' एका डायलॉगमागे एक लाख! टर्मिनेटरसाठी अर्नोल्डने पैसे आकारण्यासाठी वापरलेलं गमतीशीर गणित! – InMarathi

एका डायलॉगमागे एक लाख! टर्मिनेटरसाठी अर्नोल्डने पैसे आकारण्यासाठी वापरलेलं गमतीशीर गणित!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘टर्मिनेटर’ म्हणजे आरनॉल्ड. हे एक समीकरण आपल्या सर्वांच्या डोक्यात आहे. अर्नोल्ड ने टर्मिनेटर साठी घेतलेली मेहनत, त्या सिनेमात त्याने दाखवलेला swag हा आयुष्यभर त्याच्या चाहत्यांना लक्षात राहण्यासारखा आहे.

डायरेकटर जेम्स कॅमेरॉन यांनी या सिनेमात अर्नोल्ड कडून त्याचा करिअर बेस्ट परफॉर्मन्स काढून घेतला आहे असं म्हंटल्यास चूक ठरणार नाही.

कारण, या सिनेमात अर्नोल्डला बोटावर मोजण्या इतकेच संवाद आहेत. बाकी फक्त त्याचे expressions आहेत.

जेम्स कॅमेरॉन यांनी पहिल्यांदा टर्मिनेटर सिनेमा तयार केला तो १९८४ मध्ये. सायंटिफिक फिक्शन ( Sci fi) आणि हॉरर अश्या दोन्ही जॉनर मध्ये हा सिनेमा मोडतो.

 

arnold inmarathi
syfy.com

 

जेम्स कॅमेरॉन हे प्रसिद्ध आहेत त्यांच्या टाईम ट्रॅव्हल दाखवण्याच्या पद्धतीसाठी, त्यांच्या सिनेमाच्या वेगासाठी. या सिनेमात सुद्धा कित्येकदा काळ पुढे सरकतो आणि कित्येक वेळेस सिनेमा हा भूतकाळात जातो.

असा सिनेमा तयार करताना दिग्दर्शक आणि पर्यायाने पूर्ण टीम ची परीक्षा असते. पण, इतर सिनेमा आणि या सिनेमात अर्नोल्ड हा मोठा फरक आहे हे आपल्याला बघताना लगेच जाणवतं आणि त्याचा सहज वावर प्रत्येकाला इम्प्रेस करतो आणि खेळवून ठेवतो.

‘द टर्मिनेटर’ या फ्रँचाईजी ने नंतर बरेच प्रोजेक्ट्स केले. पण, सर्वांना लक्षात आहे तो म्हणजे फक्त पहिला सिनेमा. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी अर्नोल्ड ने प्रति डायलॉग प्रमाणे मानधन आकारलं होतं.

अर्नोल्ड ने साकारलेलं T – 800 हे रोबोटीक पात्रला पूर्ण सिनेमात मिळून फक्त १७ लाईन्स आहेत. ज्यामध्ये एकूण ५८ शब्द आहेत. अर्नोल्डच्या T2 या रोल मध्ये एकूण ७०० शब्द आहेत आणि त्या प्रत्येक शब्दानुसार लाखो रुपयांचं मानधन कमावलं आहे आणि हा एक नवीन ट्रेंड सुरू केला.

‘द टर्मिनेटर’ या सिरीज च्या येणाऱ्या sequels मध्ये अर्नोल्डचे संवाद आणि शब्द वाढत गेले आणि पर्यायाने मानधनही.

 

arnold 2 inmarathi
medium.com

 

‘द टर्मिनेटर’ चं यश हे कित्येक येऊ घातलेल्या टेलिव्हिजन सिरीज ची नांदी होती. त्यानंतर जेम्स कॅमेरून हे थांबलेच नाहीत आणि ते सतत लोकांसमोर त्यांनी तयार केलेलं एक श्रीमंत जग घेऊन येत होते आणि लोकांना ते आवडत होते.

प्रत्येक सिक्वेल मध्ये काही तरी बदल होता. अर्नोल्ड चा वावर हा प्रत्येक भागातच लोकांना सुखावणारा आहे.

त्यातल्या त्यात जेव्हा लोक पहिल्या ‘द टर्मिनेटर’ ची आठवण काढतात तेव्हा लोकांना त्याचा तो मोजकेच संवाद असलेला रोल सुद्धा तितक्याच प्रकर्षाने आठवतो.

