Site icon InMarathi

हसत-खेळत असताना एकदम रडवणारा “वात” मोठ्या संकटाची चाहूल असू शकतो, सावध रहा

cramp inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जेव्हा झोपेत किंवा व्यायाम करताना, चालताना बऱ्याचदा पायाच्या पोटरी मध्ये वात येतात. त्यावेळेस पाय हलवताना देखील प्रचंड वेदना होतात. आणि हे वात कधीही कुठेही येऊ शकतात.

पाण्यात पोहताना जर वात आला तर ते जीवावरही बेतू शकते. वात येतो तेव्हा सगळेच स्नायू ओढले जातात. काय करावं हे त्यावेळेस सुचत नाही.

पण वात का येतो?

वात येण्याची कारणे: 

पुरेसे पाणी न पिणे:

 

bbc good food

 

बऱ्याचदा पाणी कमी प्यायल्याने वात येण्याची शक्यता असते. शरीरात पाणी कमी झाल्यावर देखील वात येतात. आपल्याला शरीरातील पाणी कमी झाल्याची ही एक प्रकारची सूचनाच आपले शरीर देत असते.

अशा वेळेस अशक्तपणा जाणवतो. डोकेदुखी आणि बद्धकोष्टता हेदेखील शरीरातील पाणी कमी झाल्याचा संकेत असतो.

हिवाळ्यामध्ये थंडीमुळे पाणी कमी घेतले जाते. त्यावेळेस डोकेदुखी सुरू झाली म्हणजे समजावे की शरीरात पाणी कमी होत आहे.

उन्हाळ्यात देखील कुठेही बाहेर जाताना पाण्याची बॉटल आपल्या सोबत ठेवावी, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.

 

तापमान अधिक झाल्यास:

 

sowetanlive

 

जर उन्हाळ्यात तापमान अधिक असताना व्यायाम केला किंवा अधिक शारीरिक मेहनत केली तर वात येतो. याचं कारण म्हणजे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. तुमच्या स्नायूंना पाणी हवं असतं.

उन्हाळ्यामुळे आणि अधिक शारीरिक हालचालीमुळे घाम येतो आणि त्याचबरोबर शरीरातील पाणी कमी होतं. शरीरातील महत्वाचे मिनरल्स पोटॅशियम, कॅल्शियम, सोडीयम यांचं प्रमाण कमी होतं.

स्नायू व्यवस्थित काम करावेत यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

औषधांचा साईड इफेक्ट:

 

naturally savvy.com

 

कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी स्टॅटिन,डायुरेटिकस ही औषध दिली जातात. ज्यांच्यामुळे शरीरातील पाणी बाहेर काढले जाते. कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या गोळ्या उपयुक्त असल्या तरी, या गोळ्यांचा हा साईड इफेक्ट आहे.

त्यामुळे शरीरात वात यायला सुरुवात होते. ही औषध चालू केल्यानंतर जर वात यायला सुरुवात झाली असेल तर डॉक्टरांशी बोलून घ्यावे.

 

स्नायूंना रक्तपुरवठा कमी होणे:

 

https://www.uwhealth.org/

 

जर चालतानाही पायांमध्ये वात येत असेल तर पायामधल्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होत आहे असे समजावे. शक्यतो हा त्रास वय वाढत जाईल तसा तसा वाढत जातो.

जर एखादी प्रौढ व्यक्ती जास्त हालचाल, व्यायाम करत नसेल तर त्या व्यक्तीस असा त्रास होऊ शकतो. कधीकधी क्लोडीकेशन नावाची स्थिती आल्यानंतर देखील असा त्रास होऊ शकतो.

क्लोडीकेशन म्हणजे रक्तवाहिन्या अधिक संकुचित होतात ज्यामुळे तिकडे रक्त पुरवठा कमी होतो आणि पायांमध्ये वात येतो. अशा वेळेस डॉक्टरांना दाखवून त्याबाबत काय करता येईल याचा सल्ला घेतला पाहिजे.

महिलांना मासिक पाळीच्या वेळेस होणारा त्रास:

 

newstrack.com

 

बऱ्याचदा महिलांना मासिक पाळीच्या वेळेस वात येण्याचा त्रास होतो. याचं कारण म्हणजे त्याच वेळेस स्त्रीच्या शरीरात वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होत असतात.

परंतु वात येत असेल तर मात्र डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरेल.

