आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
कोरोना नामक महामारीने जगभरात थैमान घातलं आहे.
अनेक वयोवृद्ध लोक बोलून दाखवत आहेत की असा रोग आणि अशी परिस्थिती ह्या आधी कधी ही पहिली नव्हती.
असाध्य असा हा कोरोना आजार आणि ह्यावर कसले ही औषध आज तरी कुठे ही उपलब्ध नाहीये.
आजतागायत जे लोक मृत्यू पावलेत त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही. ते स्वतः क्वारंटाईन असून कोरोना होईल का या चिंतेत आहेत.
१. अश्या वेळी मृत्य पावलेल्या लोकांच्या डेड बॉडीला वाली कोण?
२. त्यांचे अंतिम विधी कोण कसे आणि कुठे करणार?
३. सगळे विधी रीती नुसार होणार का?
असे अनेक प्रश्न मृत पावलेल्या लोकांना पडले असून ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे
“अब्दुल मलबारी आणि त्यांची संस्था”
हो, कोरोना मुळे सुरत मध्ये २५० हून अधिक लोक बाधित असून २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि इथल्या लोकांना अब्दुल भाईनी मदतीचा हात दिला आहे.
अब्दुल मलबारी आणि त्यांची सेवाभावी संस्था अश्या मृत्यू झालेल्या लोकांची विधिवत आणि सुरळीत विल्हेवाट लावतात.
गेली ३० वर्षे हे काम त्यांच्या तर्फे सुरळीत सुरू असून कोरोना मुळे सुद्धा ह्यात काडीमात्र फरक पडलेला नाही.
सुरत मध्ये ते आज ही कोरोना बाधित मृत पावलेल्या लोकांचीअंतिम क्रिया करतात.
सुरत मध्ये सध्या कुणीही कोरोना मुळे मेल्यास सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना एकच नाव आठवते ते म्हणजे “अब्दुल मलबारी”
कोणत्याही जाती धर्माचे लेबल ना लावता फक्त माणुसकी हा धर्म पाळून अब्दुल भाई सर्व मृतदेहांची विल्हेवाट लावतात.ह्या मधून ते जातीय एकात्मतेचा संदेश सर्व भारतीयांना देत आहेत
अब्दुल मलबारी ह्यांच्या कामाची सुरुवात..
सन १९९० मध्ये सकिना नामक स्त्री ला एचआयव्ही(एड्स) झाला होता तेव्हा तिला तिचा नवरा आणि तिचा मुलगा सरकारी इस्पितळात दाखल करून पळून गेले होते.
काही दिवसानंतर उपचार दरम्यान सकिना बीबी चा मृत्यू झाला तेव्हा तिला ह्या जगात कोणी वाली नव्हता. तिचा मृतदेह शवागारात कित्येक दिवस तसाच बेवारस पडून होता.
नंतर सरकारी अधिकाऱ्यांना दया येऊन त्यांनी तिचे कुणी अंतिम संस्कार करू इच्छित असल्यास समोर यावे अशी जाहिरात पेपर मध्ये देऊन स्थानिक लोकांना पुढे येण्याचे आवाहन केले.
दुर्गम आजाराबाबत गैरसमज
त्यावेळी लोकांच्या मनात जसे आज कोरोना बाबत आहेत तसे गैरसमज होते. अनेकांना अशी गैरसमजूत होती की एड्स हा आजार नुसत्या स्पृश्यातून पसरतो.
त्यामुळे लोक अश्या लोकांना मदत करण्यास पुढे येत नसत. तीच अवस्था आज कोरोना बाबत आहे.
अनेक डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की मेलेल्या माणसाच्या शरीरातून कोरोना फैलावत नाही,
त्याच्या कापड्यावरणी त्वचेवर काही विषाणू असू शकतो आणि त्यावर निर्जंतुकीकरण केल्यास त्यांचे अंतिम संस्कार करण्यास काहीच धोका नाही. पण अजून ही लोक गैर समजात आहेत.
साकीना चे अंत्य संस्कार आणि अब्दुल भाई च्या समाज कार्याची सुरुवात
अब्दुल मलबारी हे त्यावेळी अवघ्या २१ वर्षाचे असताना त्यांनी ही जाहिरात वाचली आणि त्यावेळी असे काम करत असलेल्या संस्थे शी संपर्क केला.
त्या संस्थेत अंतिम क्रिया करणारा माणूस बाहेर गावी असल्याने त्यांना ह्या साठी काही दिवस वाट पाहण्यास सांगण्यात आले.
अब्दुल भाईंना याचे वाईट वाटून त्यांनी स्वतः च सकिना वर अंतिम संस्कार करायचे ठरविले.
सकिना ला मरून महिना झाला असल्याने तिच्या शरीरातून अतिशय दुर्गंध येत असून ही अब्दुल मागे हटले नाहीत.
त्यांनी स्वहस्ते तिच्या मृतदेहाला आंघोळ घालून रीतसर स्मशान भूमी मध्ये पुरून अंतिम संस्कार केले. बस्स, इथून सुरू झाली अब्दुल भाई यांच्या अद्भुत कार्याची सुरुवात.
कोरोना आणि सद्य परिस्थिती
अब्दुल भाई नी सद्य परिस्थितीत सुद्धा घेतलेला समाज सेवेचा वसा सोडलेला नाही. कोव्हिड मुळे मृत्यू झालेल्या सर्व धर्मीय लोकांच्या मृत शरीराची ते व त्यांची संस्था रीतसर विल्हेवाट लावीत आहेत.
सुरत च्या डेप्युटी कमिशनर आशिष नाईक ह्यांनी अब्दुल ची पाठ थोपटली आहे. त्यांच्या कडे ३५ स्वयंसेवक असून १५०० डोनर्स आहेत जे त्यांच्या संस्थेला मदत करतात.
ह्या परिस्थिती मुळे आपल्या घरच्यांना त्रास होऊ नये म्ह्णून ते व त्यांची टीम ऑफिस मध्येच खाणं पिणं करून तिथेच झोपतात.
अब्दुल भाई ची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.
अब्दुल भाई अंत्यसंस्कार झाल्यावर त्या जागेचं निर्जंतुकीकरण करून घेतात. ते व त्यांची टीम ग्लोवस, गाऊन, मास्कपूर्ण पीपीई किट घालून काम करतात!
समाज सेवा की कुटुंब
साहजिकच अब्दुल भाईंना हा प्रश्न पडत असेल, कुटुंबाला वेळ द्यावा, त्यांच्या सोबत राहून घराबाहेर पडू नये की बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावून त्यांची मदत करावी?
अशा वेळी ते कुराण ची खरी शिकवण आठवून समाज सेवा करतात. अश्या वेळी नक्कीच ते स्वतः चे प्रश्न बाजूला ठेऊन सामाजिक कर्तव्य पार पाडतात.
मित्रांनो, सध्या परिस्थिती ही नक्कीच वाईट आहे. किती ही श्रीमंत असो वा गरीब असो कोरोना मुळे मृत्यू झाला असल्यास अंतिम वेळीच लोक मदतीला येतील.
तेव्हा आपण सुद्धा शक्य असेल तिथे आणि शक्य असेल तेवढी आपापल्या परीने मदत करावी. आम्ही अब्दुल सारख्या लोकांना सलाम करतो. काळजी घ्या, घरीच थांबा आणि सेफ रहा..!!
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.