Site icon InMarathi

या १३ बॉलिवूड स्टार्सनी यश मिळवण्यासाठी ‘हेदेखील’ सहन केलं आहे, वाचा!

bollywood stars inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नावात काय असतं.. चेहरा काय, मन साफ हवं या गोष्टी ऐकायला, म्हणायला खूप छान आहेत. पण बाॅलिवुडमध्ये काम करायला, काम मिळवायला चेहराच लागतो.

सिनेमात काम करायचं तर चेहरा फोटोजेनिक हवाच हवा. कारण तिथं काही मन नाही हो चेहरा दाखवायचा असतो. कुणीही उठून सिनेमात काम करु शकत नाही बरं, ही सुंदर चेहऱ्याची देणगी ही देवदत्तच असते.

तिथं कुणीही काही करु शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे?आज कितीतरी नावाजलेले स्टार्स एकेकाळी नाकारले गेले होते!

कित्येक जणांना उंबरे झिजवूनही केवळ आकर्षक रंग रुप नाही म्हणून नकारघंटा मिळाल्या. पण ज्याच्यामध्ये ते‌ टॅलेंट आहे ते कधीच लपून रहात नाही.

त्या टॅलेंटच्या अभिनयाच्या जोरावर तीच सुमार समजली गेलेली माणसं पुढं आली आणि आज त्यांच्या कामाची. अभिनयाची तारीफ करताना लोक थकत नाहीत.

 

 

अर्थात लोकांची अभिरुची पण बदलली आहे काळाच्या ओघात! इतकी की, अभिनय आणि कौशल्य हीच आता बाॅलिवुडमध्ये प्रवेशासाठी प्रमाणके बनली आहेत.

पण एक काळ असा होता, तेंव्हा फक्त आणि फक्त रुपच बाॅलिवुडचं प्रमाण होतं! भले तुमचा अभिनय सुमार दर्जाचा असूद्या पण रुपानं तुम्ही उत्तमच असायला हवं.

हे ही वाचा प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या ह्या बॉलीवूड स्टार्सनी कसलंही मानधन न घेता केलेत हे सिनेमे!

याच कारणासाठी कितीतरी चांगले लोक कामापासून वंचित राहीले. त्यांना नकाराचे कडू घोट बाॅलिवुडनंच पाजले होते.

पण तुमच्याकडं प्रखर आशावाद आणि विशाल हृदय असेल तर हे नकार तुमचं काहीही बिघडवत नाहीत. उलट नंतरच्या काळात हेच अपमान तुम्हाला उत्तमातलं उत्तम देण्याची प्रेरणा देतात.

हेच ते नकार पचवणारे लोक पुढं अभिनयाच्या जोरावर पुढे हे स्टार झाले. आज त्याच स्टार लोकांची माहिती

१. कॅटरिना कैफ –

 

 

रुपानं सुंदर असूनही कॅटरिनाचा विदेशी लुक मनास येत नव्हता. शिवाय तिची हिंदी फारशी चांगली नव्हती. त्यामुळे कॅटरिना कैफ एकेकाळी नाकारली गेली होती.

२. गोविंदा –

 

 

गोविंदा हा बाॅलिवुडमधला नावाजलेल्या कलाकारांपैकी एक. पण त्याच्या रंग रुपावरुनच त्यालाही खूप नकार पचवावे लागले. पण गोविंदाने हिंमतीने ते पचवत आपला ट्रेंड निर्माण केला होता.

३. शाहरुख खान –

 

 

आपलं करिअर छोट्या पडद्यावर चालू केलेला शाहरुख खान आता बाॅलिवुडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. पण सुरुवातीला त्याच्या कामाची जराही दखल घेतली गेली नाही की कुणी त्याचं कौतुक केलं नव्हतं.

पण प्रचंड आशावाद आणि प्रयत्न करत शाहरुख खान आज बाॅलिवुडचा किंग खान झाला आहे.

४. इरफान खान –

 

 

नुकताच कॅन्सरच्या दुर्धर आजाराने निधन झालेला इरफान खान हा तर एक आयडाॅल ठरावा अशी कारकीर्द घडवून गेला.

त्याच्या सहजसाध्य अभिनयाने त्यानं किती लोकांची मनं जिंकली. पण निर्मात्यांना तो सुरुवातीला इतका टुकार वाटायचा की त्याला कितीदा तरी विना वेतन काम करावं लागलं होतं.

पण निराश न होता इरफाननं आपलं काम चालूच ठेवलं आणि जेंव्हा इरफान गेला..लोकांना आपल्यातलाच एक आपल्यासारखाच एक माणूस गेल्याचं दुःख झालं होतं.

हीच त्याच्या अभिनयाची पावती आहे.

