Site icon InMarathi

लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी घरच्याघरी मखर बनवण्याच्या ह्या आयडिया नक्कीच उपयुक्त ठरतील

nana patekar ganpati featured inmarathi

mid-day.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गणेशोत्सव हा प्रत्येक महाराष्ट्रीयाचा जिव्हाळ्याचा सण. केवळ बाप्पा येण्याच्या चाहुलीनेच संपूर्ण वातावरण चैतन्यमय, समृध्द, सुखी समाधानी असल्याचे वाटते.

आरत्या, धूप दीप, नैवेद्य, याने वातावरण अगदी सकारात्मक होते. लहानांपासून ते वयोवृद्ध मंडळी, सगळ्यांत अगदी उत्साहाचा संचारच होतो. श्रावणाच्या आगमना पासूनच आपल्याला गापती बाप्पा येण्याची चाहूल लागते.

शेवटी आपला लाडका बाप्पा आपल्या घरी अवघ्या १० दिवसां करता येणार असतो. छोटे मोठे मंडप सजून धजून बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असतात.

पूर्ण एक ते दीड महिन्या पूर्वी पासून बाजार पेठा अगदी बाप्पाच्या सुरेख, तेजस्वी मूर्तींनी, घरगुती सजावटी करता लागणाऱ्या वस्तूंनी, दणाणून जातात.

 

swarajyamag.com

 

ढोल पथके आपल्या अगळ्याच पद्धतीने बाप्पाच्या स्वागताची तयारी करू लागतात. कोणत्या दिवशी कोणती खिरापत करावी रव्याचे मोदक, उकडीचे मोदक, लाडू, बर्फी पेढे अशा अनेक खमंग पदार्थांच्या याद्या बनू लागतात.

अगदी दिवाळी सारखी घराची स्वचछता करण्यापासून, डोळे दिपून टाकणारे मखर, देखावे तयार करणे याची लगबग सुरू होते.

वर्षभर काम करून आलेली मरगळ, थकवा, नैराश्य या दिवसात कुठे तरी अगदी गायबच होऊन जाते. बाप्पा आला की आपल्याच कुटुंबातील कोणी व्यक्ती परत आपल्यात आली आहे ह्याची जाणीव होते.

महाराष्ट्रात गणेशोत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो व त्याचे आपल्या लेखी काय महत्त्व असते हे वेगळे सांगायला नकोच.

यंदा या जीवघेण्या महामारीचे सावट संपूर्ण जगावर पसरलेले आहे. त्या मुळे या वर्षी दर वेळी प्रमाणे गणेशोत्सव साजरा करणे जरी अवघड असले तरी आपल्या मनातली इच्छाशक्ति व उत्साह तसाच कायम ठेऊन, आपण आपल्या घरीच वेगळं, चां सुंदर असं काय बरं करू शकतो?

सजावट कशी करावी, कशाने करावी, वेगळं पण अगदी सुंदर दिसेल असं काय करावं जेणे करून, घरातल्या छोट्या मंडळींचा उत्साह तसाच कायम ठेऊन त्यांची बाप्पाला भेटण्याची इच्छा पूर्ण होईल व मोठ्यांना तब्येतीची फार काळजी लागून राहणार नाही हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.

पण आम्ही आपल्या या प्रश्नाचे उत्तर मिळावे या साठी काही भन्नाट संकल्पना घेऊन आलेलो आहोत. चला बघुया.

 

१) क्राफ्ट पेपरची सजावट –

 

blog.mirraw.com

 

मुलांना शाळेत ओरीगॅमी करता क्राफ्ट पेपर लागतात. शाळा नसल्यामुळे ते आता त्यांच्या कपाटाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून असतील. त्या क्राफ्ट पेपर पासून हवी ती कलाकृती आपण साकारू शकता.

फुलं, भिंगरी आकाराची फुलं, ईत्यादि. रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर सुंदर अशी सजावट करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

 

२) कमळाचे आसन –

 

evibe.in

 

बाप्पा ला विराजमान करण्यासाठी आपण रंगीत सेंच्युरी शिट पासून सुंदर व आलिशान असे कमळाचे आसन बनवू शकतो.

बनवण्यास अगदी सोपे व किफायतशीर अशी ही आयडिया सगळ्यांनाच भावेल व अतिशय सुंदर देखावा देखील तयार करता येईल.

 

३) इको फ्रेंडली मखर –

 

in.pinterest.com

 

आपल्या घरा जवळील कुठे ही सहज उपलब्ध असलेल्या पानांच्या साहाय्याने आपण इको फ्रेंडली मखर सहज बनवू शकतो. स्पंज घेऊन मखर हवं त्या आकारात कापून त्यात ती पाने खोचून हा मखर बनवता येते.

