Site icon InMarathi

३० दिवस या टिप्स फॉलो केल्यात तर आयुष्य बदलण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही

alia bhat inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हेडलाईन वाचून म्हणाल कसं शक्य आहे? इतकं सहज असतं तर प्रत्येकानेच असं केलं असतं. एका महिन्यातच माणसाच्या इच्छेनुसार तो त्याच्या इच्छित ठिकाणी गेला असता यशस्वी झाला असता!

अर्थात असं वाटणं बरोबर आहे. वर्षानुवर्ष जो बदल घडला नाही तो केवळ तीस दिवसात कसा घडेल? असा प्रश्न पडू शकतो, पण पुढचं आयुष्य घडवण्यासाठी असे तीस दिवस आपल्या आयुष्यात आले तर किंवा आपणच ते आणले तर??

माणसाचं आयुष्य हे त्याच्या मनात येणाऱ्या विचारांवरच खरंतर अवलंबून असतं. तो जसा विचार करतो तसाच वागतो किंवा वागतो तसाच विचार करतो.

आता लॉक डाऊनच्या काळात बरेच जण वेगवेगळी रेसिपी करून पाहतात आणि त्यांना आपण शेफ आहोत असं वाटायला लागतं.

 

Indian women blog

 

काहीजण घरात कुंड्यांमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर अशा भाज्या घेत आहेत आणि त्यांना आपण चांगले माळी आहोत असा साक्षात्कार होत आहे.

म्हणजेच विचार करणे, कृती करणे आणि फळ मिळणे हे सगळं माणसावरच अवलंबून आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जेव्हा त्याचा पाठपुरावा करतो, मेहनत घेतो आणि त्यात यशस्वी होतो तेव्हा त्याला खरोखरच आनंद होतो.

ही तर आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरणं होती. मग जी यशस्वी लोक असतात ते नक्की काय करत असतील किंवा काय केलं असेल म्हणून ते यशस्वी झाले असतील.

काय केल्याने आपल्या आयुष्यात फरक पडेल असा ही प्रश्न आपल्याला पडला असेल?

यासाठी फार विशेष काही करावे लागणार नाही. काही सवयी बदलाव्या लागतील, काही नवीन लावून घ्याव्या लागतील.

 

१. ध्यान करणे ( मेडिटेशन)

 

knot9

 

जे रोज ध्यान करतात त्यांच्यासाठी तर ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु जे करत नाहीत त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली पाहिजे.

 त्यामुळे आपलं लक्ष फक्त आपल्यावर केंद्रित होतं आणि मनातील सगळे नकारात्मक विचार कमी होतात. सकारात्मक विचार येत राहतात. यासाठी दिवसातून दहा मिनिटे तरी ध्यान करायला हवं.

 

२. नको असलेली नाती किंवा मैत्री संपवलेली बरी

 

 

आपल्या आजूबाजूला आपलं खच्चीकरण करणारी अनेक लोक असतात. आपण करत असलेल्या कोणत्याही गोष्टींचा हेवा करणे किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीला नावे ठेवणे, खिल्ली उडवणे असे काम ही मंडळी करत असतात.

त्यांच्यामुळे आपल्या आसपासही नकळतपणे नकारात्मक वातावरण तयार होत राहतं. अशा लोकांपासून दूर राहिलेले बरे.

चुका झाल्या तरी आपणच त्या सुधारल्या पाहिजेत. आणि चुकांमधूनच माणूस शिकत जातो.

 

३. आपले ध्येय ठरवा:

 

Inc.com

 

आपल्याला नक्की काय करायचं आहे हे ठरवून त्याप्रमाणे कामाला लागणे महत्वाचे. म्हणजे ध्येय ठरवलं, की वजन कमी करायचं आहे!! परंतु व्यायामाचा, पळायचा पत्ता नाही! असं करून चालणार नाही.

त्यासाठी आठवड्यातून ५-६  तास काढावे लागतील. यामध्ये व्यायाम करावा लागेल, धावावं लागेल तरच तुमचं आठवड्यात एखाद किलो वजन कमी होऊ शकेल.

 

४. योग करणे

 

hindustan times

 

आपला आंतरिक आणि बाह्य म्हणजेच शारीरिक स्टॅमिना वाढवायचा असेल, तर दररोज योग करणे खूप उपयुक्त ठरते. कुठल्याही प्रसंगात माणूस योग करण्याने पॅनिक होत नाही.

आपली सारासार बुद्धी वापरून कृती करायला शिकतो. भारताने मानवजातीला दिलेली ही देणगीच आहे. आता परदेशातही अनेकजण योग करून आपला स्टॅमिना वाढवीत आहेत.

 

५. नोंदवही ठेवा

 

project base life

 

एखादी गोष्ट करायला ठरवल्यापासून, ती करायला चालू केल्यापासून ती गोष्ट करताना तुमच्यासोबत काय काय घडतय याच्या नोंदी ठेवा. त्यामुळे कुठे काही चुकत असेल तर नोंदीमुळे वाचून चुका सुधारता येतात.

