ऋषी कपूरजींना ‘अमरत्व’ देणारे हे त्यांचे १० डायलॉग्स लोकांच्या सदैव लक्षात राहतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मागच्या वर्षी बॉलिवूडचा एक हरहुन्नरी कलाकार इरफान खान याच्या निधनाच्या बातमीतून जरा कुठे लोकं सावरत होते, तोच दुस-या दिवशी आणखीन एक बातमी आली आणि पुन्हा लोकांना एक झटका बसला!
लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी निधन झाले! ही बातमी आली आणि बॉलिवूड मधल्या कित्येक लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
ऋषी कपूर देखील कॅन्सर होता, त्यांनी सुद्धा परदेशी जाऊन ट्रीटमेंट घेऊन त्यावर मात केली होती, आणि त्यातून सावरणार इतक्यात फेब्रुवारी महिन्यात त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात आलं!
३० एप्रिल रोजी सकाळी रिलायन्स इथल्या हॉस्पिटल मध्ये निधन झालं!
त्यांच्या परिवरावरच नव्हे तर संपूर्ण सिने इंडस्ट्रीवर, तसेच त्यांच्या करोडो फॅन्सवर जणू शोककळाच पसरली आहे!
ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५४ मध्ये मुंबईतील चेंबुर येथे झाला, फिल्म इंडस्ट्री मधल्या एका मोठ्या घराण्यात म्हणजे ‘कपूर खानदानात’ त्यांचा जन्म झाला!
ऋषी कपूर यांचे वडील ग्रेट अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर, त्यांचे आजोबा म्हणजे एक अत्यंत हाडाचे कलाकार पृथ्वीराज कपूर! अशा दिग्गजांच्या सानिध्यात त्यांच्यावर सिनेमाचे संस्कार झाले!
सिनेसृष्टीतले एकेकाळचे स्टार शम्मी कपूर आणि शशी कपूर त्यांचे काका, त्यामुळे अभिनय सिनेमा हे रक्तातच होतं त्यांच्या!
अगदी बालकलाकारापासून आपली सुरुवात करणाऱ्या ऋषी कपूर यांनी त्यांच्या अभिनयातून लोकांच्या मनावर कित्येक वर्ष राज्य केलं!
ते ज्या काळात सिनेइंडस्ट्री मध्ये आले तेंव्हा अमिताभ बच्चन यांची आणि त्यांच्या इमेजचीच हवा सगळीकडे होती! पण तरीही या सगळ्याया तगड्या अभिनेत्यांना टक्कर देत ऋषी कपूर अगदी ठामपणे उभे होते!
त्यांच्या बॉबी, चाँदनी, प्रेम रोग, सागर, खेल खेल में, कर्ज, अमर अकबर अँथनी या सिनेमांपासून अगदी सध्याच्या हाऊसफूल, दो दुनि चार, हम तुम, अग्निपथ अशा सिनेमांपर्यंत त्यांनी आपलं मनोरंजन केलं!
अग्निपथ मध्ये त्यांनी साकारलेली निगेटिव्ह भूमिका ही लोकांनी खूप पसंत केली! त्यांचा तो रौफ लाला बघून आजही चीड येते इतकी ती भूमिका त्यांनी अप्रतिम वठवली!
–
हे ही वाचा – देवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली
–
सिनेइंडस्ट्री मधल्या प्रतिकूल वातावरणात तग धरून उभे असलेल्या ऋषी कपूर यांच्या सिनेमातले कित्येक डायलॉग्स आजही लोकांना माहीत असतील!
चला तर त्यांच्याच या सिनेमातल्या काही स्पेशल आणि लोकप्रिय डायलॉग्स ची उजळणी करून त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया!
१. हा डायलॉग यश चोप्रा यांचा शेवटचा सिनेमा जब तक है जान मधला आहे, त्यात त्यांनी आणि त्यांची पत्नी नितू कपूर हिने सुद्धा छोटीशी भूमिका केली होती,
आजही हा डायलॉग बरच काही सांगून जातो!