पहिल्या ‘द टर्मिनेटर’ मध्ये अर्नोल्ड हा T- 800 या एका निर्विकार मशीन च्या रोल मधून प्रेक्षकांच्या समोर आला होता. ही मशीन अगदीच कमी शब्दात बोलणं पसंत करत असते.

ज्या लोकांना अर्नोल्ड व्यक्ती म्हणून माहीत आहे त्यांनी असं सांगितलं होतं की वैयक्तिक आयुष्यात तो असंच कमी बोलून राहण्याचा प्रयत्न करतो.

T – 800 या मशीन ची डायलॉग म्हणायची एक विशिष्ट पद्धत होती. त्या मशीन ने बोललेले एका वाक्याचे किती तरी संवाद हे लोकप्रिय झाले होते. त्यापैकी काही संवाद हे होते :

“I am a friend of Sarah Connor” आणि  “Your clothes, give them to me now” आणि “I will be back.”

 

arnold dialogue inmarathi
scoopwhoop.com

 

ही तीनच वाक्य त्याला सिनेमात म्हणायची होती. पण कथानकात ते तीनही संवाद खूप महत्वाचे होते. इतर वेळी असलेल्या लांबलचक संवादापेक्षा या तीन वाक्याचं मोल जास्त होतं. हे लौकिकार्थाने सुद्धा खरं आहे आणि शब्दशः सुद्धा.

अर्नोल्ड श्वाझनेगर या कलाकाराला या सिनेमासाठी $75,000 (साधारण त्या काळातले ५० लाख इतपत) इतकं मानधन देण्यात आलं होतं. जे की प्रत्येक शब्दामागे $1293 (साधारण लाख भर रुपये) इतकं होतं.

‘द टर्मिनेटर’ च्या सिक्वेल टर्मिनेटर २ मध्ये आणि टर्मिनेटर ३ मध्ये अर्नोल्ड चा रोल आणि शब्द वाढून ७०० शब्दांपर्यंत गेले होते. या दोन सिनेमांपैकी T2: Judgement Day मध्ये अर्नोल्ड चा रोल हा फार महत्वाचा आहे.

या सिनेमातील ७०० शब्दांसाठी अर्नोल्ड ने $15 मिलीयन (करोडो रुपयांचं) इतकं मानधन आकारलं होतं. जे की प्रति शब्द $21,429 इतकं होतं म्हणजे आपल्या भारतीय करन्सी INR मध्ये प्रति शब्द १६ लाख रुपये इतकी होते.

एक शब्द बोलण्यासाठी इतकी रक्कम. ग्रामीण भागात एक घर होईल बांधून तितक्या पैशात. ही होती अर्नोल्ड च्या नावाची जादू.

काही वेळेस कलाकार मोठा की त्या पात्राने त्याला दिलेली इमेज मोठी असा प्रश्न पडतो. अर्नोल्ड च्या बाबतीत बोलताना त्याने टर्मिनेटर या फ्रँचाईजी ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे असं नेहमीच बोललं जातं.

 

arnold as movie star inmarathi
esquire.com

 

२०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘टर्मिनेटर : डार्क फेट’ ने मात्र बॉक्स ऑफिस वर अपेक्षित यश कमावलं नाही. हंगेरी, स्पेन आणि अमेरिका सारख्या ठिकाणी शुटिंग झालेल्या या सिनेमाने त्याच्या निर्मिती इतका खर्च जेमतेम भरून काढला.

पूर्ण टीम ला हे आकडे खूप त्रासदायक होते आणि त्यामुळे त्यांनी या सिरीज चे पुढचे सगळे सिनेमे रद्द केले आहेत.

या सिरीजच्या फक्त टर्मिनेटर – द सॅलवेशन मध्ये अर्नोल्ड त्याच्या कॅलिफोर्निया च्या महापौर पदाच्या व्यस्त असल्यामुळे काम करू शकला नव्हता. पण, त्याच्या पुढच्याच सिनेमात निर्मात्यांनी त्याला घ्यायचंच असं ठरवलं.

बॉडी बिल्डर असलेला व्यक्ती हिरो बनतो आणि इतकी लोकप्रियता कमावतो आणि कायम स्वतःच्या अटींवर काम करतो हे खरंच एक अद्वितीय उदाहरण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?