Site icon InMarathi

OLX, Quickr सारख्यांना कठीण गेलं ते साध्य करणाऱ्या एका कल्पक “स्टार्ट-अप”ची कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सेकंड हॅन्ड गोष्टी विकत घ्यायच्या म्हणजे डोळ्या समोर येत ते ओएलएक्स,क्विकर सारख्या वेबसाईट. २०१५-१६ मध्ये तुफान बिझनेस केलेल्या या वेब साईटचा बिझनेस कालांतराने बसून गेला.

ग्राहकांची विश्वासार्हता हळूहळू कमी झाली आणि टीव्ही वर दिसणाऱ्या यांच्या जाहिराती सुद्धा कमी झाल्या.

२०१८ मध्ये एक वेबसाईटने स्टार्टअप इंडस्ट्री मध्ये धुमाकूळ घातला. ती कंपनी म्हणजे Droom.in!

 

play.google.com

 

बातमी अशी की, या वेबसाईट ला सिरीज इ राउंड मध्ये तब्बल ३० मिलियन डॉलरच फंडिंग मिळाली होती. भारतीय बाजार भावानुसार जवळपास २२० करोड रुपये.

आणि विशेष म्हणजे एवढीच फंडिंग त्यांना सिरीज डी राउंड मध्ये सुद्धा मिळालेली. या दोन फंडिंग च्या मध्ये कालावधी होता तो फक्त ५ महिन्यांचा.

Droom या वेबसाईटने २०१४ मध्ये स्थापन झाल्यापासून २०१८ पर्यंत तब्बल १२५ मिलियन डॉलरची फंडिंग मिळवली होती.

आणि हो जर तुमचा स्टार्टअप ग्रोथ मध्ये असेल तरच तुम्हाला फंडिंग मिळते हे इथे लक्षात ठेवावे लागेल.

तर नक्की आहे काय हे Droom?

तर, फक्त सेकंड हॅन्ड वेहीकल मध्ये डील करणारी देशातली एकमेव वेबसाईट. ग्राहक आणि विक्रेता यमांध्ये थेट डील करून आणणारी ही वेबसाईट आहे.

शॉपक्लूज चे फाउंडर संदीप अगरवाल हेच या Droom.in चे फाउंडर आहेत.

 

businessworld.in

 

या वेबसाईटची विशेषता म्हणजे डील करायच्या आधी जी रजिस्ट्रेशन फी घेतली आहे,जर डील सक्सेसफुल नाही झाली तर ती परत करण्यात येते.

ग्राहकांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कंपनीने उचललेलं हे महत्त्वाचे पाऊल आहे. वेबसाईट बद्दल अधिक विचारल्यावर संदीप अगरवाल म्हणतात,

त्यांच्या प्लॅटफॉर्म वर गाडी विकण्यासाठी तीन पर्याय आहेत- फिक्स ठरलेली किंमत, बेस्ट ऑफर आणि लिलाव.

सर्वप्रथम ग्राहकाला २०००₹ रजिस्ट्रेशन फी म्हणून भरावे लागतात.

सक्सेसफुली रजिस्टर केल्यानंतर ग्राहकाला गाड्यांचा ऍक्सेस मिळतो. जिथे तो विक्रेत्या सोबत थेट जोडला जातो. गाडीची पाहणी,बार्गेनिंग यासाठी ग्राहकाला ५ दिवसाचा वेळ दिला जातो.

या ५ दिवसांमध्ये त्याला डील पूर्ण करणे बंधनकारक असते.

डील मान्य झाल्यावर फायनल पेमेंट वेळेस ग्राहकाचे २०००₹ रजिस्टर करतानाची फी त्या डील मध्ये ऍडजस्ट होऊन जाते. आणि जर डील क्रॅक नाही झाली तर ते २०००₹ ग्राहकाला रिफंड मिळून जातात.

 

droom.in

 

गाडी खरेदी विक्री सोबत Droom इन्शुरन्स सुद्धा ऑफर करते. त्याचसोबत लोन, रोडसाईड असिस्टंस आणि वार्षिक मेंटेनन्स काँट्रॅक सुद्धा ऑफर केले जाते.

कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू हा १५० करोड पेक्षा जास्त आहे. ८५० विक्रेत्यांसोबत ६००० पेक्षा जास्त गाड्या आज या वेबसाईट वर आपण पाहू शकतो.

ऑटोमोबाईल सर्व्हिससाठी महिंद्रा फर्स्ट चॉईस आणि इन्शुरन्स सर्व्हिससाठी AXA यांच्याशी Droom चं टाय अप आहे.

