आहारात हे १० पदार्थ असतील तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याची शाकाहारी लोकांना गरज पडणार नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याकडे शाकाहार करणारे आणि मांसाहार करणारे असे दोन प्रकारचे लोक आहेत. मांसाहार करून खूप ताकद येते, त्यामध्ये खूप प्रोटीन्स् म्हणजे प्रथिने जास्त असतात.
मग शाकाहारी लोकं कशी तंदुरूस्त राहतील! त्यांना प्रथिने कशी मिळतील?
“शाकाहार म्हणजे घासपूस, ते खाऊन काय ताकद येणार! मांसाहार करून आम्हाला ताकद मिळते, प्रथिने मिळतात जे तुम्हाला कसं मिळणार?” असे मांसाहार करणारे नेहेमी शाकाहार करणार्यांना म्हणतात.
बऱ्याचदा शाकाहार करणाऱ्यांकडे सडेतोड उत्तर नसते ह्या मांसाहारी लोकांना द्यायला!
पण, शाकाहार असणारे असे काही पदार्थ आहेत जे प्रोटीन्स् युक्त असतात, ज्यांच्या सेवनाने ताकद येते.
चला तर मग आज आपण ह्या लेखातून प्रथिनांनी युक्त पदार्थ बघूया आणि त्या माहिती नुसार मांसाहारी लोकांना शाकाहारी लोकांनी लगेच सांगावे की हे पदार्थ आहेत प्रथिनांनी भरलेले, ताकद देणारे!
१. सोयाबीन :
सोयाबीन हे धान्य असे आहे ज्यामध्ये प्रथिनांची मात्रा भरपूर प्रमाणात असते. ह्यशिवाय ह्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील असतात.
ह्याशिवाय ह्यामध्ये वजन कमी करण्यास मदत करणारे देखील घटक असतात.
ह्याशिवाय सोयाबीनच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहणे, वाढलेला रक्तदाब कमी होणे, कोलेस्टेरॉलची पातळी कमी कमी होणे ह्यासारखे फायदे देखील होतात.
सोयबीन्स ची उसळ खाऊ शकतात किंवा सोया चंक्स् ची भाजी किंवा सोया चंक्स् भात, पुलाव ह्यामध्ये घालून खाण्यामुळे शरीराला खूपच फायदा होतो.
२. मसूर :
१ कप मसूर मध्ये साधारण १८ ग्राम प्रथिने असतात. शिवाय ह्यामध्ये फोलट, मॅंगनिज आणि लोह असते. ह्याच्या सेवनाने हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.
रक्तातील साखरेचे प्रमाण, अतिरिक्त वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते तसेच, कर्करोग होण्याची शक्यता कमी होते जेवणात नियमित पणे मसूर सेवन केल्याने!
मसूरची उसळ होते, सॅलड मध्ये वापरू शकतो तसेच मसूर डाळ देखील शरीरासाठी खूप उपयुक्त असते.
ह्याची आमटी होऊ शकते, दुसऱ्या कोणत्याही भाजीत मसूर डाळ घालून भाजी अजून ‘हेल्दी आणि टेस्टी’ होऊ शकते.
शिवाय लोह, मॅंगनिज ह्यासारख्या घटाकांमुळे मसूर सेवन करणे शरीरासाठी जास्त उपयुक्त असते. त्यामुळे मसूराचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असते.
३. टोफू :
टोफू म्हणजेच सोया पनीर, सोयाबीन पासून दूध काढून त्यापासून हे टोफू किंवा पनीर बनविले जाते. हे अतिशय पौष्टिक, आणि मुख्य म्हणजे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.
ह्याला जास्त चव नसते ह्यापासून थाई करी, सूप, बिना अंड्याचे केक, पुडिंग्ज्, चीज केक बनते. शिवाय, पनीर प्रमाणेच ह्याची भाजी देखील करता येते.
पुलाव, बिर्याणी, परोठे ह्यामध्ये देखील टोफू वापरता येते.
ह्याचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. प्रथिनांशिवाय ह्यामध्ये कॅल्शियम, लोह असते जे आपल्या शरीराल पोषक असतात.
शिवाय टोफूच्या सेवनाने कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याची शक्यता फारच कमी असते आणि सोयाबीनचेच सर्व गुणधर्म ह्यात असतात ज्यामुळे सोयाबीन सेवनाचेच फायदे टोफूच्या सेवनाने मिळतात.
४. किनोवा :
गेल्या काही वर्षांत जसे डाएटचे ‘फॅड’ वाढलंय तसंच एका पदार्थाचा ह्या डाएट फूड मध्ये समावेश वाढला आहे. तो म्हणजे किनोवा.
ह्याला सुपरफूड देखील म्हंटल जाते, कारण ह्यामध्ये प्रथिने तर असतातच शिवाय ह्याच्या सेवनाने शरीराला घातक अशा आजारांपासून धोका होत नाही.
कारण ह्यात विटॅमिन ई, फायबर, झिंक, फायबर ह्यांचे प्रमाण जास्त असते. ज्याच्या सेवनामुळे हृदयविकार होऊ शकत नाही, कॅन्सरची शक्यता कमी असते, मधुमेह कमी होण्यास मदत होते.
