Site icon InMarathi

बाजारातून आणलेला किराणा-भाज्या स्वच्छ करण्यासाठी या टिप्स फॉलो करताय ना?

market inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

 

कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी हे संकट संपलेलं नाही. त्यामुळे आता जास्तीत जास्त संख्येने आपण घराबाहेर पडत असलो तरी काळजी घेणं बंधनकारक आहे.

रोजच्या गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी लोक बाजारात गर्दी करत आहेत. त्यामध्ये भाजीपाला, किराणा, औषधे, रोज लागणारे खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू येतात.

 

 

बाजारात फिरताना, वस्तु खरेदी करताना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. आपण आणलेल्या भाज्या, किराणा हे खरंच स्वच्छ असतं का? किराणा सामानाला, भाज्यांना कोणी कसले कसले हात लावले असतील, कोणी कसं हाताळलं असेल ते काय माहित!

 

 

मग आता हे भाजीपाला, किराणा स्वच्छ कसं करायचं? चला तर मग आज आपण ह्या लेखातून आपण किराणा आणि भाज्या कशा स्वच्छ करायच्या ते पाहूया!

शक्यतो, घरातल्या एकाच व्यक्तीने बाहेर पडायचं, तेव्हा बाहेर जाताना तोंडाला मास्क लावायचा, जवळ सॅनिटायझर, टिश्यु पेपर्स ठेवावे.

किराणा आणि भाज्या नीट वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवावेत आणि ४ ते ५ दिवसांचे किंवा शक्यतो आठवडाभराच्या भाज्या घेऊन याव्यात, सारखं सारखं बाहेर पडू नये.

शॉपिंग कार्ट, हॅंडल, जिथे जिथे हात लावणार असू तिकडे आधी स्वच्छ पुसून घ्यावे. नंतरही हात धुवून घ्यावेत स्वच्छ! आणि शक्यतो कॅशलेस व्यवहार करावेत.

 

घरी आल्यावर आधी हात पाय स्वच्छ धुवावेत, पिशव्या धुवाव्यात (डिस्पोजेबल असतील फ़ेकून द्याव्यात)..आता बघुया किराणा आणि भाज्या कसे स्वच्छ करावे ते!

१) किराणा सामान आपण साबणाने तर धुवून घेऊ शकत नाही पण, पाण्याने तर धुवून घेता येतं ना? मग ते पाण्याने धुवुन घेणे गरजेचे आहे,

वापरण्याच्या आधी तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ इत्यादी धुवून घ्यावे. (तसंही ते आपण धुवूनच घेतो पण, आता तर ते जास्त गरजेचे आहे).

आपण बाहेरून जे काही आणतोय ते संक्रमित असण्याची शक्यता आहे त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेण्याची गरज आहे. धुवून नंतर वाळवता येईल.

२) किराणा सामान धुवून आणि वाळवून झाल्यावर स्वच्छ धुतलेल्या, निर्जंतुक केलेल्या हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.

ते डबे स्वच्छ धुतल्यानंतर निर्जंतुक करणे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे ते स्वच्छ फडाक्याने पुसून घ्यावे.

३) किराणा सामान किंवा भाज्या धुण्याच्या आधी आपले हात २० ते ३० सेकंद धुवून घ्यावेत. लक्षात असू द्या वारंवार हात धुणे हे आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे.

 

 

४) प्रारंभिक माहितीवरून असे लक्षात आले आहे की कोरोना व्हायरस कार्डबोर्ड वर २४ तास आणि प्लास्टिक वर ७२ तास पर्यंत जीवंत राहू शकतात!

त्यामूळे ह्या वस्तू जर आणल्या तर तेव्हढा वेळ जाऊ द्यावा आणि मगच त्या वापराव्यात.

५) खाद्य वस्तूं मधून, पॅकेज्ड फूड मधून कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं ह्याचा ठोस पुरावा नाही पण ह्या व्हायरसचे संक्रमण कोणत्याही पद्धतीने रोखणे गरजेचं आहे.

त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचं आहे. (precaution is better than cure) शक्यतो सगळे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्याप्रमाणे सावधानता आणि स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.

 

६) भाज्या, फळे इत्यादी साबण किंवा डिटेर्जंट ने धुणे गरजेचं नाही पण गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. लिंबू, कोबी, फ्लॉवर, द्राक्ष, सफरचंद इत्यादी फळे आणि फळभाज्या गरम पाण्यात घालून ठेवाव्यात.

साधारण १० ते १५ मिनिटे गरम पाण्यात ठेवून नंतर पुन्हा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात.

७) आपण ज्या भांड्यात भाज्या गरम पाण्यात ठेवणार ते भांडेही स्वच्छ, निर्जंतुक करून घेतलेले हवे. जितकी स्वच्छता अधिक तितकी आपल्या निरोगीपणाची खात्री अधिक!

८) जिथे आपण किराणा ठेवणार ती जागा देखील स्वच्छ निर्जंतुक करून घेतलेली असावी. स्वच्छ असावी.

 

आपल्याला कोरोना व्हायरसला हरवायचंय! त्याची साखळी तोडायचीये. आपल्याला ह्या भयानक व्हायरसला रोखायचंय. त्याने घातलेलं मृत्युचं थैमान थांबवायचंय!

त्यासाठी आपल्याला जे जे शक्य आहे ते ते सर्व करायचं आहे. ही लढाई अदृश्य शत्रुशी आहे, त्याला हरवायचं तर स्वच्छता घ्यायलाच हवी.

ह्या अदृश्य शत्रुला स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सनेच हरवता येणार आहे. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी करणे, काळजी घेणे, स्वच्छता राखणे खूपच गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version