आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोना बाधित लोकांना मदत करायची असेल तर फक्त सोशल मीडिया वर हळहळ व्यक्त करून आणि आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचे विडिओ शेयर करून काही होणार नाही या अर्थाचे काही मेसेज मध्यंतरी फिरत होते.
असे मेसेज पाहिल्यावर जे खरे सोशल मीडिया आणि बॉलिवूडचे चाहते आहेत त्यांना असं वाटतं की,
सोशल मीडिया आणि बॉलीवूड स्टार्स या बद्दल बोलताना बरीच मंडळी ही कायम टीका करण्याच्या मनस्थिती मध्येच असते.
बऱ्याच लोकांच्या मनात असा समज आहे की सोशल मीडिया म्हणजे फक्त टाईमपास. त्यातून कधीच कोणतं समाजोपयोगी काम होणं शक्य नाहीये.
त्यावर लोक भेटतात, बोलतात आणि मग सगळं विसरून जातात. बॉलीवूड स्टार्स बद्दल सुद्धा लोकांचं असंच काहीसं मत आहे. हे लोक फक्त स्वतःचा फायदा बघत असतात.
या लोकांना सामाजिक भान अजिबात नसतं.
हे लोक फक्त त्यांचा सिनेमा रिलीज होणार असेल तेव्हाच फक्त लोकांसमोर येतात आणि त्यांच्या सिनेमा ला जास्तीत जास्त प्रतिसाद कसा मिळेल ह्याकडेच फक्त त्यांचं लक्ष असतं.
काही लोकांच्या डोक्यात हा समज अगदी पक्का आहे.
या दोन्ही गोष्टींना चूक ठरवणारा एक ऑनलाईन कार्यक्रम ३ मे च्या दिवशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम तयार करण्यासाठी फेसबुक ने काही भारतीय कंपनी सोबत काम करून हा कार्यक्रम तयार केला,
ज्यात त्यांनी Donate हे बटन फेसबुकवर App वर देऊन लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला.
हा कार्यक्रम हा social distancing चं भान ठेवून प्रत्येक कलाकाराने आपल्या घरातूनच सादर केला.
४ तास चाललेल्या या कार्यक्रमातून कोरोना बाधित लोकांसाठी ५२ कोटी रुपयांची मदत जमा झाली.
हा कार्यक्रम आयोजित करण्याचं श्रेय हे दिगदर्शक करण जोहर आणि झोया अखतर या दोघांना देण्यात आलं. iFORINDiA हे या संगीत रजनी चं नाव होतं.
बॉलीवूड मधून शाहरुख खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, गुलजार, ए आर रहमान यांनी सहभाग नोंदवला.
आंतरराष्ट्रीय स्टार्स पैकी मिक जॅगर, मिनडी कलिंग, निक जोनास, विल स्मिथ आणि रसेल पीटर यांसारख्या विख्यात लोकांनी कोरोना च्या मदतीसाठी त्यांचा सहभाग नोंदवला.
करण जोहर ने त्याच्या ट्विटर अकाउंट वरून ही अधिकृत घोषणा केली की,
५२ कोटी रुपयांपैकी ४.३ कोटी रुपये हे कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांनी दान केले तर ४७.७७ कोटी रुपये हे विविध सेवाभावी संस्थांकडून दान करण्यात आले.
या कार्यक्रमात एकूण ८५ कलाकारांनी गाणं सादर करून लोकांना मंत्रमुग्ध केलं.
ज्यामध्ये अमिताभ बच्चन, आमिर खान, आयुषमान खुराना, राणी मुखर्जी, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, विकी कौशल, कतरीना कैफ, अर्जुन कपूर
यासारख्या लोकप्रिय कलाकारांनी त्यांचा वेळ देऊन कोरोना बाधित लोकांना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्यात त्यांचा सहभाग नोंदवला.
अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमात ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाची रूपरेषा:
कार्यक्रमाची सुरुवात झाली ती करण जोहर आणि झोया अखतर यांनी दिलेल्या कार्यक्रमाच्या रुपरेषेने.
त्यानंतर अक्षय कुमार ने एक कविता सादर केली जी मनोज मुंताशीर यांनी लिहिली होती. त्या कवितेचे शब्द होते: ‘तुमसे हो न पायेगा’.
त्यानंतर आमिर खान आणि किरण राव यांनी आपलं मनोगत सादर केलं. “आशा सोडू नका” हा संदेश या दोघांनीही दिला.
त्यानी मग काही गीत सादर केले ज्यामध्ये ‘आ चलके तुझे मै लेके चलू…’ आणि ‘जीना इसिका नाम है’ यासारख्या क्लासिक गाण्यांचा समावेश होता.
