सिगरेटची सवय मोडण्यासाठी केलेला अभूतपूर्व ‘प्रयोग’ पाहिलात का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज काल बहुतांश लोकांना सिगरेटचं व्यसन असतं. कोणी मित्रांबरोबर पहिला प्रयत्न करतं, मित्रांच्या आग्रहाला बळी पडतं,
“घे रे! त्यात काय होतं एका सिगरेटने?” किंवा असेच काही बाही बोलून एखाद्याला सवय लावली जाते.
तर कोणी सगळेच सिगरेटस् ओढतात, अपण ओढून बघायला काय हरकत आहे असं म्हणून स्वतःच व्यसनाला बळी पडतात.
तर कोणाला ही स्टाइल वाटते, हा ट्रेंड आपण ‘फॉलो’ केला नाही तर सगळे आपल्याला हसतील असा विचार करतात.
टेंशन घालवावं, बेफिकिर राहावं किंवा आपण किती बेफिकिर आहोत हे दुनियेला दाखवण्यासाठी सिगरेट ओढतात.
सिगरेट ओढायचं व्यसन लागण्यामागे काही अंशी जाहिरातीही कारणीभूत असतात असा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे.
आज काल बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी आकर्षक जाहिराती तयार केल्या जातात.
ह्या जाहिराती मार्केटिंग करण्याचं खूप मोठं तंत्रज्ञान आहे, आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी ह्या जाहिराती तयार केल्या जातात आणि त्या आकर्षणाला बरेच जणं बळी पडतात.
हे सगळ्याच उत्पादनांच्या बाबतीत आहे. सिगरेट त्याला कशी अपवाद?
तर एकूणच काय तर काही ना काही कारणांनी सिगरेट ओढायचं व्यसन लागतं एखाद्याला.
आधी आधी घरचे ओरडतील म्हणून त्यांच्या पासून लपवून सिगरेट ओढली जाते, मग तर उघड उघड सगळ्यांसमोर ओढली जाते, घरच्यांची बोलणी खावी लागतात.
त्यावरून घरात भांडणं होतात, चिडचिड होते, घरातलं वातावरण बिघडतं, एक विचित्र तणाव निर्माण होतो.
‘सिगरेट ओढू नये’, ‘cigarette smoking is injurious to health’, ‘सिगरेट कर्करोगाला कारणीभूत होते’, ‘cigarette smoking causes to cancer’
अशा अनेक सावधान राहण्याच्या सूचना टि.व्ही., रेडिओ किंवा जाहिरातीत देतात. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की सिगरेट ओढणे तब्येतीसाठी हानीकारक असते.
त्यामुळेच घरचे आपल्या पाल्यासाठी किंवा घरातील जो कोणी सिगरेट ओढत असेल त्याला विरोध करतात, सिगरेट ओढू नको असं सांगतात.
बरं नुसतं सिगरेट ओढणाऱ्याला त्रास होतो असं नाही तर त्या सिगरेटच्या धुराने आजुबाजूच्या माणसांनाही त्याचा त्रास होतो. परत नुसती तब्येत बिघडते असं नाही.
सिगरेटसचा खर्च तर जास्त होतोच आणि आजारी पडल्यावर डॉक्टरचा देखील खर्च वाढतो. कारण, कर्करोग तर फार नंतरची स्टेज आहे.
सुरुवातीला सिगरेटच्या धुराचा त्रास सुरू होतो. घसा खवखवतो, खोकला होतो, कफ होतो. एकंतरीतच सिगरेटचे दुष्परिणामच जास्त असतात.
मग काय, हे नको असलेलं व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. पण व्यसनच ते! फ़ार चिवट असतं, काही केल्या सुटत नाही.
उलट बहुत करून जास्तीत जास्त वाढत जातं असाच बऱ्याच जणांचा अनुभव आहे. ह्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर तर पडायचं असतं पण कसं ते कळत नाही.
