आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या भारतात सिनेमे चालतात हे अनेक वेगवेगळ्या निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांमुळे. त्यातही अनेकदा अस होत की एखादा सिनेमा रीलीज करतांना ते एखाद्या त्यांच्या आवडीच्या तारखांचा, सणांचा विचार करायचे.
पण अनेकदा बॉलीवुडचे बरेच सिनेमे हे त्यात असलेल्या सुपरस्टारमुळे सुपरहिट ठरले.
इतकच नाही तर अनेकदा असही झालय की एखादा सिनेमा यायच्या आधी त्यात काम करणार्या कलाकारांचा, निर्मात्यांचा काही दुर्घटनांमुळे किंवा गंभीर आजाराने मृत्यू झालाय.
तर अनेक कलाकारांनी आपलं आयुष्य संपवून घेतलय.
याचं आत्ताच अगदी ताज उदाहरण म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत. याने त्याचे आयुष्य काही कारणास्तव संपवले जे आपल्या सगळ्यांसाठीच एक धक्का होता.
त्याच्या जाण्याची तीव्रता तेव्हा आपल्या कोणालाच एवढी वाटली नाही.
पण जेव्हा त्याच्या पुढील येणार्या चित्रपटाचा म्हणजे दिल बेचारा याचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा लोकं म्हणायला लागले आम्ही सुशांतला रियल लाइफमध्ये खूपच मिस करू.
तो नसतांना त्याचा चित्रपट बघण आम्हाला कठीण जाईल. पण केवळ सुशांत हा एकमेव बॉलीवुड मधला कलाकार नाहीये ज्याने त्याचा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी जग सोडलं.
तर वरील सुशांतच्या उदाहरणासारखे अनेक कलाकार, निर्माते आहेत जे त्यांचे सुपरहीट सिनेमे यायच्या आधी हे जग सोडून गेले. त्यातले काही काळाच्या या दुष्टचक्रला तोंड न देऊ शकलेले कलाकार.
१. मीना कुमारी :
कमल अमरोही दिग्दर्शित ‘पाकीजा’ नावाचा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर तीन आठवड्यांनी मीना कुमारी आजारी पडल्या आणि त्यांच निधन झाले. या
त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साधारण तीन कोटी कमावले. पण त्यांच हे स्वतःच स्क्रीनवर झळकलेलं यश बघायला त्या आपल्यात राहिल्याच नाहीत.
आणि त्यानंतर मिनाजी यांचा अखेरचा रिलीज झालेल्या गोमती के किनारे या चित्रपटाने तितकी कमाई केली नाही.
२. मधुबाला :
भारतीय पडद्यावरचा एक अतिशय मनमोहक चेहरा, दिलखेचक अदा आणि त्याही पलीकडे जाऊन साधी पण तरी लोकांना भावणारा अभिनय या सगळ्यामुळे ओळखल्या जाणार्या मधुबालाने १९६० साली आपल्या सगळ्यांना निरोप दिला.
हृदयाविकारामुळे त्यांना फारस काम देखील नंतर करता आलं नाही.
१९७१ मध्ये, त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर, सुनील दत्त सोबत अभिनेत्रीची भूमिका केलेला ‘ज्वाला’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला.
३. संजीव कुमार :
१९८५ मध्ये संजीव कुमार यांच्या निधनानंतर मोजायला गेलं तर दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. ज्यात कत्ल, बात बन जाये, लव अँड गॉड, नामुंकिन असे अनेक होते.
यापैकी शेवटचा, आशा पारेख आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची मुख्य भूमिका असलेला प्रोफेसर की पडोसन १९९३ प्रदर्शित झाला. जो अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
४. बलराज साहनी :
१९७३ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर यांनी अभिनय केलेले अनेक मोठे चित्रपट स्क्रीनवर आले. बलराज सहानी हे अतिशय मोठे चित्रपट आणि त्याचबरोबर थिएटर आर्टिस्ट होते.
त्यांचे प्यार का रिश्ता, हिंदुस्तान की कसम, हंसते जखम, जालियन वाला बाग, अमानत आणि गरम हवा असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले.
यातला शेवटचा एम.एस. दिग्दर्शित चित्रपट सत्यू, हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त क्लासिक सिनेमा आहे जो अकादमी पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटात भारताच प्रतिनिधित्व करत होता.