मुलांना येणारे क्रॅम्पस:

 

https://www.sportsandspinalgroup.com.au/

 

मुलं वाढीला लागली की त्यांना वात येण्याचा त्रास होऊ शकतो. रात्री झोपल्यावर मधूनच मुले रडत उठतात आणि वात येणारी जागा दाखवतात.

याचं मुख्य कारण म्हणजे मुलं खूप खेळतात. त्यांच्या शारीरिक ऍक्टिव्हिटीज खूप होतात. आणि त्यामुळेच त्यांना वात येण्याचा त्रास होऊ शकतो.

मुलांना येणारे वात हे शक्यतो पायात येतात याचं कारण आहे त्यांचं अति खेळणं. त्यामुळे मुलं जेव्हा रडत उठतात त्यावेळेस त्यांचा पाय स्ट्रेचींग करणे किंवा त्या पायावर शेक देणे चांगले.

परंतु हा त्रास वारंवार होऊन मुलांना त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

अति व्यायाम हेदेखील वात येण्याचे कारण:

 

 

सगळ्यांनाच माहीत आहे की दररोज व्यायाम हा केलाच पाहिजे, आणि बरेच लोक करतातही. परंतु काही काही जण अति व्यायाम करतात. ज्याची आपल्या शरीराला इतकी सवय नसते. त्यामुळे देखील वातयेऊ शकतात.

म्हणून कुठलाही व्यायाम करायच्या आधी पहिल्यांदा वार्म अप आणि स्ट्रेचिंग करणे गरजेचे असते. त्याच प्रमाणे व्यायाम संपल्यावर देखील स्ट्रेचिंग करणे गरजेचे असते त्यामुळे वात येण्याचे प्रमाण कमी होते.

 

क्रॅम्प आल्यावर काय करायला हवे:

 

 

बऱ्याचदा वात येतात असे निघूनही जातात. परंतु काही वेळेस ते जास्त काळ राहतात त्यावेळेस काही गोष्टी केल्या तर त्यांचा त्रास थोडा कमी होईल.

समजा जलद चालताना किंवा पळताना पायात जर वात अाला तर थोडावेळ थांबून त्या भागातले मसल्स ताणून घ्यावेत आणि त्याठिकाणी हलक्या हाताने मसाज करावा.

घरी आल्यावर गरम पाण्याची पिशवी ठेवून शेकावे. किंवा गरम पाण्याने अंघोळ करावी जेणेकरून तिकडे रक्तप्रवाह सुरळीत होईल. कधीकधी बर्फाचा शेक देखील यासाठी उपयुक्त ठरतो.

तसेच ईबुप्रोफेन असलेलं मलम त्या ठिकाणी लावल्यास वेदना आणि सूज कमी होतात.

 

स्ट्रेचिंग का जरुरीचे आहे?

 

YouGov

 

आपल्या शरीरातील स्नायू हे तंतूंनी बनलेले आहेत. त्यामुळे ते क्षणार्धात छोटे किंवा मोठे होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला आपलं शरीर हलवायला, वळवायला मदत होते.

म्हणजे फडताळावरील एखादा डबा काढणे,खाली वाकून एखादी वस्तू उचलणे, रनिंग या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या स्नायूतील तंतूच उपयोगाला येतात.

त्यासाठीच स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली दैनंदिन कामे व्यवस्थित करता येतील.

क्रॅम्पमध्ये आहाराचे महत्व:

 

 

आपल्या आहारात रंगीबिरंगी भाज्यांचा समावेश असावा. उदाहरणार्थ, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो गाजर, लिंबू , मुळा, पांढरा कांदा इत्यादी.

त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ते मिनरल्स,पोषणतत्व मिळतील ज्यामुळे स्नायूंची क्षमता वाढेल आणि त्यांचा आकारही नीट राहील. हिरव्या पालेभाज्या आणि केळी यांचा समावेश आहारात असावा.

या त्रासात डॉक्टरांकडे केव्हा जावे:

वात तसे फार धोकादायक नसतात. पण वारंवार वात येत असतील आणि त्याचा त्रास होत असेल, तसेच हे वात का येतात याचं कारण कळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

कारण कधीकधी थायरॉईडच्या त्रासात, लिवर सिरॉसिसच्या किंवा रक्तवाहिन्या कडक बनल्याने देखील वाताचा  त्रास होऊ शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version