Site icon InMarathi

‘सद्यस्थितीशी’ संबंधित असे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत ‘हे’ सिनेमे प्रत्येक भारतीयाने बघायलाच हवे!

war movies featured inmarathi

in.bookmyshow.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोणत्याही गोष्टीत जेव्हा दोन व्यक्तींचं एकमत होत नाही तेव्हा सुरू होतात मतभेद. हे मतभेद कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे एकमेकांशी बोलणे. बोलण्यातून मार्ग निघतात.

शांतता रहावी ही जर का दोन्ही व्यक्तीची इच्छा असेल तर पर्याय नक्की सापडतात आणि गोष्टी पूर्ववत होतात.

दोन देश हे सुद्धा असेच असतात. एकमेकांशी सलोख्याने वागणं हेच त्यांच्याकडून सर्वांना अपेक्षित असतं. कारण, त्यांच्या भूमिकेवर त्या दोन्ही देशाचं, त्यांच्या नागरिकांचं भवितव्य अवलंबून असतं.

त्यासाठीच शांतता करार केलेले असतात. हे करार दोन्ही देशांच्या तत्कालीन लोकांच्या संमतीनेच झालेले असतात.

पण, कालांतराने जसे सत्तेवर येणारे लोक बदलतात, तश्या त्या देशांची भूमिका सुद्धा बदलते.

भारत आणि चीन च्या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या संबंधामुळे हा विषय परत एकदा ऐरणीवर आला आहे.

 

swarajyamag.com

 

चीन सारखा देश जेव्हा अश्या चर्चेत सामील असतो तेव्हा निर्णय शांततेने होईल असं फार कमी वेळेस होतं.

याचं कारण, त्यांची महासत्ता बनण्याची महत्वकांक्षा. दुसऱ्याला हरवल्या शिवाय आपण जिंकू शकत नाही ही त्यांची विचारसरणी कायम वाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरली आहे.

भारत हा मुळातच value system ला धरून चालणारा देश असल्याने स्वतःहून आपण कधीच कोणतं युद्ध छेडलेलं नाहीये.

सध्याच्या परिस्थितीत सुद्धा भारत बोलणी साठी तयार आहे. पण, चीन कडून योग्य प्रतिसाद मिळत नाहीये.

सामान्य माणसाला या युद्धाची माहिती होणं आणि ती लक्षात राहणं यासाठी त्यावर ‘सिनेमा बनणं’ हे फार गरजेचं वाटतं. याला दोन बाजू आहेत.

काहींना असं वाटेल की, सिनेमा तयार झाला की आपले संरक्षण धोरण हे इतर देशांना कळेल हा एक धोका असतो. दुसरी बाजू अशी आहे की, आपल्या सैन्याच्या कामगिरीबद्दल प्रत्येकाला कळावं ही प्रत्येकाची भावना असते.

जे एखादं लिखाण पूर्ण पुस्तकातून सांगेल ती गोष्ट सिनेमा दोन तासात आपल्याला सांगत असतो आणि नकळत आपल्याला देशभक्तीच्या भावनेनी प्रेरित करत असतो.

आज पर्यंत झालेल्या जवळपास प्रत्येक युद्धावर बॉलीवूड ने सिनेमा तयार केले आहेत. त्याचा एक आढावा घेऊया!

१. उरी (२०१९) :

 

youtube.com

 

पाकिस्तान च्या अतिरेकी कारवायांना भारताने दिलेलं चोख प्रत्युत्तर म्हणजे ‘URI – The Sergica Strike’. प्रत्येक भारतीय हा सिनेमा बघताना एक वेगळाच ‘जोश’ feel करत होता.

इंडियन आर्मी चं कार्य विकी कौशल ने आणि सुरक्षा समिती चे अध्यक्ष म्हणून परेश रावल यांनी हा पूर्ण घटनाक्रम आपल्यासमोर आणला.

या विषयावर सिनेमा बनवणं हे खरंच अवघड काम होतं कारण ही घटना पूर्णपणे रात्री घडलेली होती आणि ती तशीच सादर करणे हे ग्रेट काम दिगदर्शक आणि टीम ने केलं.

 

२. बॉर्डर (१९९७) :

 

sacnilk.com

 

१९७१ च्या भारत – पाकिस्तान च्या युद्धावर जे. पी. दत्ता यांनी दिगदर्शीत केलेला हा सिनेमा या विषयावरील सर्वोत्तम सिनेमा म्हणता येईल.

सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, तबू, पूजा भट, अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट घेऊन तयार केलेला हा सिनेमा लोकांना खूप ‘कनेक्ट’ झाला.

याच सिनेमातील “संदेसे आते है, हमे तडपाते है…” हे गाणं आजही लोकांना तितकंच आवडतं.

युद्ध आणि आपल्या सैनिकांचं भावविश्व हे दोन्ही या सिनेमा इतकं योग्य दाखवणं इतर कोणत्याच दिग्दर्शकाला आजपर्यंत जमलेलं नाहीये.

