' ‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे! – InMarathi

‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सिनेइंडस्ट्री ही करोडो रुपयांची उलाढाल असलेली उद्योगव्यवस्था आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळातल्या लॉकडाऊन पिरियडमुळे ही इंडस्ट्री सर्वात जास्त धोक्यात आलेली आहे.

सिनेइंडस्ट्रीत लोकांचे करोडो रुपये एकेका सिनेमावर लागलेले असतात. सध्या अनेक चित्रपट जे प्रदर्शनाच्या तयारीत होते ते ठप्प पडून आहेत. अनेक सिनेमांची शूटींग्स थांबलेली आहेत.

त्यामुळे हजारो कामगारांचा रोजगार थांबलेला आहे. निर्मात्यांचे पैसे अडकून बसलेले आहेत. मोठमोठे बिझी स्टार्स घरात रिकामे बसून आहेत.

मागच्या महिन्यापर्यंत अनेक निर्माते आणि दिग्दर्शक एप्रिलपासून पडणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपले सिनेमे प्रदर्शित करण्याचे मनसुबे रचत होते. उत्साहात होते.

रोहीत शेट्टीचा ‘सुपर-कॉप युनिव्हर्स’ मधला अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ देखील बिग बजेट सिनेमा याच काळात प्रदर्शनाच्या वाटेवर होता.

 

sooryavasnhi inmarathi

 

थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे सिनेमेही प्रदर्शित होणं पुढे ढकलण्यात आलेलं आहे. बाकीचे व्यवसाय बंद असले, की त्यांची लाईट बिलं, भाडं हे तरी कमी होण्याची शक्यता असते.

मात्र सिनेव्यवसायात अमुक एका काळासाठी थिएटर्स भाड्याने घेतलेली असतात. त्यांचं भाडं तर वायाच गेलं. या भाडेभरपाईसाठी अनेक चित्रपटगृहाच्या मालकांनी सरकारकडे याचना केलेली आहे.

लॉकडाऊन काळ संपल्यावर लोक सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जातील का?

जरी लॉकडाऊन उठला तरी, सिनेमा किंवा नाटक थिएटर्स सध्यातरी लगेच सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.

कारण सोशल डिस्टन्सिंगची सवय लागलेली, आणि कोरोनासारख्या विषाणूच्या संसर्गाला घाबरलेली जनता आता तत्काल कितीशी सिनेगृहांत जाऊन सिनेमा, नाटकं बघायला तयार होईल ही शंकाच आहे.

 

people at pvr inmarathi
business today

 

तशी शक्यता दिसत नाही.

अनेक मोठ्या चित्रपटांचं प्रदर्शन या लॉकडाऊन काळामुळे रखडलेलं आहे आणि ते लॉकडाऊननंतर देखील लगेच होण्याची शक्यता दिसत नाही.

शिवाय सिनेमा प्रदर्शित करण्याआधी कमीत कमी दोन महिने तरी त्यांचे मार्केटींग, जाहीरातबाजी करावी लागते.

तोपर्यंत कदाचित लॉकडाऊनच्या जरा आधी प्रदर्शित झालेले बागी ३, अंग्रेजी मिडियम यासारखे सिनेमेच पुन्हा दाखवले जाण्याची शक्यता आहे.

पण दर्शक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला तयार होतील असं वाटत नाही आता. निदान एवढ्यात तरी.

काही चित्रपट आधीच डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी थिएटर व्यावसायिकांचं काही खरं दिसत नाही.

 

angrezi medium inmarathi
moviespie

 

लॉकडाऊन काळ नसता तर कोणते सिनेमे प्रदर्शित होणार होते?

सध्या मोठ्या चित्रपटांत सलमानखानचा राधे हा चित्रपट २२ मे ला इदीच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. त्या चित्रपटावर लोकांच्या आशा आहेत.

परंतु लॉकडाऊनचा पिरिअड अजून अनिश्चित असल्याने त्याचंही काही सांगता येत नाही.

अक्षयकुमारचा ‘सूर्यवशी” आणि रणवीर सिंगचा “८३” हे दोन सिनेमे यांचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी रोखून ठेवण्यात आलेलं आहे.

कबीर खानचा क्रिकेट वर्ल्ड-कपवर आधारित स्पोर्ट्स मुव्ही १० मार्चला प्रदर्शित होणार होता.

 

83 movie inmarathi
youtube

 

यात रणवीर सिंग आणि दिपिका पदुकोण ही वास्तव जीवनात देखील हीट ठरलेली जोडी स्टारकास्ट म्हणून आहे.

यु ट्यूबच्या चॅनेलवरून या सिनेमाबद्दल बोलताना कबीर खानने आपली निराशा बोलून दाखवली. तो म्हणतो,

“हा सिनेमा लोकांना दाखवण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक होतो. लॉकडाऊनचा हा काळ आमच्या उत्साहावर आणि अपेक्षांवर पाणी फिरवणारा आहे. परंतु सगळं जग जेव्हा या आणीबाणीच्या परिस्थितीतून जात आहे,

तेव्हा सिनेमा प्रदर्शन ही फार छोटी गोष्ट आहे आणि सिनेमा बघणं हे आजच्या घडीला लोकांना महत्त्वाचं नाही, असं मनाला समजावून आम्ही गप्प बसलो आहोत.”