व्यसनमुक्ती केंद्रात जाणं म्हणजे कमीपणाचं, अपमानास्पद वाटतं. म्हणजे तो मार्ग तर बंदच होतो. अशा वेळी मग काय करायचं? व्यसन तर सोडवायचंय पण कसं सोडायचं ह्याचा मार्ग सापडत नाहीये.
आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याला सिगरेटचं व्यसन होतं आणि ते सोडवण्यासाठी त्याने काय अनोखी शक्कल लढवली ते पाहूया ह्या लेखातून!
इब्राहिम येसेल असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि तो तुर्कस्थानात राहणारा आहे. ह्या इब्राहिमला वयाच्या १६ व्या वर्षी हे व्यसन लागलं.
मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार असं म्हंटलं आहे की त्याला दिवसाला कमीत कमी दोन पाकिटं लागयची सिगरेटची.
आज त्याचं वय ४२ वर्षे आहे आणि तो सिगरेटच्या व्यसनाच्या पूर्णपणे अधीन झाला!
इब्राहिमच्या वडिलांचं निधन फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झालं, त्यानंतर इब्राहिमला आपलं हे व्यसन सोडविण्याची इच्छा झाली.
वडिलांच्या निधनाने कुटुंबाचं झालेलं नुकसान भरून तर निघणार नाही, पण आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये असं वाटून त्याने सिगरेट सोडण्याचे ठरविले.
काहीही करून त्याला सिगरेट सोडायचीच होती.
सिगरेटचे व्यसन सोडविण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. पण हे व्यसन त्याच्याकडून काही केल्या सुटले नाही. जवळपास २६ वर्षांपासून असणारं हे व्यसन सहजासहजी कसं सुटेल?
त्याने सिगरेटचे व्यसन सोडण्याचे अनेक प्रयत्न केले पण, ते सगळे व्यर्थ गेल्यानंतर तो खूप निराश झाला. मग हे व्यसन दूर करण्यासाठी त्याने एक अनोखी शक्कल लढवली.
काहीही करून हे सिगरेटचं व्यसन सोडवायचंच ह्या विचाराने बाकीचे मार्ग अयशस्वी झाल्यावर त्याने परिस्थिती आपल्या हातात घेतली.
त्याने असा एक पिंजरा तयार केला की ज्याच्यातून ह्या कर्करोगाला आमंत्रण देणार्या भयंकर सिगरेट जाऊच शकत नाही. आता हा पिंजरा म्हणा किंवा हेल्मेट!
त्याने अशा पद्धतीने ते तयार केलं आहे की त्यातून सिगरेट तोंडापर्यंत जाऊच शकत नाही.
एव्हढेच नाही तर ह्या पिंजऱ्याला किंवा हेल्मेटला कुलुप देखील आहे. ज्याची किल्ली फक्त इब्राहिमच्या बायकोकडेच आहे. इतर कोणाकडेही ह्याची किल्ली नाहिये.
अगदी इब्राहिमकडेही त्याची किल्ली नाहीये.
सुरुवातीला त्याच्या ह्या विचित्रपणाची सगळ्यांनी खिल्ली उडवली, त्याचं हे वागणं सगळ्यांना मूर्खपणाचं वाटलं. अशी युक्ती कोणीच कधीही केली नसेल.
पण, हळूहळू सगळ्यांना हे पटलं की, त्याची युक्ती कामी येणार आहे.
एव्हढेच नाही तर त्याची अतिरिक्त खाण्याची सवयही कमी झाली. त्यामुळे त्याचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत झाली.
ह्याशिवाय त्याचं अजून एका गोष्टीसाठी देखील कौतुक करायला हवं की एव्हढं वजन असलेलं हेल्मेट किंवा पिंजरा घालून बसायचं सोप्पी गोष्ट नाहिये.
दिवसभर त्या हेल्मेटचं वजन पेलणं खूप कठिण गोष्ट आहे. खरंच जर एखाद्याने व्यसन सोडायचं मनापासून ठरवलं तर तो काहीही करू शकतो हे ह्या इब्राहिमच्या उदाहरणावरून दिसून येते.
खरंच, अशा माणसांमुळे जगात अशक्य काहीच नसते हे लक्षात येते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.