 

३. एल.ओ.सी कारगिल (२००३) :

 

telegraphindia.com

 

कारगिल युद्धाची विजयगाथा सांगणारा हा सिनेमा सुद्धा जे.पी. दत्ता यांनीच दिगदर्शीत केलेला आहे. हा सिनेमा सुद्धा त्याच्या मोठ्या स्टारकास्ट आणि मोठी लांबी यासाठी खूप चर्चेत होता.

युद्ध रणनीती, त्यात येणाऱ्या अडथळे आणि त्यावर मात करणारे आपले भारतीय सैनिक हे या सिनेमात खूप योग्य पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे.

 

४. हिंदुस्तान की कसम (१९७३) :

 

youtube.com

 

चेतन आनंद यांनी दिगदर्शीत केलेला हा सिनेमा भारत – पाकिस्तान मधील १९७१ च्या युद्धात वापरण्यात आलेल्या ‘कॅक्टस लिली’ या ऑपरेशन वर बेतलेला आहे.

रिलीज झाल्यावर या सिनेमाला प्रेक्षकांची अपेक्षित दाद मिळाली नाही. पण, काही वर्षांनी लोकांनी हा सिनेमा ‘नोटीस’ केला आणि या सिनेमाचा समावेश सुद्धा युद्ध या विषयावर तयार झालेल्या सर्वोत्तम सिनेमांमध्ये झाला.

राजकुमार यांची या सिनेमात प्रमुख भूमिका होती.

 

५. १९७१ (२००७) :

 

indiatv.in

 

 

नावाप्रमाणेच हा सिनेमा सुद्धा १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्धाची माहिती देणारा आहे. अमृत सागर यांनी या सिनेमाचं दिगदर्शन केलं होतं.

मनोज वाजपेयी, रवी किशन, पियुष मिश्रा ह्या कलाकारांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केली होती.

बॉक्स ऑफिस वर हा सिनेमा तितका चालला नाही. पण, देशसेवा प्रथम हा संदेश हा सिनेमा नक्कीच देतो.

 

६. लक्ष्य (२००४) :

 

justwatch.com

 

हृतिक रोशन ने काम केलेल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक असा हा सिनेमा आहे.

एका दिशाहीन तरुणाला आयुष्यात कशी दिशा मिळते आणि तो पुढे जाऊन लेफ्टनंट करण शेरगिल बनतो आणि पाकिस्तानी सैन्याशी लढताना प्रमुख भूमिका निभावतो त्याची ही कथा आहे.

देशप्रेम आणि तरुणपणी असलेल्या दिशाहीन तरुणांचं वागणं दाखवणारा हा एक प्रेरणादायी सिनेमा आहे.

 

७. हकीकत (१९६४) :

 

unbumf.com

 

भारत आणि चीन यांच्यात १९६२ मध्ये झालेल्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे.

चेतन आनंद यांनी दिगदर्शीत केलेला हा सिनेमा भारतीय सिनिकांचं शौर्य दाखवणारा हा सिनेमा आहे.

धर्मेंद्र, बलराज साहनी, संजय खान, प्रिया राजवंश आणि विजय आनंद अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती.

 

८. आक्रमण (१९७५) :

 

youtube.com

 

हा सिनेमा सुद्धा १९७१ च्या युद्धावर बेतलेला आहे. राकेश रोशन, संजीव कुमार आणि अशोक कुमार यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात होत्या.

 

९. ललकार (१९७२) :

 

youtube.com

रामानंद सागर यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा भारतीय सैनिक आणि जपानी सैन्य यांच्यात बर्मा येथे वर्ल्ड वॉर २ च्या दरम्यान झालेल्या चकमकीची माहिती देतो.

धर्मेंद्र, संजीव कपूर, राजेंद्र कुमार यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केल्या होत्या.

 

१०. विजेता (१९८२) :

 

stories.udchalo.com

 

गोविंद निहलानी यांचं दिगदर्शीत केलेला हा सिनेमा सुद्धा एका दिशाहीन तरुणाची कथा सांगणारा आहे जो की पुढे जाऊन एअरफोर्स पायलट होतो आणि देशसेवा करतो.

शशी कपूर आणि रेखा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.

आपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीत आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.

बॉलीवूड चे सिनेमे हे आपल्या भावनांचं यथार्थ दर्शन मोठ्या पडद्यावर घडवतात.

याच कारणामुळे आपण मल्टिप्लेक्स मध्ये सुरुवातीला राष्ट्रगीत ऐकल्या नंतर काही जण आपसूक ‘भारत माता की जय’ अशी आरोळी देतात.

याच कारणामुळे देशभक्तीपर सिनेमा बघून थिएटर मधून बाहेर पडताना आपण एका वेगळ्याच उत्साहात बाहेर पडत असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version