आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतात खूप गोष्टी आहेत ज्याला रोजच्या जीवनात घडणार्या गोष्टींपेक्षा जास्तच महत्व दिलं जात. जसं की पॉलिटिक्स असेल, मनोरंजन असेल मग त्यात अगदी नाटकं, सिनेमा, सिरियल्स सगळचं आलं.
आणि तिसरं म्हणजे बॉलीवुड मध्ये काम करणार्या सुपरस्टार्स यांची पोरं.
ते काय करतात? ते काय जेवतात? मग कोणाबरोबर फिरायला जातात? किंवा आता कुठला निर्माता कोणाला नवीन सिनेमात घेणार? असे प्रश्न आपल्याला पडतात.
आणि मुख्य म्हणजे आपण अगदी उस्तूकतेने हे सगळं जाणून पण घेतो.
मागच्या आठवड्यात १४ जून रोजी सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली आणि आपल्या सगळ्यांनाच त्याच्या बातमीमुळे धक्का बसला. पण सुशांतने हे का केलं? कस केलं?
याची कारण जेव्हा समोर यायला लागली तेव्हा कळलं की त्याच्या मुलाखती मध्ये तो कायम सांगायचा मला अजून हवी तशी प्रसिद्धी बॉलीवुड मध्ये मिळत नाही.
फार कोणी मोठे निर्माते, कलाकार मला त्यांच्या पार्टीज मध्ये बोलवत नाहीत. या त्याच्या बोलण्याचा फायदा अनेक जणांनी घेतला आणि त्यांनी सोशल मीडियावर आपली मत मांडायला सुरुवात केली.
त्यातच झालं असं, की बॉलीवुड मधल्या अनेक कलाकारांनी, सिरियल्स मध्ये काम करणार्या कलाकारांनी सुशांतच्या या घटनेवर आणि त्याच्या मुलाखती यावर आपले विचार मांडले.
ज्यात कंगना रणावत, सोनू निगम आणि अशा बर्याच प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता.
जिथे त्यांनी निर्भीडपणे नेपोटीजम हा शब्द वापरुन करण जोहर, अमिताभ बच्चन, महेश भट अशा अनेक दिग्गज कलाकार आणि निर्मात्यांना ट्रोल करण्यात आलं.
यात सलमान खान, एकता कपूर, आलिया भट, रणबीर कपूर, वरुण धवन, अनन्या पांडे आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या नावाचा उच्चार अनेकदा करण्यात आला.
इंडस्ट्री मधली बाकीची लोकं या मुलांना त्यांच्या अॅक्टिंग स्किल्स पेक्षा त्यांना जास्त दर्जाची काम मिळतात. अशा ट्रोल्स ना सामोरं जायला लागली.
इतक नाही तर, या बॉलीवुडच्या ‘मुव्ही माफिया’ यांना आता आपण साथ द्यायची नाही म्हणून फेसबूक, ट्वीटर, इंस्त्रग्राम या सगळ्या ठिकाणी त्यांचे फॉलोअर्स झपाट्याने कमी झाले.
यावर खूप लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली.
पण सगळ्यात जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा यांच्यापैकीचं एक असणार्या ‘स्टार कीड’ सोनाक्षी सिन्हा हिने तिचे ट्वीटर अकाऊंट तिला या ट्रोलिंगचा कंटाळा आला आहे असे सांगून बंद केले.
खरतर ३३ वर्षीय सोनाक्षी सिन्हा ही हिन्दी इंडस्ट्री मधल्या तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या शत्रुघन सिन्हा यांची मुलगी. हिचा पहिला चित्रपट हा सलमान खान याचा दबंग होता.
त्या नंतर तिने लूटेरा, रावडी राठोड, कलंक, अकीरा असे अनेक सिनेमे केलेले आहेत. पण सोनाक्षी ही बॉलीवुड मध्ये आल्यापासूनच सगळ्या सोशल मीडियावर फार अॅक्टिव असते.
साधारण तिची भारतात घडणार्या प्रत्येक गोष्टीवर एक तरी पोस्ट असायची. हे सांगण्यासाठी की तिला देशात घडणार्या घडामोडींबद्दल काहीतरी वाटतं.
एप्रिल महिन्यात तिने ट्वीटर या माध्यमावर एक पोस्ट टाकली होती ज्यात तिने लिहिल होत, ‘मी आज घराबाहेर पडले. तर ट्रोलर्स ना वाटत असेल पब्लिसिटी केली नाही म्हणजे आम्ही मदत केली नाही, तर अस काही नाहीये.’
