फार नाही – फक्त या १५ गोष्टी नियमित करा, तुमचं हृदय अगदी तंदुरुस्त राहील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हार्ट अटॅक हे नाव ऐकलं तरी क्षणभर भीती वाटते ना? पण आधुनिक जीवनशैलीमुळे हा रोग तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. वयोवृद्ध व्यक्तींपेंक्षा तरुण लोकांना याचा धोका वाढला आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणाव, बैठी कामे, व्यायामाचा अभाव, जेवणखाण्याच्या अनियमित वेळा, यामुळे खूपदा तरुणांना मधुमेह -हृदयविकार असे आजार झालेले आढळतात.
काय असतो हा हार्ट अटॅक? सोप्या शब्दात सांगायचं तर, हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला की जो धक्का बसतो तो हृदयाला. तोच हार्ट अटॅक!!!
पण तज्ज्ञ लोकांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचे पालन केले असता हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालू राहते आणि हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो.
१. योग्य आहार-
योग्य आहार घेणं म्हणजे जे जीभेला आवडतं तेच न खाता शरीराला उपयुक्त असलेलं अन्न खाणे. चीज, बर्गर हे पदार्थ दिसायला छान दिसतात पण त्याचं अतिसेवन घातक आहे.
यातील सॅच्युरेटेड फॅट्स मुळे धमनी काठीण्य, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होऊन हृदयविकार होण्याची शक्यता बळावते. म्हणून असे पदार्थ टाळावेत.
लोणी, चीज, बर्गर यांचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं.
२. अनसॅच्युरेटेड फॅट्स युक्त आहार-
अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे असा आहार ज्यात सॅच्युरेटेड फॅट्स नसतील. उदा. तीळ तेल, सोयाबीन तेल, शेंगतेल इत्यादी.
यातील पौष्टिक घटकांमुळे आरोग्य चांगले राहाते व हृदयविकाराच्या त्रासाला टाळता येऊ शकते.
३. व्यायाम-
सायकलिंग, टेनिस खेळणे आणि इतर वर्क आऊट अशा व्यायामाने तुमची रक्ताभिसरण संस्था सुधारते. आणि हृदयविकाराच्या त्रासाची शक्यता कमी होते.
साधारणपणे ४५ मिनीटे ते एक तास नियमितपणे व्यायाम करणे हा आरोग्याचा मंत्र आहे.
सतत एका जागी बसून राहण्यानेही शरीर स्थूल बनते आणि वजन वाढीला लागले की त्या अनुषंगाने इतर अनेक रोगांची लक्षणे दिसतात. जसे मधुमेह हृदयविकार इ. म्हणून एका जागी सतत बसून राहू नये.
४. फळे व भाजीपाला-
फळे व पालेभाज्या यांच्या सेवनाने जी पोषणमूल्यं मिळतात ती असतात मिनरल्स- खनिजे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
५. साखरेचे प्रमाण कमी-
आहारातील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. अमेरिकन हार्ट असोसिएशननं सांगितले आहे की, स्त्रियांनी दिवसाला फक्त सहा चमचे साखर सेवन करा व ९ चमचे साखर पुरुषांनी सेवन करावी.
त्याहून जास्त साखर खाणे हे अनिष्ट परिणाम करते. अति साखर खाणे हे रोगांना आमंत्रण असते. म्हणून डाॅक्टर मधुमेही लोकांना साखर टाळायलाच सांगतात.
६. मीठाचा मर्यादित वापर-
वेफर्स किंवा तत्सम पदार्थ ज्यात मीठाचे प्रमाण अधिक असते, असे पदार्थ खाल्ल्याने शरीरात सोडीयमचे प्रमाण जास्त होते. आणि हृदयावर कामाचा म्हणजे रक्त शुद्ध करण्याचा ताण वाढतो. तो होऊ नये यासाठी मीठ कमी खा.
ज्या पदार्थांत मीठाचा मुक्त वापर केला जातो असे खारट पदार्थ टाळा.
७. धूम्रपान टाळा-
धूम्रपानामुळे अनिष्ट परिणाम होतो तो रक्तवाहिन्यांवर. सततचे धूम्रपान रक्तवाहिन्या आकुंचित करते. आणि शरीराला रक्तपुरवठा करणे कठीण होते व हृदयविकार होण्याची शक्यता बळावते.
धूम्रपान न करता धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सतत आसपास असणं हेही हृदयविकाराच्या त्रासाला आमंत्रण असतं. याला पॅसिव्ह किंवा सेकडहँड स्मोकींग म्हणतात. म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धूम्रपान टाळा.
८. नियमित तपासणी-
उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे, रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होणे या सर्व धोक्याच्या सूचना आहेत. त्यांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी डाॅक्टरांकडून नियमितपणे तपासणी करण्यात हयगय करु नये.
अचानक रक्तदाब, साखर वाढली तर ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणून दरमहा तपासणी करत रहा. डाॅक्टरांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप आहार विहार ठरवा.
९. मानसिक ताण तणाव टाळा-
मानसिक ताण हे हृदयविकाराच्या त्रासाला आमंत्रण. हलकं फुलकं वाचन, संगीत, योगा, मेडीटेशन यांमुळे मानसिक ताण कमी करण्यासाठी मदत होते.
मद्यपान, धूम्रपान यामुळे फक्त रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते ताण तणाव कमी होत नाहीत. म्हणून कितीही ताण असला तरी योगा, मेडीटेशन यांचीच मदत घ्या.
१०. आनुवंशिकता तपासणी-
आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना कोणते विकार होते ही फॅमिली हिस्ट्री तपासून पहा. कारण बहुतेक रोग हे अनुवंशिक असतात.
त्यामुळे आपण आपला आहार कसा ठेवायचा हे ठरवता येईल. व्यायाम, आहार या गोष्टी निश्चित करुन निरोगी आयुष्याची काळजी घ्या.
११. आरोग्याची काळजी घ्या-
उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे सर्व तपासण्या करुन प्रमाणात आहे का हे नियमितपणे पहा. डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधे नियमितपणे घ्या ज्यामुळे तुम्ही आपली तब्येत सांभाळून राहू शकाल.
१२. वजन आटोक्यात ठेवा-
वाढणाऱ्या वजनाला व्यायाम करुन व संतुलित आहार घेऊन आटोक्यात ठेवा. ज्यामुळे हृदयविकार, मधुमेह नियंत्रणात राहतील.
१३. मद्यपान कमी करा-
मद्यपानाने हृदयविकाराचा धोका वाढतो. अतिमद्यपान रक्तदाब वाढवते. रक्तदाब वाढणं हीच ह्रदयविकाराचा झटका येण्याची सूचना असते.
दिवसातून एकच ग्लास वाईन ही ठीक आहे पण जर तुम्ही दारु घेतच नसाल तर फार उत्तम आहे. कधीच घेऊ नका.
१४. पुरेशी आणि योग्य झोप-
हा अजून एक आरोग्यमंत्र. दमणूकीनं थकलेलं शरीर झोपतानाही व्यवस्थित झोप घ्या.
जर तुम्ही झोपेत घोरत असाल तर ही पण एक सूचना आहे. वाढलेलं कोलेस्टेरॉलचे प्रमाण, रक्तदाब हे तपासून घ्या आणि निरोगी रहा.
१५. हृदयाची नियमितपणे तपासणी-
हृदयाची ठराविक काळानंतर डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ईसीजी वगैरेंची तपासणी आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.