यात पाने वाळू नयेत म्हणून स्पंज वर पणी देखील शिंपडता येऊ शकते.

 

४) केळीच्या पानाचं मखर –

 

blog.mirraw.com

 

कोणत्याही मंगल प्रसंगी घराला केळीच्या पानांचे खांब उभारण्याची आपल्या संस्कृतीत पद्धत आहे. तर बाप्पा साठी याच केळीच्या पानांचं मखर बनवला तर?

दिसायला सुंदर, केळीची पानं असल्या मुळे पर्यावरण पूरक, व आपल्या बजेट मध्ये बसणारी ही एक संकल्पना ट्राय करून बघा.

 

५) फुलांची सजावट –

 

evibe.in

 

फुलं कोणाला आवडत नाहीत? दिसायला मोहक, सुगंधाचा दरवळ वातावरण अगदी प्रसन्न करून टाकतो. ह्याच फुलांपासून बाप्पा साठी मखर सुद्धा बनवता येऊ शकते.

मनाला अगदी शांत वाटाव अशी कोमलता व शांति प्रदान करण्याची क्षमता फुलांमध्ये असते.

 

६) चम चमणारे विजेचे दिवे –

 

blog.mirraw.com

 

साधं कापडाच मखर तयार करून त्या आजूबाजूला हवे तसे रंगीबेरंगी दिवे, लायटिंग लावली तर घरी काजवे अल्यचाच अनुभव येईल. नक्की करून पहा हा सोपा आणि मस्त प्रयोग.

७) आवडत्या तीर्थ क्षेत्रांचा देखावा –

आपल्याला जर चित्रकला येत असेल, ज्ञान अवगत असेल तर आपण स्वतः च्या हाताने, आपल्या घरातल्या उत्साही मंडळींच्या साहाय्याने आपल्या आवडत्या तीर्थ क्षेत्राचा देखावा देखील साकारू शकता.

मंगलमय सणात, मंगलमय ठिकाणी दर्शनाला गेल्याचा आनंद घर बसल्या मिळेल.

८) कार्डबोर्डचा उपयोग –

 

blog.mirraw.com

 

कार्ड बोर्ड कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात सहज उपलब्ध असतो. या कार्डबोर्ड च्या साहाय्याने, आपण आपल्याला हवा तो प्रसंग, आपल्याला मनाला पटेल तसं मखर, आपल्याला प्रेरित करणारा प्रसंग, काही ही साकारू शकता.

 

९) रंगीत बॅकग्राऊंड –

 

evibe.in

 

एकदम सूटसुटीत व फार मेहनत न लागणारी व सोपी अशी एक आयडिया म्हणजे साड्यांचे पडदे बनवणे. घरातील बायकांच्या जुन्या साड्या कधी कामास येतील?

आत्ता त्या साड्या साधी दोरी बांधून त्या वर पसरवून ठेवल्या व फुलांच्या माळा त्याला बांधल्या तर एक सुंदर असे रंगीत बॅकग्राऊंड बनवता येऊ शकते.

 

१०) गड किल्ल्याचं मखर –

 

youtube.com

 

आपल्याकडे दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची पद्धत आहे. पण या वेळी बाप्पाला गडावर विराजमान केले तर? आपण गहू, तांदूळ मातीत पेरून ठेऊन जे जव उगेल ते त्या किल्ल्यावर ठेऊ शकतो.

खेळातले प्राणी, बाहुल्या सुद्धा देखावा करण्यास मांडून ठेऊ शकतो.

 

११) मोर आकृतीचे सिंहासन –

 

evibe.in

 

कार्डबोर्ड किंवा खरी मोर पिसे आणून त्यांपासून एक सुंदर सिंहासन बनवल्या जाऊ शकते. सगळ्यात सुंदर असे हे सिंहासन, डोळे दिपवून टाकते.

गणेशोत्सव अगदी तोंडाशी आलाय याच वेळेस मुलांना हाताशी घेऊन, प्रत्येक कामात त्यांना समाविष्ट करून आपल्या संस्कृतीची ओळख, शिकवण त्यांना करून देऊ शकतो.

त्यांच्या मनात कुटुंबातील एकात्मतेची भावना अजून घट्ट करण्याची हीच खरी वेळ. वरील दिलेल्या आयडिया वापरुन काही तरी क्रियेटीव्ह करूया, चला यंदा मखर घरीच करूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version