' पंजाबी गाणी उगाच लोकप्रिय नाहीत! यशाचं “शास्त्र” समजून घेतल्याचा हा परिणाम आहे! – InMarathi

पंजाबी गाणी उगाच लोकप्रिय नाहीत! यशाचं “शास्त्र” समजून घेतल्याचा हा परिणाम आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रसिद्ध पंजाबी रॅपर , गायक सिद्धू मूस वाला यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटींना धक्का बसला आहे, ज्यांनी त्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. अनेक चाहत्यांना सिद्धूचे शेवटचे गाणे, ‘द लास्ट राइड’ आणि त्याचा मृत्यू यात साम्य आढळले. १५ मे रोजी सिद्धूने ‘द लास्ट राइड’ हे गाणे रिलीज केले होते.

१९९६ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्याच्या कारमध्ये गोळ्या घालून ठार झालेल्या रॅपर ‘तुपाक शकूरला’ श्रद्धांजली म्हणून हे गाणे म्हटले जात होते. हा निव्वळ योगायोग की आणखी काही? याविषयी बातम्या ट्रेंडिंग मध्ये असतानाच त्याच्या हत्येची जबाबदारी गोल्डि ब्रार याने घेतल्याची बातमी आहे.

 

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंजाबी संगीत आणि ते गाणारे गायक इतके यशस्वी कसे? हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येणे साहजिकच आहे. तेव्हा जाणून घेऊयात का लोकप्रिय होतात पंजाबी गाणी? काय आहे त्यामागील शास्त्र?

 

sidhu im

 

मुळात आजच्या तरुण आणि खासकरून टीन एजर्सना जे पंजाबी पॉप, हिप-होप, ढोल बीट्स आणि रॅप यांचे जे वेड आहे, त्याला कारण ८० च्या दशकात ‘गुरुदास मान’ यांच्या खड्या पंजाबी आवाजातील गाणी, असे मनाला हरकत नाही. उत्तर भारतातील एका विशिष्ट प्रदेशात पंजाबी संगीत सर्वात प्रसिद्ध आहे.

पंजाबी संगीत उद्योग हा भारतातील सर्वात मोठा गैर-फिल्मी संगीत उद्योग आहे. हे संगीत देशभरातील लोक ऐकतात जरी त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना ते समजतही नाही. इम्रान खानच्या अॅम्प्लीफायरपासून ते एपी ढिल्लॉनच्या एक्सक्सेसपर्यंत, भाषेतील अडथळे पार करून लोकांमध्ये पंजाबी संगीत लोकप्रिय राहिले आहे.भारतात जवळपास प्रत्येक प्रादेशिक भाषेत संगीत तयार केले जाते. पण पंजाबी संगीत व्यवसायाची लोकप्रियता अतुलनीय आहे.

 

ap im 1

 

पंजाबी संगीत हे सर्वात लोकप्रिय प्रादेशिक संगीत आहे आणि लोकप्रियतेच्या बाबतीत हिंदी संगीताशी त्याची तुलना केली जाऊ शकते. पंजाबी संगीताने बॉलीवूडमध्ये आपला प्रभाव वाढवला आहे, जिथे पंजाबी गाणी चित्रपटांसाठी रिलीज झालेल्या अल्बमचा भाग बनली आहेत. जवळपास प्रत्येक चित्रपटात पंजाबी किंवा हिंदी-पंजाबी गाणे असते. हे इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेपेक्षा वेगळे आहे. पंजाबी गायक मुख्य प्रवाहातील चित्रपट गायक बनले आहेत.

एवढी लोकप्रियता का?

पंजाबी संगीताच्या प्रचंड लोकप्रियतेचे कारण म्हणजे त्याचे संगीत, बीट्स आणि रचना. या पैलूंमुळेच लोक या गाण्याचे बोल अर्धवट किंवा पूर्णपणे समजत नसतानाही या गाण्यांकडे आकर्षित होतात. एकंदरीत हे गाणे व्हाइबसाठी परिपूर्ण आहे. हीच गाणी बहुतेक क्लब आणि पार्ट्यांमध्ये अगदी पंजाबी नसलेल्या भागातही वाजवली जातात.

