' कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या! – InMarathi

कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपूर्ण जगात मागचे अनेक महीने कोरोनाने हाहाकार माजवला आहे. पुढील काळात ही साथ आणखीन पसरू नये, म्हणून स्वतःला काही सवयी लावणं आवश्यक आहे.

हे लक्षात घेणं महत्वाचं आहे, की सरकारने अनलॉक या योजनेच्या पहिल्या टप्प्यात काही मर्यादा घालूनसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या दरम्यान सुरक्षित राहण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

आपला आहार, शारीरिक क्रिया आणि आरोग्य हे उत्तम असायला हवं. आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संतुलन अशा परिस्थितीत योग्य असणे गरजेचे आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी केवळ घरात असतांना काळजी घेऊन चालणार नाही. येत्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचे आहे.

१. व्यायाम करणे आवश्यक

 

home exercise inmarathi 1

 

बरेच लोक डेस्कवर बसून १२ ते १३ तास काम करतात, पण आपण एकाच जागी जास्त वेळ बसत नाही ना? याची काळजी घ्यायला हवी. व्यायाम आपल्याला शारीरिक संतुलन राखण्यास मदत करू शकतो.

दिवसातील ठराविक वेळच काम करून बाकीच्या वेळेस ऑनलाइन क्लास लावून व्यायाम करणे, घरातल्या घरात चालणे असे अनेक प्रकार तुम्ही करू शकता. ज्यामुळे तुमची शारीरिक ताकद टिकून राहील. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

 

२. मानसिक संतुलन वाढवा

 

jaqueline-yoga-inmarathi

 

गेल्या काही दिवसात आपल्या जीवनात अनेक बदल झाले. यामुळे तणाव, चिंता आणि त्रास देखील वाढलेला आहे किंवा नवीन तयार होत आहेत.

अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मानसिक-सामाजिक सहकार्य घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मेडीटेशन करावं. योग, प्राणायाम अशा वेगवेगळ्या मार्गांचा वापर मन:शांती साठी करावा.

तुम्हाला जो त्रास होत असेल, तो मित्रांशी बोलून तुम्ही कमी करू शकता.

 

३. अभिवादन करण्याची नवीन पद्धत 

 

no hand shake inmarathi

 

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर आवश्यक आहे. यामध्ये एकमेकांना अभिवादन करण्याच्या नवीन मार्गांचा समावेश होतो.

भारतीय संस्कृतीत नमस्ते करायची पद्धत फार जुनी आहे. ज्याचा फायदा घरा बाहेर पडल्यावर होऊ शकतो.

तरुणांनी नवीन काढलेल्या एल्बोशेक पासून ते अगदी लेगशेकपर्यंत काहीही करून पहा. कारण जेव्हा आपण शुभेच्छा देण्याचा मार्ग बदलतो, तेव्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

 

४. सुरक्षित अंतर ठेवा

 

distance inmarathi

सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. इतरांपासून कमीतकमी तीन फूट अंतर ठेवण गरजेचं आहे.

यापुढे आपण आपल्या ऑफिसमध्ये बसत असताना, लोकांना भेटत असताना अंतर ठेवायला हवं. आपली रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी लढण्यासाठी कितीही प्रबळ असली तरीही आपल्यामुळे इतरांना विषाणू संक्रमित होऊ शकतो हे लक्षात घ्या.

 

५. तोंड झाका 

 

corona mask inmarathi

हे ही वाचा – आरोग्यासोबत या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्ही सगळीकडे जिंकाल!

कोविड -१९ हा श्वसनाचा आजार असल्याने, आपल्याला शिंका किंवा खोकला आला तर आपले तोंड टिशू पेपरने झाकून घ्या. नंतर आपले हात स्वच्छ धुणे आणि वापरलेले टिशू पेपर योग्यरित्या कचर्‍यात टाकणे महत्त्वाचे आहे.

 

६. हात चेहर्‍यापासून लांब ठेवा

 

handwash and mask inmarathi

 

आपण विचार न करता डोळे, नाक, तोंड यांना नकळतपणे सारखा स्पर्श करतो. आपल्या हातांना पुष्कळ जंतू आणि रोग चिकटलेले असतात. जेव्हा आपण आपल्या तोंडाला स्पर्श करतो, तेव्हा नकळत हे विषाणू शरीरात जाऊ शकतात.

 

७. क्लीनर वापरा

 

https://www.finder.com.au/

 

आजकाल साध्या साबणापासून ते रासायनिक जंतुनाशकांपर्यंत सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. याचा वापर आपल्या घरामध्ये चांगली स्वच्छता ठेवण्यासाठी होऊ शकतो.

स्वच्छता आणि सेनिटायझिंग प्रक्रियेदरम्यान आपण हातमोजे घालाल याची खात्री घ्या.

 

८. हात वारंवार धुवा

 

hand wash inmarathi

 

आपण नकळत कुठल्याही जीवाणू किंवा विषाणू असलेल्या गोष्टीला हात लावतो. म्हणून आपले हात वारंवार धुणे गरजेचं आहे. बाहेरून घरात आल्यावर आधी हात धुवा. साबण आणि पाणी यांचा अभाव असेल तर अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझर वापरा.

 

९. गरज असल्यास बाहेर पडा

 

mask inmarathi

 

जरी सरकार लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडत असले तरीही, आपण हे समजून घेणं आवश्यक आहे, की आपण अजूनही साथीच्या आजाराशी लढत आहोत. म्हणून, स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात राहण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडा.

 

१०. बाहेर थुंकू नका

 

spitting inmarathi

 

आपल्या जवळच्या लोकांपैकी कोणी रस्त्यात थुंकत असतील, सार्वजनिक भिंती गुटख्याने लाल करत असतील तर त्यांना वेळीच चेतावनी द्या.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोविड -१९ चा धोका वाढतो. तसंच, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा आता दंडनीय गुन्हा आहे. याची माहिती त्यांना वारंवार द्या.

 

११. सहानुभूती असावी

 

corona and sari inmarathi

 

एक समाज म्हणून, या आजाराचा आपण पराभव करण्याचा मार्ग म्हणजे कोरोनाव्हायरस संक्रमणास तोंड देणार्‍या लोकांबद्दल सहानुभूती बाळगा.

या चाचणीच्या वेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण जी काही मदत करू शकतो ती करा.

कोविड -१९ चे रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सध्या मोठ्या भेदभावाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्यांची लढाई आणखीन कठीण झालीये. याबाबतीत जागरूक राहून रुग्णांबद्दल सहानुभूती दाखवूया.

१२. माध्यमांपासून लांब राहा

 

social media inmarathi

हे ही वाचा – घरातील आजारी माणसांची काळजी घेताना स्वतः आजारी पडायचं नाहीये ना? मग अशी घ्या काळजी!

देशात घडणार्‍या कुठल्याही गोष्टींचा प्रसार हा आपल्याकडे लगेच होतो. मागचे ४ महीने करोना बद्दल बातम्या ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतंय. इतकंच नाही तर मनात जास्त नकारात्मक विचार येतात.

जिथे कोरोना संबंधित खोटी माहिती दिसेल ती वाचू नका, पुढे पाठवू नका. आवश्यक बातम्याच बघा. दिवसभर तेच तेच ऐकू नका.

वर सांगितलेल्या १२ गोष्टी जर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या फायदा करता पाळल्यात तर तुम्ही नक्कीच कोरोनापासून लांब राहाल. त्यामुळे घरी राहा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि या आजारापासून मुक्त होण्यासाठी देशाला मदत करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?