकीचे प्रसंग वायुसेनेची प्रतिमा मलिन करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात असा आक्षेपदेखील घेण्यात आला आहे.

थेट वायूसेनेचा आक्षेप पाहिल्यानंतर, या चित्रपटामधील चुकांवर प्रकाश टाकण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुद्धा चढाओढ लागली असल्याचं दिसतंय.

सोशल मीडियावर अशा चुकांचा उल्लेख करणाऱ्या पोस्ट्स नेटिझन्स करत आहेत. यातच, अभिनेत्री जान्हवी कपूर हिने केलेला सॅल्यूट कसा चुकीचा आहे, अशा आशयाच्या पोस्ट सुद्धा पाहायला मिळत आहेत.

 

thequint.com

 

‘वायुदलात असलेली गुंजन आर्मीमधील सॅल्यूट कसा करेल?’ हा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत. भारतीय सैन्यातील सॅल्यूट करण्याच्या नेमक्या पद्धती आणि त्यामागची कारणं काय आहेत, हे आज जाणून घेऊयात.

चित्रपटातील प्रसंगात, हाताचा पंजा जमिनीशी समांतर धरून (९० अंशाच्या कोनात) भारतीय आर्मीच्या पद्धतीने गुंजन तिच्या वरिष्ठांना सॅल्यूट करत आहे. ही गोष्ट आहे १९९९च्या कारगिल युद्धातील!

ज्यावेळी वायुसेनेचा आणि आर्मीचा सॅल्यूट एकाच प्रकारचा होता. फक्त नौदलातील अधिकारी वेगळ्या पद्धतीने सॅल्यूट करत असत. नव्या पद्धतीने सॅल्यूट करण्याची प्रथा वायुसेनेत २००६पासून अस्तित्वात आली.

म्हणजेच, चित्रपटात दाखवण्यात आलेला सॅल्यूट योग्यच आहे. त्यात काहीही चूक नाही.

भारतीय सैन्यदलातील या तिन्ही सेना वेगवेगळ्या पद्धतीने सॅल्यूट का करतात आणि या वेगळेपणाचे नेमके कारण काय, हे जाणून घेणं मजेशीर आहे.

भुदल :

 

scoopwhoop.com

 

पंजा समोर उभ्या असणाऱ्या अधिकाऱ्याच्या दिशेला हाताची पाचही बोटं जवळ घेऊन हाताचा पंजा करण्यात येतो. असा पंजा केलेला हात कोपरात दुमडून हाताचे मधले बोट भुवईजवळ येईल अशा पद्धतीने कपाळाजवळ नेला जातो.

असे करत असताना, ज्याला सॅल्यूट केला जात आहे त्याला तळहात स्पष्टपणे दिसणं अपेक्षित असतं. म्हणूनच पंजाची स्थिती जमिनीशी ९० अंशात आणि अधिकाऱ्याच्या दिशेला असते.

भेटायला आलेली व्यक्ती कुठल्याही वाईट हेतूने आलेली नाही, हे या सॅल्यूटमधून प्रतीत होते. हातात कुठलेही शस्त्र नाही, हे अधिकाऱ्याला स्पष्ट दिसावे यासाठी पंजा त्याच्याच दिशेला ठेवण्यात येतो.

 

नौदल :

 

quora.com

 

पंजाची दिशा जमिनीकडे. पंजाचा वापर नौदलातील सॅल्यूटमध्ये सुद्धा करण्यात येतो. नौदलातील सॅल्यूटमध्ये या पंजाची दिशा मात्र जमिनीकडे असते. म्हणजेच पंजा आणि कपाळ यामध्ये ९० अंशाचा कोन असतो.

हात भुवईजवळ असण्याची पद्धत मात्र नौदलाच्या सॅल्यूटमध्ये सुद्धा सारखीच आहे.

खलाश्यांचे हात ऑइल आणि ग्रीझच्या वापराने खराब झालेले असू शकतात. हे खराब झालेले हात अधिकाऱ्यांना दिसू नयेत आणि त्यांचा अवमान होऊ नये, म्हणून तळहाताची दिशा जमिनीकडे असते.

 

वायुसेना :

 

quora.com

 

तळहात आणि जमीन यांच्यामध्ये ४५ अंशांचा कोनमार्च २००६ पासून सॅल्यूटची एक नवी पद्धत भारतीय वायुसेनेकडून स्वीकारण्यात आली. पंजाची स्थिती जमिनीशी ४५ अंशाच्या कोनात असते.

आर्मी आणि नौदल यांच्या सॅल्यूटमधील पंजाच्या स्थितीच्या साधारण मध्यवर्ती स्थिती वायुसेनेच्या सॅल्यूटमध्ये पाहायला मिळते. वायुसेनेमधील सॅल्यूटची जुनी पद्धत ही भारतीय भूदलाप्रमाणेच होती.

वायू सेनेकडून नव्या पद्धतीचा स्वीकार २००६ साली करण्यात आला. म्हणजेच त्याआधीच्या काळापर्यंत वायुदलातील अधिकारी सुद्धा आर्मीतील अधिकाऱ्यांप्रमाणेच सॅल्यूट करत असत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version