बहुतेक पंजाबी गाणी अत्यंत ग्रोव्ही आहेत आणि एखाद्याला गाणे समजले किंवा समजले नसतानाही आपली पावले त्या बीटस वर थिरकतात. त्याच्या यशाचे श्रेय दिले जाणारे दुसरे कारण म्हणजे पंजाबी आणि हिंदीमध्ये असलेले साम्य! फ्लाइंगपेपरच्या म्हणण्यानुसार , “पंजाबी गाणी भारतात तसेच परदेशात अत्यंत लोकप्रिय आणि मोठी हिट आहेत. ती त्यांच्या अद्वितीय सूर, तालबद्ध बीट्स आणि आकर्षक गायकीमुळे”.पंजाबी संगीताचा प्रचंड वाढ हा अनेक घटकांचा परिणाम आहे.

 

sauda im

 

पाश्चात्य संगीताचा प्रभावसुद्धा  पंजाबी संगीतावर आहे. पंजाबी संगीतात लाइव्ह परफॉर्मन्सची प्रदीर्घ परंपरा आहे. परदेशातील पंजाबी डायस्पोरा, आता डिजिटल वितरणामुळे जवळ आलेला आहे.

ही ऑनलाइन विक्री आणि लाइव्ह शोसाठी मोठी बाजारपेठ आहे. लंडन किंवा टोरंटो सारख्या शहरांमध्ये वाढलेल्या पंजाबी वंशाच्या उत्पादकांनी एक वेगळी गुणवत्ता आणि परत आणली आहे ज्यामुळे देखील पंजाबी संगीत हिट आहे.

१९०० आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात बहुतेक पंजाबी संगीतकार निर्माते एकतर परदेशात राहत होते किंवा परदेशातून परत आले होते. त्यानंतरही आणि आजपर्यंत बहुतांश पंजाबी संगीतकार आणि गायक अमेरिका, कॅनडा किंवा यूकेमध्ये राहत आहेत. त्यामुळे गाण्यांची निर्मिती देखील बाहेर करत असल्याने तेवढी अत्याधुनिक सामुग्री गाण्यात वापरली जाते. बालली सागू आणि हनी सिंगचा टप्पा कोण विसरू शकेल. जवळपास प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हनी सिंगची गाणी होती.

पंजाबी संगीताचा आवाज काळानुसार विकसित होत गेला. पूर्वी ते लोकसंगीत असायचे, नंतर ते ९० च्या दशकात दलेर मेहंदी आणि यासारख्या सोबत भांगड्याकडे वळले. मग आपल्याकडे ब्रिटीश-आशियाई संगीत म्हणून ओळखले जाणारे संगीत होते, ज्यामध्ये तलविंदर सिंग आणि बल्ली सागू सारख्या कलाकारांचा उदय झाला. आणि आता पंजाबी संगीत हिप-हॉप कडे वळले आहे.

 

daler im

आणि बी आर चोप्रांची “मी दूसरा रफी तयार करेन” शपथ हवेत विरून गेली…!

साहित्य आणि सिनेमा यांची सांगड घालणारे मराठीतले १२ उत्कृष्ट चित्रपट

बादशाह सारख्या कलाकारांचा आणि त्यांच्या प्लेलिस्टचा प्रचंड वापर होतो. नेहा कक्कर, दिलजीत दोसांझ, नेहा भसीन, बादशाह, गुरु रंधावा, बी प्राक, असीस कौर, हार्ड कौर हे काही लोकप्रिय गायक संगीतकार आहेत ज्यांना सध्या मागणी आहे.

लोक खरंतर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून पंजाबी संगीताची ओळख वाढवत आहेत, मग ते वर्कआउट असो किंवा ड्राईव्हसाठी. म्हणून जिथे तुमचा मूड सुधारण्याची गरज आहे, तिथे पंजाबी संगीत येते. हीच कारणे आहेत की पंजाबी संगीत हे आज अतिशय लोकप्रिय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?