कंगना राणावतच्या थलाईव्ही या सिनेमाचं शुटींग तामिळनाडूमध्ये सुरू होतं. ते देखील बंद करावं लागलं आहे. कंगना म्हणते,

‘आमचं तिथे ४५ दिवस शुटींग चालणार होतं. परंतु गर्दी न करण्याचा नियम आल्यावर आम्ही ते बंद केलं आणि मी लगेच मुंबईला निघून आले.”

 

thalaivi inmarathi
republic world

 

करण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.

करण म्हणतो, ‘आम्ही फ्लॉरेन्समध्ये एक भव्य राजवाडा उभा केला होता. आणि स्पेनमधील अलहम्ब्रा येथे शूटींग करणार होतो.

या सिनेमाची गेले दोन वर्षे तयारी करत होतो. परंतु आता ते सगळं बंद करावं लागणार आहे. त्याला इलाज नाही.”

सध्याच्या काळातील एक आघाडीचा निर्माता –दिग्दर्शक या नात्याने करणचे या वर्षी दोन चित्रपट रिलीज होणार होते आणि सात चित्रपट बनत होते. तो म्हणतोय,

“ही आमच्या धर्मा प्रॉडक्शनची कथा आहे. असं प्रत्येकच निर्माता-दिग्दर्शक आणि सिनेमा मेकर सध्याच्या काळात कमी अधिक प्रमाणात फसलेले आहेत.

 

takht inmarathi
filmibeat

 

आणि परिस्थिती पुन्हा पूर्ववत कधी होईल याची कुणालाच कल्पना नाही.”

दिपिका पदुकोण राजीव मसंद यांच्याशी संवाद साधताना म्हणते,

“नशीब माझं, मी तर लॉकडाऊनच्या जस्ट आधी शुटींगसाठी श्रीलंकेला जाणार होते. परंतु सुदैवाने ते तेव्हा रहीत झालं होतं. त्यामुळे आम्ही मुंबईतच राहिलो. अन्यथा कुठेतरी अडकून पडलो असतो.

अनेक लोकांच्या सिनेमांचे शुटींग अगदी संपत आले होते. ते सिनेमे पूर्ण होऊन प्रदर्शनासाठी पुढच्या तयारीत होते, ते देखील ठप्प झाले आहेत.”

शुजीत सरकारचा ‘गुलाबो-सिताबो’ हा चित्रपट देखील या महिन्यात १७ तारखेला प्रदर्शित होणार होता. मात्र त्यानंतर तो आॉनलाईन प्रदर्शित करण्यात आला.

आणि त्याचा दुसरा चित्रपट “सरदार उधम सिंग”चे शुटींग चालू होते. या सिनेमात विकी कौशलने काम केलं आहे.

 

ayushman khurana inmarathi
peepingmoon.com

 

लॉकडाऊनच्या या रिकाम्या वेळात सिनेस्टार्स काय करत आहेत?

बरेच सिनेस्टार्स खूप दिवसांनी इतका मोकळा वेळ मिळाला म्हणून आनंदात देखील आहेत. ते सोशल मिडियावर ऍक्टीव्ह झालेत. आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

आपण करत असलेल्या घरकामाचे व्हिडीओ टाकताना दिसत आहेत. कतरीना कैफ आणि दिपिका स्वयंपाक करतानाचे, भांडी घासतानाचे व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत!

शुजित सरकारला देखील पदार्थ बनवण्यात क्रिएटीविटी वाटतेय, तर आलिया भट आणि ऋतिक रोशन काहीतरी नवीन शिकताना दिसत आहेत.

इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओत फरहा खान वर्कआऊट, व्यायाम आदीचे व्हिडिओ टाकणाऱ्या स्टार्सना हे प्रकार न करण्याबाबत धमकावताना दिसत आहे.

 

farah khan inmarathi featured
catch news

 

काही स्टार मंडळी व्हिडीओ प्रसारीत करून त्यावरून लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

कार्तिक आर्यनने त्यासाठी आपल्या “प्यार का पंचनामा” या सिनेमातील संवादांची मदत घेऊन असे आवाहन केले आहे. त्याच्या या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिल्याचे कळतेय.

काही स्टार्स या काळात लोकांना मदत करतानाही दिसत आहेत. अक्षय कुमार आणि अनुष्का शर्मा यांनी पंतप्रधान फंडाला भरघोस मदत दिली आहे.

बाकीचे अनेकजण सिने इंडस्ट्रीतल्या निर्मात्यांनी सुरु केलेल्या फंडात मदत करत आहेत. या फंडातून सिनेसृष्टीतलेच तंत्रज्ञ, छोटेमोठे कलाकार, सहाय्यक इत्यादींना या काळात मदत केली जाणार आहे.

व्यवसाय तज्ज्ञ म्हणताहेत की रखडलेल्या सिनेमांचं भवितव्य अंधारात आहे.

मात्र कबीर खानसारखे अनेक लोक लवकरच सारं सुरळीत होईल आणि आपले सिनेमे पुन्हा त्याच दमाने थिएटरकडे लोकांना खेचून आणतील या आशेवर आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?