२. हा डायलॉग अर्जुन कपूर बरोबरच्या ‘औरंगजेब’ या सिनेमातला आहे, यात ऋषी कपूर यांनी एक अत्यंत वेगळीच भूमिका साकारली होती! जी बहुतेक प्रेक्षकांनी बघितली नाही!
३. हा डायलॉग प्रसिद्ध सिनेमा ‘लैला मजनू’ यातला असून यामध्ये ऋषी कपूर यांची अदाकारी प्रत्येकाने बघायलाच हवी!
४. ‘डी डे’ या सिनेमातला हा डायलॉग तर लाजवाबच! हा सिनेमा दाऊदला जीवंत पकडून आणायच्या मिशन वर आधारीत आहे ज्यात ऋषी कपूर यांनी दाऊद सारख्याच एका डॉनची भूमिका केली आहे!
ज्यासाठी त्यांची खूप स्तुति त्यांच्या चाहत्यांनी केली!
५. आलिया भट सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘कपूर अँड सन्स’ या सिनेमात ऋषी कपूर यांची एका म्हाताऱ्या आजोबांची भूमिका आजही सगळ्यांच्या लक्षात आहे!
६. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव आज कल’ या सिनेमातली ऋषी यांची भूमिका तर कुणीच विसरू शकत नाही!
दीपिका पडूकोण, सैफ अली खान या स्टार्स सोबत त्यांनी सुद्धा सिनेमावर एक वेगळीच छाप सोडली!
यातले डायलॉग आजही तुमच्या डोळ्यात पाणी आणतील!
७. यश चोप्रा यांच्या बहुचर्चित ‘चाँदनी’ सिनेमात तर ऋषी यांनी श्रीदेवी, वहिदा रहमान, विनोद खन्ना अशा दिग्गजांबरोबर काम केलं!
या लव्ह स्टोरी मधला हा डायलॉग खूपच गाजला!
८. ‘दामिनी’ या सिनेमाने लोकप्रियतेचा एक वेगळाच उच्चांक गाठला! हा सिनेमा यातले सनी देओल, अमरिश पुरी, मीनाक्षी यांचे संवाद लोकांना आजही तोंडपाठ आहेत!
पण यातली ऋषी कपूर यांनी साकारलेली शेखर ही भूमिका आणि ते डायलॉग आजही लोकांना चांगलेच लक्षात आहेत!
९. आयुष्मान खुराना आणि सोनम कपूर यांच्या ‘बेवकुफियां’ ह्या सिनेमात सुद्धा ऋषी कपूर यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असून,
त्यातला हा डायलॉग त्यांच्यातल्या तरुणपणाची जाणीव करून देतो!
१०. आणि आता या सिनेमाशिवाय तर लेख पूर्ण होऊच शकत नाही! कारण जोहर ने जुन्या अग्निपथ चा नव्याने रिमेक केला ज्यात प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, संजय दत्त सुद्धा होते!
त्यांच्याच जोडीला रौफ लाला नावाचं पात्र नव्याने लिहिलं गेल ते केवळ ऋषी कपूर यांच्यासाठी! आणि ते पात्र त्यांनी जे लीलया पेललं आहे ते बघताना आजही त्या पात्राची घृणा वाटते!
या सिनेमातला रौफ लाला हे पात्र आणि त्याचे संवाद आजही लोकांना प्रचंड आवडतात आणि चीड सुद्धा आणतात!
–
हे ही वाचा – सेलिब्रिटी मालदीवला निसर्ग सौंदर्यासाठी जात नाहीत! त्यामागे आहेत वेगळीच कारणं!
–
तर असा हा हरहुन्नरी अभिनेता आणि तितकाच मोठा स्टार आपल्याला सोडून गेला आहे! यावर पटकन विश्वासच बसत नाही!
आज ऋषी कपूर यांचे सिनेमे, त्यातला त्यांचा अभिनय, त्यांचे डान्स स्किल्स, त्यांचा सहज वावर, त्यांची ती लोकप्रिय गाणी लोकांच्या सदैव मनात राहतील!
आणि तसेच या दमदार सिनेमांच्या आणि त्यांच्या डायलॉगच्या माध्यमातून ऋषी कपूर हे सदैव प्रेक्षकांच्या मनात अमरच राहतील!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.