५. अनुष्का शर्मा –

 

 

विराट कोहलीची पत्नी होण्याआधी अनुष्का बाॅलिवुड मधली नावाजलेली अभिनेत्री आहे. तिलाही सुरुवातीला तिच्या साध्या दिसल्यामुळे कित्येक निर्मात्यांनी नकार दिला होता.

पण अनुष्का प्रयत्नशील राहीली. आणि आज ती नावाजलेल्या कलाकारांपैकी एक आहे.

६. नवाजुद्दीन सिद्दीकी –

 

 

अत्यंत सामान्य चेहरा असलेल्या नवाजुद्दीनला कित्येक निर्मात्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या.

पण त्याचा शंभर नंबरी अभिनय त्याला अशा ठिकाणी घेऊन गेला की बजरंगी भाईजान सुध्दा त्यांचे फॅन झाले. आणि पुरस्कार मिळवून नवाजुद्दीन आता एक प्रथितयश नट म्हणून ओळखला जातो.

हे ही वाचा तुमच्या आवडत्या बॉलीवूड स्टार्सची आवडती हॉलिडे डेस्टिनेशन्स तुम्हाला माहित आहेत का?

७. कोंकणा सेन शर्मा –

 

 

आपल्या सावळ्या रंगामुळे कोंकणाला खूप नकारांचा सामना करावा लागला होता. पण सशक्त अभिनयाच्या जोरावर तिनं जे सिनेमे केले ते तिला उत्तम अभिनेत्री ठरवून गेले आहेत.

८. रणवीर सिंग –

 

 

उत्तर भारतीय लुक आहे हे कारण असू शकतं का हो कुणाच्या नकाराचं? नाही…‌पण रणवीरला याच कारणानं नकार दिले गेले. पण रणवीर काम करत राहीला.

आणि कितीतरी पुरस्कार त्याला अभिनयासाठी मिळाले. म्हणजे दिसणं महत्त्वाचं की काम?

९. अजय देवगण –

 

 

सिंघम, गंगाजल अशा उत्तम कथानकं असणाऱ्या सिनेमाचा हिरो अजय देवगण हा त्याच्या सर्वसाधारण दिसल्यामुळे सुरुवातीच्या काळात नाकारला गेला.

पण तीव्र इच्छा शक्ती आणि अखंड प्रयत्न यांच्या जीवावर अजय देवगण आज बाॅलिवुड मधला नावाजलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो.

१०. अर्जुन कपूर –

 

 

सुरुवातीला अर्जुन कपूर अतिशय थुलथुलित होता. त्याच्या अति वजनाने त्याला हेटाळणी युक्त नकार मिळाले होते. पण त्यानं त्यावर मात करत आपलं स्थान बनवलं आहे.

११. अमिताभ बच्चन –

 

 

मॅन ऑफ द मिलेनियम असलेला अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांची फारच जास्त असलेली उंची आणि आवाज यासाठी फार हेटाळणी सहन करावी लागली होती.

पण आता त्याच त्यांच्या वैशिष्ट्यांनी त्यांना एक लिजंड बनवलं आहे.

१२. तब्बू –

 

 

तब्बू ही काही नाजूक साजूक अभिनेत्री नव्हे. तिच्या एकंदरीत पुरुषी दिसण्यामुळं‌ तिला फार वेळा नकार पचवावे लागले होते. पण ज्यांचं‌ काम उत्तम असतं त्यांचं कामच बोलतं!

तब्बू कितीतरी चांगल्या भूमिकांनी नावाजली गेली आहे.

१३. धनुष –

 

 

व्हाय धिस कोलावरी डी… आठवतं का हे गाणं? या गाण्यानं‌ लोकप्रिय झालेला धनुष हा त्याच्या रंगामुळे आणि अतिशय साधारण दिसण्यामुळे खूपदा नकारला गेला आहे.

पण दक्षिणेत आजही त्याचा जलवा आहे!

थोडक्यात काय, तुमचं काम उत्तम असेल तेंव्हा तुमचं रंगरुप दुय्यम ठरतं. तुम्ही तुमचं स्थान मजबूत करता ते कामाच्या जोरावर.

वशिल्यानं, रंग रुप पाहून कदाचित तुम्हाला काम मिळेलही पण ती न पुरणारी शिदोरी असते.

तुमच्यात असणारा सकारात्मकपणा, मेहनतीची तयारी आणि आशावादी इच्छाशक्ती हेच यशाच्या शिखरावर नेणारे सोपान आहेत हेच या सर्वांना बघताना वाटतं! नाही का?

===

हे ही वाचा नोकरी करत व्यवसाय करायचाय? ह्या “सिनेस्टार्सची स्ट्रॅटेजी” तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version