वेबसाइटवर गाडी येण्यापूर्वी ती महिंद्रा फर्स्ट चॉईस कडून पहिली तपासली जाते.

केपीएमजी चे राजीव सिंह म्हणतात,

“भारतात सेकंड हॅन्ड गाड्यांचा बिझनेस हा नवीन गाड्यांच्या तुलनेत १.५ मोठा आहे. ग्राहक जेव्हा पासून टेक ओरिएंटेड होत आहेत तेव्हा पासून ओइएम (OEM) कंपन्या अशा ई-कॉमर्स वेबसाईट सोबत सेकंड हॅन्ड गाड्या विकण्यासाठी करार करत आहेत.

आणि याचं मुख्य कारण म्हणजे हे ग्राहक आणि विक्रेते दोघांना आर्थिकदृष्ट्या परवडले जाते. उत्पादन करणारी कंपनी थेट डील मध्ये इनवोल्व्ह झाल्यामुळे ग्राहकाला सुद्धा मोठ्या डिस्काउंट मिळण्याची शक्यता निर्माण होते.”

जेव्हा फंडिंग मार्गे मिळालेल्या मोठ्या मदतीबद्दल विचारले असता अगरवाल सांगतात,

 

forbesindia.com

 

पहिल्या फंडिंग मध्ये कंपनी आणि वेबसाईटचं स्ट्रक्चर उभं केलं गेलं. त्यानंतर मात्र मिळालेल्या फंडिंग थ्रू बिझनेस देशाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला गेला.

भारता व्यतिरिक्त मलेशिया,सिंगापूर,इंडोनेशिया,पश्चिम युरोप आणि अमेरिकेत सुद्धा Droom कार्यरत आहे.

बऱ्यापैकी मार्केट मध्ये जम बसल्यानंतर टेक्नॉलॉजी आणि प्लॅटफॉर्मच्या डेव्हलपमेंट साठी मदतीचा मोठा हिस्सा वापरला जात आहे.

डिस्काउंट बद्दल अगरवाल सांगतात,

डिस्काउंट ही फक्त एक प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. कंपनी साठी डिस्काउंट हे गाडीच्या एकूण विक्री मूल्यानुसार ५% आहे. तर तेच ग्राहकांसाठी १०% पेक्षा कमी.

एप्लिकेशन आणि वेबसाईट लॉन्च झाल्यापासून Droom महिन्याला ५०० ते ६०० गाड्या विकते.ऑन एव्हरेज दिवसाला ८ ते १० गाड्या.

 

theindianwire.com

 

Droom सोबत पार्टनर असलेल्या लिस्टेड सेलर म्हणतात,

सेकंड हॅन्ड गाड्या विक्रीचा बिझनेस जरी मोठा दिसत असला तरी तो अनऑर्गनाईझ आहे.ऑफ लाईन मार्केट मध्ये सेकंड हॅन्ड गाड्या विक्रीमध्ये तडजोड करून फायदा मिळवला जातो. पण Droom सोबत आम्हाला डील मध्ये फक्त ५% मिळतात.

टक्केवारी असल्यामुळे कधी फायदा तर कधी कट टू कट मध्ये निभावून जात. सर्व्हिस आणि रिपेअरिंग साठी Droom आम्हालाच प्रेफरेन्स देत असल्यामुळे आम्हाला पैसे बनवायला एक चांगला मार्ग इथे मिळतो.

एकूणच कंपनी स्थापन करायच्या अगरवाल यांच्या हेतू बद्दल विचारल्यावर ते सांगतात,

एका कंपनीत नोकरी करण्यापेक्षा कंपनी किंवा बिझनेस टाकून स्वतः मालक होण्याची अनेकांना मनीषा असते. माझ्यासोबतही तसेच झाले.

एक दशकापेक्षा जास्त काळ अमेरिकेत काम केल्यावर सगळ्या स्थरावरच्या ग्राहकांशी संबंध आला. शॉपक्लूजच्या मार्गाने भारतीय मार्केटशी ओळख झाली आणि या वेबसाईट थ्रू कंपनी स्थापन करायची आयडिया आली.

 

techieexpert.com

 

तशी प्लॅनिंग करून,अपयश पचवून ही कंपनी अखेर २०१४ ला कंपनी अस्तित्वात आली. संदीप अगरवाल यांच्या या प्रवासामुळे अनेक स्टार्टअप साठी काम करणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.

आणि अगरवाल स्वतः अशा तरुणांना फंडिंग मिळवून देण्यासाठी मदत करत असल्याचे दिसून आले आहे. एकूणच संदीप अगरवाल आणि त्यांच्या Droom.in चा प्रवास रंजक म्हणायला हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version