५. स्मिता पाटील :
नाव मराठी असल तरी स्मिता पाटील यांची जास्त चर्चा झाली ते हिंदी सिनेमात. त्यांच्या बाळंतपणात झालेल्या गुंतागुंतमुळे मरण पावलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचे जवळपास १० चित्रपट निधनानंतर रिलीज झाले.
यात केतन मेहता यांच्या प्रशंसित ग्रामीण नाटक असलेल्या मिर्च मसालाचा समावेश आहे.
२०१३ मध्ये “ २५ भारतीय चित्रपटाती सर्वोत्कृष्ट अभिनय” मध्ये फोर्ब्स मासिकाने स्मिता पाटील यांच्या अभिनयाचा समावेश असलेला चित्रपट समाविष्ट केला होता.
६. दिव्या भारती :
या अभिनेत्रीच निधन झालं १९९३ साली. तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर तीन सिनेमे प्रकाशित झाले. त्यांचा मृत्यू हा एका चित्रपटाच शुटींग करायला गेल्या असताना एका अपघातात झाला. त्यातला एक चित्रपट तेलुगू होता. तर इतर दोन हिंदी होते ‘रंग’ आणि ‘शतरंज’.
यामध्ये त्यांनी शतरंज याच शूटिंग तर केल होत. पण त्यांना मागाहून आवाज देण्यासाठी डब्बिंग आर्टिस्टला बोलवाव लागलं. तर त्यांच्या रंग सिनेमाने साधारण बॉक्स ऑफिसवर २ करोडचा धंदा केला.
७. शम्मी कपूर :
भारतीय सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते आणि सगळ्यांचे लाडके होते शम्मी कपूर. त्यांचं निधन २०११ मध्ये झाला.
त्यांनी शेवटचं काम केल ते इम्तियाज अली यांच्या संगीत आणि नाट्य हे दोन्ही असलेल्या रॉकस्टारमध्ये. त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला.
त्याने बॉक्स ऑफिसवर ६२ कोटींची कमाई केली.
८. अमरीश पुरी :
२००५ मध्ये आमरिश पुरी गेले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी अभिनय केलेला सुभाष घई दिग्दर्शित आणि विवेक ओबेरॉय अभिनीत ‘किस्ना’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
९. फारूक शेख :
राष्ट्रीय पुरस्कार विजेते फरूक शेख. हे हिंदी सिनेमातील एक वेगळच रसायन होत. त्यांच्या साध्या दिसण्याने आणि अभिनयाने त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांना उंचीवर पोहोचवल.
या अभिनेत्याचे दोन चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर साधारण २०१३ च्या पुढे प्रदर्शित झाले. यंगिस्तान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली.
तर वॉल्ड ड्रामा ऑफ वॉर ड्रामा हा पण एक नवीन चित्रपट तेव्हा आला.
१०. राजेश खन्ना :
हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय हॅंडसम कलाकार याच निधन झालं २०१२ मध्ये. तेव्हा त्यांचे दोन चित्रपट प्रेक्षकांसमोर यायचे बाकी होते.
तर त्यांचा दूसरा चित्रपट होता सतरंज. याचं शुटींग ते गेले तेव्हा पूर्ण झालं नव्हतं. पण तरी ही बी ग्रेड मूवी असल्याने त्यात मग त्यांचा बॉडी डबल वापरण्यात आला.
१२. यश चोप्रा :
त्यांच्या ‘जब तक है जान’ या रोमँटिक चित्रपटाच्या रिलीजनंतर या प्रसिद्ध निर्मात्याने सेवानिवृत्तीची घोषणा केली होती. पण चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच त्यांच निधन झालं.
शाहरुख खान आणि कतरिना कैफ स्टारकास्ट असलेल्या या रोमॅंटिक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १२० कोटी कमावले. आजही आपण यशजींचे सगळेच चित्रपट मनापासून बघतो.
तर असे हे वरील हिंदी सिंनेसृष्टीतले कलाकार आपल्याला अचानक सोडून गेले. पण जाताना त्यांच्या शेवटच्या कलाकृतीने त्यांनी त्यांची छाप आपल्या मनावर ठेऊन गेले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.