याशिवाय बऱ्याचदा माणसाला आपले प्रॉब्लेम, आपलं दुःख हे दुसऱ्यांना सांगायची इच्छा नसते. म्हणून नोंदवही ठेवल्यास त्यात आपण आपलं मन मोकळं करू शकतो आणि पुन्हा नव्याने कामाला लागू शकतो.

 

६. योग्य आहार घेणे

 

lbb

 

मन आणि शरीर प्रसन्न राहण्यासाठी ताजा आणि गरम आहार घेतला पाहिजे.

आपल्या आहारात फळे, भाज्या, दूध यांचा समावेश असायला हवा. प्रोसेस्ड फूड खाणं टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे वजन वाढेल आणि आळशीपणाही वाढेल.

 

७. कामाची यादी बनवा

 

cottons coprate fianace

 

सकाळी उठल्यावर आज कोणकोणती कामे करायची आहेत याची एक लिस्ट तयार करा. आणि त्यातही प्राधान्याने कोणते काम करायचा आहे ते सुरुवातीला करायला घ्यावे.

ज्यावेळेस आपण अधिक फ्रेश आणि एनर्जेटिक असतो त्यावेळेस अवघड काम करून टाकावे म्हणजे पुढची काम वेळेत होतील.

 

८. कृतज्ञता व्यक्त करा

 

 

जगातल्या कुठल्याही गोष्टीकडे कृतज्ञतेच्या दृष्टीने पहा. मग ती माणसं असतील, नाहीतर निसर्ग. याचा माणसाच्या मनावर खूप चांगला परिणाम होतो.

अगदी एखाद्या रिक्षाने किंवा टॅक्सीने प्रवास केलात तर त्या ड्रायव्हर्सना थँक्स म्हटलं तरीही त्यांना बरं वाटतं.

तुमच्या घरी काम करणाऱ्या लोकांनाही थँक्स म्हणलात तरी त्यांना बरं वाटतं आणि तुमच्याविषयी लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात.

यामुळे तुम्ही अनेक सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या मध्ये मिसळत राहता त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत राहतो.

 

९. टीव्ही पाहणे टाळा

 

IndiaTV

 

सध्या टीव्हीवर सतत नकारात्मक बातम्या असतात. त्याशिवाय लागणाऱ्या सिरियल्स मध्येदेखील कायम भांडणे, हेवेदावे अशाच गोष्टी जास्त दाखवल्या जातात. ज्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो.

 टीव्ही पाहणे टाळून त्याऐवजी संगीत ऐकणे, पुस्तक वाचणे, बागकाम करणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे अशा गोष्टी केल्यास मनाला आनंद मिळतो.

एक अभ्यास असा दाखवतो की यशस्वी लोक टीव्ही बघण्यात फार वेळ घालवत नाहीत.

 

१०. स्वतःची काळजी घ्या

 

canindia.com

 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली काळजी घेतली पाहिजे तरच तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकाल. आपल्या वागण्याने आपल्या आसपासचे लोक प्रभावित होत असतात. यासाठीच आपली काळजी आपणच घेणे महत्वाचे आहे.

येणारे बदल हे स्वीकारावे लागतील आणि त्यासोबतच पुढे जावं लागेल, हे मात्र कायम लक्षात ठेवावं लागेल. नवनवीन प्रयोग करावे लागतील.

बऱ्याचदा आपण पाहतो की एखादा गायक, खेळाडू ,लेखक हे एखाद्या गोष्टीमुळे प्रसिद्ध पावतात. त्यांना लोकमान्यता मिळते, परंतु पुढे मात्र त्यांची प्रगती खुंटलेली दिसते.

केवळ दोन-चार गोष्टी नंतर ते फारशे चमकत नाहीत. आपलं आहे ते स्थान टिकवण्यातच ते मश्गुल राहतात.

एखाद्या शेफची एखादी रेसिपी प्रसिद्ध होते, मग तो हॉटेल वगैरे काढतो आणि नंतर त्यातच अडकून जातो. पण मग नवनवीन प्रयोग करणे राहून जाते.

परंतु काही लोक ती गोष्ट सोडून परत नव्याने एखादी सुरुवात करतात त्यात ते यशस्वी होतात. पण हे खूप सोपं नाही.

माणसाला एकदा यश, सुरक्षितता मिळवल्यावर तेच टिकवण्यात स्वारस्य असतं. कोणतीही नवीन जोखीम माणूस सहसा घेत नाही. परंतु हे यश आणि सुरक्षितता ठेवून देखील नवीन प्रयोग करता येतील.

म्हणूनच आयुष्यात तोचतोच पणा आला की अशा वेळेस तीस दिवसांचं चॅलेंज आपणच आपल्याला घ्यायला लागेल. आणि जगणं happening करावं लागेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version