Site icon InMarathi

“अग्गं बाई सासूबाई” वर टीका करणाऱ्या पोस्टवर ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक भडकले!

girish oak featured inmarathi

charmboard.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टेलिव्हिजन जेंव्हा आला तेंव्हा २४ तास मनोरंजन आणि ढीगभर चॅनल्स हा प्रकार नव्हता, तेंव्हा काही ठराविक वेळेत मनोरंजनाचे प्रोग्राम्स आणि सिनेमे दाखवले जायचे!

पण जसजसा काळ आणि तंत्रज्ञान बदलत गेलं, आणि ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजनचा स्मार्ट टीव्ही कधी झाला ते समजलंच नाही! पण दुर्दैव म्हणजे फक्त टीव्ही स्मार्ट झाला आणि त्यावर लागणारे प्रोग्राम्स हे आणखीन मूर्ख बनत गेले!

अगदी न्यूज चॅनल्स असो किंवा कोणतंही डेली सोप वालं चॅनल असो, त्या चॅनल्स वर लागणारे प्रोग्राम आणि तिथला कंटेंट आपल्याला नवीन नाही!

ह्या सगळ्या प्रकारात हिंदी पाठोपाठ मराठी सिरियल्स ह्या सुद्धा भरपूर आहेत!

सध्या लॉकडाऊनच्या काळात जसं दूरदर्शनने जुन्या मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली तसंच झी मराठी ह्या प्रसिद्ध चॅनल ने उशिरा का होईन श्रीयुत गंगाधर टिपरे सारखी जुनी मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली!

पण गेल्या काही दिवसांची डेव्हलपमेंट पाहता शूटिंग साठी परमिशन दिली गेली आणि नवीन सिरियल्स चं शूटिंग जोमाने चालू झालं!

 

zeemarathi.zee5.com

 

पण लोकं सुद्धा त्या सगळ्या नवीन सिरीयल्सना कंटाळले आहेत, नवनवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लोकांना माहीत होत आहेत ह्याची जाणीव ह्या सिरियलच्या लेखक दिग्दर्शकांना होत नसेल का?

मराठी टीव्ही सिरीयल आणि त्यातल्या पात्रांची उडणारी खिल्ली आपल्यासाठी काही नवीन नाही! होणार सून मी ह्या घरची ह्या सिरियलची लोकांनी उडवलेली टेर आणि त्यातल्या प्रत्येक पात्राचा सगळ्यांना आलेला कंटाळा आजही सगळ्यांना माहीत आहे!

माझ्या नवऱ्याची बायको ह्या सिरियल विषयी तर आपण न बोललेलंच बरं! सिरियल कशी असू नये ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका.

 

 

बरं ह्या सिरियल च्या मेकर्स ना कशाचीच काहीही पडलेली नाही, लोकं ह्यांची टिंगल टवाळी करत आहेत, अक्षरशः लोकं विटले आहेत तरीही तेच टेक कथानक खेचून आणि अधिक रंगवून ते दाखवत आहेत!

ह्या सगळ्या सिरियल मुळे मीमकऱ्यांना चांगलंच खाद्य मिळतं, ह्या सिरियल्स वर तयार होणारी मिम्स आपण खूप एंजॉय केली असतील आणि ती पुढे शेयर सुद्धा केली असतील!

ह्या सगळ्यात आता नकुतीच भर पडलीये ती “अगबाई सासूबाई” ह्या सिरियलची, ह्या सिरियल चं कथानक आणि त्यातली पात्र इतकी लोकप्रिय आहेत की त्याबद्दल जे सिरियल बघत नाहीत त्यांना देखील ते माहीत असेल!

 

 

ह्या सिरियल मधला तो उर्मट मुलगा बबड्या, भोळी आई आसावरी, खडूस सासरे ह्यांच्यावर तयार झालेले कित्येक मिम्स सध्या व्हायरल होताना आपण पाहिले असतील!

आणि आता लॉकडाऊन नंतर ह्या सिरियल पुन्हा चालू झाल्याने ह्या सगळ्याला आणखीनच उधाण आलं आहे!

निशा सोनटक्के ह्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ह्या सिरियल वर विनोदी अंगाने टीका केली तर त्यावर खूप लोकांच्या मजेशीर कमेंट्स आल्या आणि लोकांनी त्यांचा राग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कमेंट्स मध्ये मांडला!

 

 

ही पोस्ट बघून तर ह्या सिरियल मध्ये मुख्य भूमिका निभावणारे आणि एक अत्यंत ताकदीचे कलावंत डॉक्टर. गिरीश ओक ह्यांनी सुद्धा ह्या पोस्ट वरील कमेंट्स मध्ये सहभाग घेऊन त्यांनी लोकांना उत्तरं  दिली!

एकंदर बघता गिरीश ओक ह्यांना ही पोस्ट आणि त्यावरच्या कमेंट्स किंवा झालेली टीका आवडली नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले!

चला तर नेमकं काय बोलले गिरीश ओक ते जाणून घेऊया!

 

 

ही पोस्ट गिरीश ओके ह्यांनी प्रथम स्पोर्टिंगली घेण्याच्या नादात त्यावर तशीच मार्मिक टिप्पणी केली पण नंतर एक एकाच्या कमेंटला उत्तर देताना त्यांना राग आला होता हे स्पष्टपणे दिसून आले!

 

 

आपल्या एका कमेंट वर येणाऱ्या इतक्या प्रतिक्रिया पाहून गिरीश ओक हे चर्चा करण्यात थोडे भरकटले आणि इतका मोठा कलाकार एका सामान्य प्रेक्षकावर वैयक्तिक टीका करतो हे बघायला मिळाले!

 

 

खरंतर कलाकार सुद्धा माणूसच असतात त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा वैयक्तिक टीका व्हायला नकोच, पण जेंव्हा कलाकार एखादी गोष्ट स्वतःहून ओढवून घेतो तेंव्हा मात्र तो अशा वादात अडकतो!

 

 

अशाप्रकारे फक्त एका कमेंट मुळे गिरीश ओक ह्यांना लोकांनी ट्रोल केले, आणि त्यांच्या सिरियल ला सुद्धा ट्रोल केले!

 

 

तर अशा रीतीने एका हलक्या फुलक्या टीकेमुळे प्रेक्षक आणि कलाकार ह्यांच्यातल्या संबंधात कटुता आल्याचं सुद्धा यावरून दिसून येत आहे!

खरंतर ही एकच सिरियल नव्हे तर अशा कित्येक सिरियल्स च्या निर्मात्यांनी ही गोष्ट विचारात घेऊन उत्तम दर्जाचं कथानक असणाऱ्या सिरियल्स लोकांसमोर आणल्या पाहिजेत!

कारण लोकांना काय हवं आहे ते पुरवण्यात हे कलाकार कमी पडत आहेत अशी लोकांची धारणा आपण सध्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून बघत आहोत!

सध्या कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्म हे टीव्ही मालिकांची जागा घेऊ बघत आहेत, लोकं सुद्धा त्या प्लॅटफॉर्म वरचा कंटेंट आवडीने बघत आहेत! त्यामुळे लोकांच्या अभिरुचिनुसार कलाकृति सादर करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version