Site icon InMarathi

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

anil kapoor inmarathi featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बॉलिवूड ही एक अशी जागा आहे जिथे स्थिरस्थावर होण्यात कित्येकांची आयुष्य निघून जातात पण तरीही त्यांना यश मिळत नाही! कित्येक लोकं इथे येण्यासाठी काय काय करतात?

काही लोकं घरदार सोडून येतात तर काही आई वडिलांशी खोटं बोलून इथे आपली स्वप्नं पुरी करण्यासाठी येतात! पण सगळेच त्या यशाच्या शिखरावर विराजमान होतात का? तर नाही!

काहींना यश मिळतं तर काही लोकांना निराश होऊन तिथून बाहेर पडाव लागतं, काही लोकं तर इतके निराश होतात की डिप्रेशन मध्ये देखील जातात!

ते म्हणतात ना की ही मायानगरी आहे, ते अगदी खरंच आहे!

 

studiobinder.com

 

माणसाचं आयुष्य किती वेगवेगळ्या प्रकारच्या चढ उताराचा रस्ताच असतं. कधी कधी आपण अनपेक्षितपणे यशस्वी झालेली माणसं पाहतो.

गरिबातील गरिब माणूस मेहनत आणि सचोटीने यशाचं शिखर गाठतो तर एखादा श्रीमंतातील श्रीमंत आपल्या चुकीच्या निर्णयाने धुळीला मिळून दरिद्री झालेला दिसतो.

यातील काही प्रेरणादायी कथा असतात तर काही धडे. पण प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवते. आज आपण अशीच एक प्रेरणादायी कथा बघणार आहोत.

आपण सर्वसाधारण माणसं, जेंव्हा आपलं भवितव्य घडवण्यासाठी मोठ्या शहरात जायचं ठरवतो तेंव्हा काय करतो? आपला जवळचा नातेवाईक असेल त्याची मदत घेतो.

एकंदरीत रहाण्याची, जेवणाखाणाची सोय त्याच्याकडं करुन घेतो. समजा, जेवणखाण नाही जमलं तरी रहायचा खर्च वाचवण्यासाठी किंवा दुसरी सोय होईपर्यंत त्याच्याकडं राहतो.

थोडे पैसे गाठीला जमले की आपली आपली सोय बघतो. हे कुणालाच चुकलं नाही. अगदी मोठे स्टार म्हणून चमकलेले लोकही याला अपवाद नाहीत.

आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कितीतरी जणांनी आपला सुरुवातीचा धडपडीचा काळ असाच घालवला आहे. कुणी फुटपाथवर झोपलं..कुणी मित्राकडं तर कुणी एका कोंदट खोलीत!

 

scoopwhoop.com

 

आज आपण ज्या व्यक्तीबद्दल वाचणार आहात त्यांनी आपला सुरुवातीचा काळ आपल्या प्रचंड श्रीमंत नातेवाईकाच्या गॅरेजमध्ये काढला होता.

मग नंतर जसा पैसा जमला तसं ते गॅरेज सोडून एका चाळीत रहायला गेले. कोण आहेत ते?

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. ज्यामध्ये उत्पन्नाचा काही स्त्रोत सापडेल आणि आपलं आयुष्य मार्गी लागेल हाच हेतू मनाशी होता.

सहा जणांचं हे कुटुंब होतं. पत्नी निर्मला, रिना , बोनी, अनिल आणि संजय कपूर ही भावंडं. इतक्या मोठ्या कुटुंबाला मुंबईत असला मिळणं हे त्याहीवेळी कठीणच होतं.

अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

 

Youtube.com

 

कपूर हे नांवच हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मैलाचा दगड ठरलेलं.‌ पृथ्वीराज कपूर, त्यांचा मुलगा राज कपूर त्यांची भावंडं शम्मी, शशी, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव..

स्वतः पृथ्वीराज कपूर हे एक विद्यापीठ म्हणावं अशी त्यांची कारकीर्द. पृथ्वी थिएटर्सचा पायाच त्यांनी घातला आहे.

तर अशा आपल्या नातेवाईकांना सुरिंदर कपूर भेटल्यावर राज कपूरनी या मोठ्या कुटुंबाला आपल्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गॅरेजमध्ये रहायला जागा दिली.

पुढं थोडी पैशाची जमवाजमव करून सुरिंदर कपूरनी आपलं कुटुंब दुसऱ्या उपनगरात असलेल्या चाळीतील एका खोलीत नेलं.

कपूर खानदानातील चालू पिढीतील रणबीर, करीना ही नांवं पाहून कपूर घराणं सिनेमाशी चार पिढ्या बांधलेलं आहे हे कळतंच.

पण याचसोबत अजूनही एक कपूर आहे, ज्यांनी विविध रंगी भूमिका करुन आपलं वेगळं अस्तित्व जपलेलं आहे.‌

वो सात दिन मधला प्रेम प्रताप पतियालावाले, राम लखन मधील डांबरट लखन, विरासत मधील शक्ती ठाकूर असो की वेलकम् मधील मजनूभाय…

या भूमिकेतून त्याच्या अभिनयाचा ग्राफ किती वेगवेगळे प्रकार दाखवतो हे लक्षात आलं असेलच.

ही भूमिकांची यादी वाचून ओळखलं ना कपूर या नावाने बाॅलिवूडला राज, शशी, शम्मी, ऋषी ,रणधीर, राजीव यांच्यासह दिलेला अजून एक एव्हरग्रीन हिरो दिला तो म्हणजे अनिल कपूर!

 

indiatvnews.com

 

तुम्हाला माहिती आहे का अनिल कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांचं खूप जवळचं नातं आहे. पृथ्वीराज कपूर यांना ओळखत नाही असा भारतीय असणंच अशक्य आहे.

त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान, चार पिढ्या बाॅलिवूडमध्ये कार्यरत आहेत. तसाच अनिल कपूर!

विविधांगी भूमिकांनी सजलेला त्याचा करिअरचा ग्राफ केवळ हिंदी चित्रपटसृष्टीत मर्यादित न राहता हाॅलिवूडपर्यंत सरकला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ सिनेमाच नाही तर सिरीज मध्येही तो झळकला आहे. कितीतरी अवॉर्ड अनिल कपूरच्या नांवावर जमा आहेत.

सिनेमाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात अनिल कपूरचा जन्म झाला. चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर यांचा अनिल मुलगा. मुंबईत अनिलचा जन्म झाला.

सुरिंदर कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे चुलतभाऊ. जेंव्हा ते मुंबईत आले तेंव्हा आपल्या कुटुंबासह पृथ्वीराज कपूर यांच्या घरातील गॅरेजमध्ये राहीले. बोनी कपूर अनिलचा मोठा भाऊ.

तर संजय कपूर त्याचा धाकटा भाऊ.

 

hindustantimes.com

 

१९७७ साली अनिल कपूरने सिनेमासृष्टीत प्रवेश केला. आणि हळूहळू विविधांगी भूमिका करत आपला आलेख चढता ठेवला. वो सात दिन मधल्या भूमिकेने अनिलला ओळख मिळवून दिली.

मशाल या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पहिला फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जेंव्हा जेंव्हा कपूर घरातील समारंभ संपन्न होतात तेंव्हा प्रत्येक वेळी बोनी, अनिल, संजय हे सगळे सहकुटुंब हमखास दिसतात कारण हे खूप जवळचे नातेवाईक आहेत.

एकमेकांच्या सर्व बऱ्या वाईट वेळी यांनी एकमेकांना कशी शक्य ती मदत केली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version