शाहरुख खानने कार्यक्रमाची सांगता एक रॅप गाणं म्हणून केली ज्याला सैनी या गीतकाराने शब्दबद्ध केलं आहे आणि बादशाह या संगीतकाराने संगीत दिलं आहे.
या गाण्याचे बोल ‘सब सही हो जायेगा’ असे आहेत. हे गाणं कोरोना संकटावर आणि घरातच लॉक रहाण्याच्या आवश्यकतेबद्दल भाष्य करतं.
आणि हा दिलासा देतं कि लवकरच जग हे या संकटातून नक्की मुक्त होईल. शाहरुख चा मुलगा अबराम याने देखील त्याच्या डान्स ने या गाण्याला नेत्रसुखद केलं.
शाहरुख खानने त्याची प्रतिक्रिया त्याच्या शैलीमध्ये दिली:
“प्रत्येकजण जे मला ओळखतात त्यांना हे माहीत आहे की, माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाऊ शकत नाही. तुम्ही सर्वांनी मला ही एक संधी देऊन उपकृत केलं आहे.
आयुष्य म्हणजे दुसरं काय असतं, चांगल्या संधी उपलब्ध करून देणे, आशा, दया आणि करुणा यांचा जीवनात ज्याप्रकारे शक्य आहे त्याप्रकारे आमलात आणणे”.
माधुरी दीक्षित ने तिचा सहभाग हा पॉपस्टार शिरन यांचं गाणं सादर करून नोंदवला. हे गाणं सादर करताना तिचा मुलगा अरीन याने पियानो वर साथ दिली.
आलिया भट ने तिच्या बहिणी सोबत आणि संगीतकार अंकुर तिवारी यांच्यासोबत ‘एक कुडी’ हे तिच्या उडता पंजाब या सिनेमातील गाणं म्हंटलं.
या सोबतच आलीया भट हिने तिचे वडील महेश भट यांनी दिगदर्शित केलेल्या दिल है के मानता नही या सिनेमाचं शीर्षकगीत सादर केलं.
आलिया भट आणि तिची बहीण शाहीन यांनी सर्व अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या लोकांचे, संस्थांचे या कठीण काळात त्यांनी दिलेल्या अविरत सेवेबद्दल आभार मानले.
फरहान अखतर ने या कार्यक्रमात त्याच्या बँड सोबत त्याच्या रॉक ऑन या सिनेमातील ‘तुम हो तो…’ हे गाणं सादर केलं. ह्रिथिक रोशन ने ‘तेरे जैसा यार कहा’ हे गीत सादर केलं आणि त्याबरोबरच पियानो वादन सुद्धा सादर केलं.
टायगर श्रॉफ जो की त्याच्या डान्स साठी लोकप्रिय आहे त्याने ‘ठेहर जा तू किसी बहाने से…’ आणि ‘रूप तेरा मस्ताना’ ही गाणी सादर केली.
४ तास आणि २० मिनिट चाललेल्या ह्या कार्यक्रमाला GiveIndia नावाच्या संस्थेने मॅनेज केलं होतं!
आणि जमा झालेली पूर्ण राशी ही कोरोना मुक्ती साठी काम करणाऱ्या ऑन ग्राऊंड सपोर्ट स्टाफ ला दिली जाईल अशी माहिती त्या संस्थेने दिली.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्टार्सने स्थलांतरित कामगार, रोजंदारी कामगार यांच्या बद्दल सुद्धा काळजी व्यक्त केली. त्या सोबतच बाल हिंसा, घरगुती हिंसाचार याबद्दल सुद्धा काळजी व्यक्त केली.
कारण हे दोन्ही प्रकार २५ मार्चपासून भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊन नंतर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.
भटक्या जनावरांना सुद्धा या दिवसात चांगली वागणूक द्या असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
संगीत क्षेत्रातील दिगगज व्यक्तींनी या कार्यक्रमात हजेरी लावली.
ज्यामध्ये ब्रायन अॅडम्स, ए आर रहमान, गुलजार, जावेद अखतर, जय सेन, उस्ताद अमजद अली खान, जोनास बंधू, अमान अली, अयान अली, शंकर एहसान लॉय,
सोनू निगम, अरिजित सिंग, बादशाह, रेखा भारद्वाज आणि काही अन्य कलाकारांनी त्यांची कला सादर केली.
दिग्दर्शकांपैकी फराह खान, विशाल भारद्वाज यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
क्रीडा क्षेत्रातील दिगगज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि सानिया मिर्झा यांनी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेऊन लोकांबद्दलची त्यांची तळमळ दाखवली.
तुम्ही जर का हा कार्यक्रम बघू शकला नसाल तर YouTube वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नक्की पहा. तुम्हाला या कार्यक्रमातून करमणूक तर होईलच; त्यासोबतच आपल्या कलाकारांमधील माणुसकीचं सुद्धा दर्शन होईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.