ती इथेच थांबली नाही तर काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम इथे अनेक फोटोज टाकले. ज्यात तिने तिचं बिनधास्त आणि भरपूर आत्मविश्वास असलेलं व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न केलं होता.
या पोस्टच्या खाली तिने ‘bigger than them’ असे वेगवेगळे कॅप्शन टाकले होते. त्याच बरोबर तिच्या ‘haters’ करता तिने खास संदेश दिला होता.
पण सुशांत सिंग राजपूत च्या झालेल्या आत्महत्येमुळे तिला ऐकावं लागलेल्या ट्रोल्सना तिने आधी अगदीच दुर्लक्षित केलं. आणि तिने याला निषेध म्हणून तिच ट्वीटर अकाऊंट शनिवारी बंद केलं.
सामान्य लोकांच्या मते इंडस्ट्री मधल्या मोठ्या घरातील मुलं पालकांच्या प्रसिद्ध असण्याने इंडस्ट्री मध्ये आहेत. ज्यामुळे सुशांत सारख्या चांगल्या कलाकारांना काम करायची संधी मिळत नाही.
आणि मग ते डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येचा मार्ग धरतात. याला मोठ्या प्रमाणात नेपोटीजम करणारे निर्माते, कलाकार जबाबदार आहेत.
याला प्रत्युत्तर म्हणून तिने ट्विटर वरुन जातांना ‘the first steps to protecting your sanity is to stay away from negativity.’ असा मेसेज एका फोटो बरोबर टाकला होता.
मुळात तिला सोशल मीडियावर निर्माण होणार्या नकारात्मक प्रचाराचा कंटाळा आला होता. आणि म्हणून सोनाक्षीने अकाऊंट बंद केलं असं इंस्टाग्राम या दुसर्या माध्यमावर तिच्या फॅन्सना सांगितलं.
तिच अस म्हणणं होत, की सुशांत याच्या आत्महत्येचा लोक फार वाईट वापर करत आहेत.
साधारण आमच्या सारख्या ‘स्टार किड्स’ यांना मध्ये आणून आणि उगाच आम्हाला बोलून स्वतःची किंमत कमी करतायत. इतकच नाही तर काही दुसरे कलाकार, गीतकार हे स्वतःच्या पब्लिसिटी आम्हाला बोलत आहेत.
आणि मला माझ्या कुटुंबाची मानसिक परिस्थिती खराब होऊ द्यायची नाही.
त्यामुळे अशा आमच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण तयार करणार्या फॅन्स आणि कलाकार यांच्यात राहायचे नाही अस सांगून ती ट्वीटर वरून निघून गेली.
या गोष्टीचा विचार केला तर अस वाटत, की बॉलीवुड मध्ये खरच असे प्रकार होतात जिथे अनेक चांगली टॅलेंटेड लोक मागे पडतात.
आणि आता तर सोनाक्षीने तिचे ट्वीटर अकाऊंट बंद करून स्वतःच हस करून घेतलं आहे. आणि स्वतःच बॉलिवूडची दादागिरी सिद्ध केली आहे अस आपल्याला म्हणता येईल.
कारण, जर तुमच्या बॉलीवुड मधल्या तुमच्या कुटुंबाचा फायदा तुम्हाला सिनेसृष्टीत होत नाहीये तर मग अकाऊंट का बंद केल?
शिवाय एक अकाऊंट बंद केल्याचं तिने दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून सांगणं हे देखील किती हास्यास्पद! आणि इंस्टाग्राम इथल्या तिच्या अकाऊंटचं तिने कमेंट सेक्शन सुद्धा बंद ठेवलं आहे!
ह्या सगळ्या गोष्टींवरून समजून येतं की ह्या स्टार किड्स ना लोकांचा विरोध स्वीकारता येत नाही!
एकंदरच सुशांत सिंह ची ही आत्महत्या बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणण्यास कारणीभूत ठरली आहे!
असो देशातील मोठ्या विषयांवर पण चर्चा होत नाहीये जेवढी या बॉलीवुड मध्ये घडणार्या घटनांवर होते. अजून कुठल्या कलाकाराने असे वागून सोनाक्षी सारखे स्वतःचे हसू करून घेऊ नये हीच इच्छा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.