हा डाळीचाच एक प्रकार आहे. ह्यापासून सॅलड, पोहे, उपमा एव्हढंच नाही तर पोळी देखील होऊ शकते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे डाएट फूड आहे म्हणजेच् ह्याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.
५. हिरवे वाटाणे :
हिरव्या वाटाण्यामध्ये प्रथिने तर भरपूर प्रमाणात असतातच शिवाय, व्हिटॅमिन ए, सी, के, फायबर, लोह, मॅंग्नेशियम, जस्त, तांबे ह्यांचे देखीएल प्रमाण जास्त असते.
त्यामुळे हिरव्या वाटाण्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही, हृदयाशी संबंधित समस्या उद्भवत नाहित, वजन कमी होते, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
ह्याची उसळ होऊ शकते, पॅटिस, पुलाव, बिर्याणी, करंज्या इत्यादी अनेक पदार्थ होऊ शकतात.
६. हेम्पसीडस् (गांजाच्या बीया) :
गांजा शरीरासाठी हानीकारक असतो पण त्याच्या बीया शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात.
ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स् असतात. शिवाय हे फायबर, व्हिटॅमिन, फॉस्फरस, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न असतात जे शरीरासाठी अत्यंत उपतुक्त असतात.
हे डाएट सप्लीमेंट म्हणून फार पूर्वीपासून वापरले जाते. म्हणजेच ह्याने ताकद मिळतेच शिवाय वजन कमी करण्यास देखील मदत होते.
ह्याचे सेवन शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते, प्रथिनांनी भरपूर असल्याने ताकद तर मिळतेच शिवाय हृदयाचे विकार उद्भवत नाहीत. हाडे मजबूत होतात. दात, हिरड्या मजबूत होतात.
गांजाच्या बीया कोशिंबिरीत घालू शकतो, शिवाय पेस्ट करून दूधातून घेऊ शकतो. ‘स्मूदी’ मध्ये ह्याचा वापर केला जाऊ शकतो.
७. मोड आलेल्या कडधान्यांपासून तयार केलेला ब्रेड :
गहू, बार्ली, बाजरी, सोयाबीन आणि मसूर ह्यासारख्या कडधान्यांना मोड आणून त्यापासून ब्रेड बनविला जातो. आज काल हा ब्रेड बाजारात सहजपणे मिळतो, सुपरमार्केट मध्ये देखील हा ब्रेड उपलब्ध असतो.
नेहेमीच्या ब्रेडपेक्षा ह्याची चव जरा वेगळी असते पण प्रथिनांनी परिपूर्ण असणारा हा ब्रेड तब्येतीसाठी साध्या ब्रेडपेक्षा जास्त चांगला असतो.
ह्यात प्रथिनांबरोबरच फायबर, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि ई, बीटा-कॅरोटिन असतात ज्यामुळे शरीराला पोषण मिळते.
८. ओटस् :
ओटस् हे प्रथिनांनी युक्त असते शिवाय ह्यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फेट, फॉस्फरस ह्यांचे देखील प्रमाण भरपूर असते. ह्याचा वापर देखील डाएट फूड मध्ये केला जातो.
ह्यामुळे वजन कमी होते शिवाय ताकद देखील मिळते. शिवाय बऱ्याच रोगांपासून संरक्षण होते. ओटस् चा उपमा, घावन किंवा डोसे होतात आणि ओटस् दूधात घालून खाल्ले जातात.
९. राजगिरा :
आपल्याकडे फार पूर्वीपासून राजगिरा खाल्ला जातो. राजगिरा लाडू तर सगळ्यांच्या आवडीचा असतो. उपवासाला ह्याचे सेवन केले जाते.
ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात शिवाय ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह, कॅल्शियम असतात ज्याचे सेवन आपल्या शरीराला खूपच लाभदायक असते.
ह्याची चिक्की, लाडू, वडी असते शिवाय ह्याच्या लाह्या देखील असतात ज्यांचे दूधातून किंवा ताकातून सेवन करणे खूपच आरोग्यदायी असते.
१०. प्रथिने युक्त फळे आणि भाज्या :
सर्व भाज्या आणि फळे ह्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण असते फक्त ते कमी जास्त असते. सर्वाधिक प्रथिने असणार्या भाज्या पालक, शतावरी, बटाटे, रताळी, ब्रोकोली ह्या आहेत.
आपल्या अन्नात, जेवणात ह्यांचा समावेश जरूर करावा. फळांपैकी सर्वात जास्त प्रथिने असणारी फळे आवळा, पेरू, संत्री, स्ट्रॉबेरी, केळी ह्यांचा समावेश होतो.
ह्यांचे सेवन शरीराला प्रथिने देणारे ठरते तसेच फळांचे आणि भाज्यांचे सेवन हे शरीराला उपयुक्त असतात.
प्रथिनांशिवाय व्हिटॅमिन्स्, फॉस्फरस, झिंक असे शरीराला लाभदायक घटक ह्यात असतात.
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.