Site icon InMarathi

काळजी घ्या! लॉकडाऊनमध्ये काम व आर्थिक व्यवहार घरूनच करणाऱ्यांसमोर एक मोठंच अदृश्य संकट उभं आहे…

data safety while online work and transactions inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे, कित्येक देश लॉकडाऊन मध्ये आहेत, तसेच भारत सुद्धा गेले २ महिन्यांपासून लॉकडाऊन मध्ये आहे!

संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, तसेच कित्येक नोकऱ्या सुद्धा धोक्यात आल्या आहेत!

आत्ता कोरोना आणि लॉकडाऊन मुळे काही वाटत नसलं तरी त्या नंतर हे आर्थिक संकट खूपच त्रासदायक ठरणार आहे! 

शिवाय देशातल्या वित्तीय संस्था तसेच पंतप्रधान सुद्धा सर्व नागरिकांना कॅशलेस व्यवहार करायचे आवाहन करत आहेत! याचे कारण एकच की हा कोरोना आणखीन पसरू नये म्हणूनच!

रोकड व्यवहारात तुमचा संपर्क कोरोनाबाधित व्यक्तीशी होऊ शकतो, त्यामुळे तो आणखीन पसरू शकतो आणि ते रोखता यावं आणि समाज संसर्ग होऊ नये म्हणून कॅशलेस व्यवहारांवर भर द्या!

 

the new daily

 

कोरोनामुळे आपण सगळेच तब्येतीची तर काळजी घेतच आहोत. पण, आपण हे विसरून चालणार नाहीये की, या काळात सायबर क्राईम मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

आपल्या नजरचुकीने आपण खूप ठिकाणी आपली माहिती जशी की इमेल ID, मोबाईल नंबर, आधार नंबर ही माहिती देत असतो आणि नंतर आपण ती विसरूनही जातो.

पण, सध्या एका सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे की , आपल्या या माहितीचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे.

ऑप्टिकल नेटवर्क नावाच्या संस्थेच्या पाहणी नुसार फेब्रुवारी २०२० पासून ६००% वाढ झाली आहे.

कोणताही आर्थिक व्यवहार करताना आपण या गोष्टी आवश्य लक्षात ठेवा:

 

१. इमेल ची सत्यता पडताळून बघा :

 

BBC

 

कधी कधी असं होतं की एखादा इमेल येतो.  WHO (world health organization) कडून आला आहे अशी हेडिंग येते आणि आपण त्यावर क्लिक करतो आणि तिथे पैशाची मदत करण्यासाठी एक लिंक असते.

आपण फक्त भावनेच्या भरात निर्णय न घेता पटकन गूगल वर जाऊन ही माहिती खरी आहे की नाही हे चेक करू शकतो आणि आपले पैसे चुकीच्या माणसाकडे जाण्यापासून रोखू शकतो.

आलेल्या इमेल मधील स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका दिसत आहेत का? हे लक्ष देऊन वाचा. जी लोक असे घोटाळे करणारे असतात ते बऱ्याच वेळेस अश्या चुका नक्की करतात.

कोणत्याही इमेल मध्ये जेव्हा तुम्हाला कोणती माहिती डाउनलोड करायला सांगितली जाते,

किंवा एखादी व्यक्तिगत माहिती विचारले जाते जी दिल्याने तुम्हाला कोरोना वायरस पासून सुटका मिळेल असा मजकूर असेल तेव्हा त्वरित त्या इमेल मधून बाहेर पडा.

कारण, कोणतीच संस्था किंवा सरकार असा कोणता इमेल कोणालाच कधीच पाठवत नाही. तेव्हा अश्या इमेल कायम सावध रहा.

 

२. VPN :

 

freepik

 

तुम्ही जर का कोणत्या संवेदनशील माहितीवर काम करत आहात तर तुमच्या लॅपटॉप वर VPN असणं आवश्यक आहे.

VPN म्हणजेच virtual private network हे तुमच्या नेटवर्क ला सुरक्षित ठेवण्यास मदत करत असते. तुमच्या घरातील नेटवर्क हे नेहमीच कंपनी च्या नेटवर्क पेक्षा जास्त सुरक्षित असते.

आजकाल जवळपास प्रत्येक कंपनी ही त्यांच्या VPN चा access तुम्हाला देत असते जेणेकरून तुम्ही घरून केलेलं काम सुद्धा सुरक्षित राहील.

जर का पर्याय उपलब्ध नसेल तर एखादं VPN विकत घेऊन तुमच्या लॅपटॉप वर install करावं लागेल आणि केलेलं कधीही चांगलं.

हे करताना मात्र फक्त स्वस्त VPN कडे आकर्षित न होता त्याची सत्यता, त्या कंपनीचा review तुम्ही गूगल वर चेक करू शकता. कारण, प्रत्येक VPN हे सारखेच नसतात.

 install केल्यानंतर कस्टमर सर्विस आहे की नाही ते सुद्धा आधीच तपासून बघा.

 

३. ऑनलाईन माहिती शोध :

 

threatpost

 

सध्या प्रत्येक जण हा गूगल वर येऊन कोरोना ची माहिती शोधत असतो. जे की अगदीच नैसर्गिक आहे.

यामुळे हॅकर सुद्धा कोरोना हे नाव किंवा याची अद्याक्षरं घेऊन आकर्षक जाहिराती बनवत आहेत. काही कोरोना बद्दल माहिती देणारी, तर काही उपाय सांगणारी तर काही कोरोना बाधित लोकांना मदत करणारी.

तुम्ही जर वारंवार कोरोना बद्दल माहिती शोधत असाल तर हॅकर तुम्हाला शोधून काढतीलच.

तेव्हा तुम्ही कोणत्याही वेबसाईट वर गेलात तरी त्यांच्या Contact Us या पेज वर जा आणि त्यांनी त्यांचा पत्ता वगैरे दिलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या.

ज्या वेबसाईट वर खूप जास्त पॉप अप प्रश्न किंवा जाहिराती येत असतील त्यांचा वापर टाळा. अश्या वेबसाईट्स तुमच्या नकळत लॅपटॉप वर एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतं.

 

४. वैयक्तिक माहिती :

 

SC magazine UK

 

तुम्ही जेव्हा ऑफिसचं काम घरी घेऊन येतात तेव्हा तुमची जी काही वैयक्तिक माहिती तुमच्या लॅपटॉप वर आहे त्या माहितीला लॉक करा.

ते फोल्डर उघडण्यासाठी एखादा security प्रश्न सेट करा ज्याचं की उत्तर फक्त तुम्हालाच माहीत आहे. तुमच्या पर्सनल इमेल आयडी चा सुद्धा पासवर्ड ठराविक अंतराने बदलत रहा.

ते पासवर्ड कायम असे ठेवा जे की कोणीच क्रॅक करू शकणार नाही आणि करायचा प्रयत्न केला तरी त्याला security प्रश्न आणि उत्तर केवळ तुम्ही लक्षात ठेवू शकतात असाच ठेवा.

ऑनलाईन गोष्टींमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत हे बरोबर आहे. पण, कायम सतर्क असणं हे सुदधा अत्यंत आवश्यक आहे.

अन्यथा, तुमचा किंवा तुमच्या कंपनी चा महत्वाचा डेटा अनावश्यक व्यक्तीच्या हातात जाणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version