Site icon InMarathi

क्रिकेट म्हणजे अगदीच जवळचा विषय, मग या ६ अफलातून डॉक्युमेंट्रीज चुकवू नका!

best documentries inmarathi

the lallantop

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी काहींचे जग हे क्रिकेट भोवती फिरत असते.

इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाबाहेर तास-न-तास उभं राहून ‘काटे की टक्कर’वाल्या मॅचचा रोमांच अनुभवला आहे. क्रिकबझ आणि स्मार्टफोन नव्हते तेव्हा १००.७ फ्रिक्वेन्सी सेट करून कान लावून प्रत्येक बॉलची कॉमेंट्री ऐकली आहे.

 

 

या आशिकीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरी आहेत. कैक अशा घटना आहेत ज्या विसरणे अशक्य आहे. अजूनही लॉकडाऊनची स्थिती सुरूच असल्यामुळे, क्रिकेट खेळण्याची संधी मिळतेच असं नाही.

फारसं खेळायला मिळत नसेल, तरी हिरमुसून जाऊ नका! राहुल द्रविड जसा पिचवर नांगर टाकून भक्कम उभा राहतो, तसंच आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उभं राहायचं आहे.

 

 

या डॉक्युमेंट्रीज चुकवू नका. घरच्या घरीच उत्तम क्रिकेटचा अनुभव घेतल्याची अनुभूती नक्कीच मिळेल.

१.अ बॅट अँड बॉल वॉर (१९९९) : डायरेक्टर- टोनी डेव्हीस.

१९९८ मध्ये भारताने लाफिंग बुद्ध प्रोजेक्ट अंतर्गत राजस्थानच्या पोखरणमध्ये अणू चाचणी घडवून आणली. पाठोपाठ पाकिस्तानने सुद्धा यशस्वीपणे चाचणी घेतली.

त्यामुळे द्विपक्षीय राजनैतिक संबंध ताणले गेले होते.

याच दरम्यान भारत-पाक क्रिकेट सिरीजचं आयोजन जानेवारी १९९९ मध्ये केले गेले. याच सिरीजच्या काही महिन्यांनंतर कारगिल युद्ध सुरू झालं.

तर, १९९९ च्या जानेवारीमध्ये वसीम अक्रमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ भारतात आला. या पाकिस्तानी टीमला एक प्रोडक्शन टीम फॉलो करत असते. थेट त्यांच्या ड्रेसिंग रूम पर्यंत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक पाकिस्तान विरोधामुळे शिवसेना या सिरीजच्या आधीपासूनच विरोधात होती. सिरीजची दुसरी टेस्ट दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर होणार होती.

 

 

कोटलचे पिच या सिरीज विरोधात खोदले गेले. परिणामी चार शिवसैनिकांना अटक झाली.

हे एवढं पुरे नव्हते म्हणून की काय स्टेडियममध्ये परत साप सोडायची धमकी दिली गेली. तेव्हा पोलिसांनी या टेस्ट दरम्यान सर्प मित्रांची एक टीम पॅरलली स्टेडियम मध्ये खेळवलेली.

जे मॅच दरम्यान स्टेडियममध्ये साप शोधायचे काम करत असे.

याच दिल्ली टेस्टमध्ये अनिल कुंबळे ने १० चे १० विकेट घेत ही मॅच अजरामर केली.

 

 

१९९९ ची ही टेस्ट सिरीज राजनैतिक शत्रुत्व आणि क्रिकेटप्रेमींनी दाखवलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे प्रसिद्ध झाली. या सिरीजवर बनलेल्या या डॉक्युमेंटरीला संगीत नुसरत फतेह अली खान यांनी दिले आहे.

युट्युबवर ही सिरीज आपल्याला पाहायला मिळू शकेल.

२.फायर इन बेबीलोन (२०२०) : डायरेक्टर- स्टीव्हन रिले.

७०-८० च्या काळात आग ओकणाऱ्या गोलंदाजी तोफखाना खेळणाऱ्या वेस्ट इंडिज टीमच्या जडणघडणीवर ही डॉक्युमेंटरी आहे.

१९७४ ला क्लाइव्ह लॉइड यांच्याकडे विंडीज टीमचं नेतृत्व आलं. वेस्ट इंडिज चा संघ म्हणजे कॅरेबियन बेटांच्या वेगवेगळ्या समूहातून आलेले क्रिकेटपटू.

 

 

या विविधांगी खेळाडूंना एका साच्यात बांधायचे काम केले ते लॉइडने!

आणि बघता बघता १९७५ चा पहिला वर्ल्ड कप विंडीज ने लॉइडच्या नेतृत्वाखाली जिंकला.!

पण, १९७५ च्या अंती झालेल्या वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजमध्ये याच विश्वविजेता संघाला ५-१ अशा फरकाने सपाटून मार खावा लागला होता.

डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांच्या धारदार गोलंदाजीचे उत्तर विंडीज फलंदाजाकडे नव्हते.

या पराभवानंतर लॉइडची प्रतिक्रिया आली- “असं पुन्हा होणार नाही.!” आणि ज्या कारणामुळे आपला पराभव झाला त्यालाच आपले शस्त्र बनवायचे लॉइड यांनी ठरवले.

बॅटिंग लाईन तगडी होतीच आता त्यांनी गोलंदाजीला धार द्यायला सुरुवात केली.

आणि लॉइडच्या याच प्रयत्नांना यश येऊन निर्माण झाली जगातल्या प्रत्येक संघाला आपल्या वेगाने सळो की पळो करणारी विंडीजचा तोफखाना.

मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट, जोएल गोर्नर, कॉलीन क्रॉफ्ट यांना ‘खतरनाक चौकडी’ म्हणून क्रिकेट विश्वात संबोधले जाऊ लागले.

 

 

विंडीजच्या सुवर्ण पर्वाचा पाया रचला गेला. १९७६ ला हाच विंडीजचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला.

नुकताच ऑस्ट्रेलियाने विंडीजचा सुपडा साफ केलेला. टोनी ग्रेगने त्याच तोऱ्यात विंडीजची अवस्था करू अशी कमेंट केली.

आणि झालं विरुद्ध! लॉइडने आपल्या गोलंदाजीचा चेहरा मोहरा बदलेला. उंच आणि तेवढ्याच वेगवान चेंडूनी इंग्लिश फलंदाजांच्या तोंडाला फेस आणला.

विंडीजने सुरू केलेल्या या वेगवान क्रिकेटमुळे क्रिकेटचे नुकसान होईल अशी आरोळी ब्रिटिश मीडियाने ठोकली.

विंडीज गोलंदाजाना ‘टेररिस्ट’ म्हणून संबोधले जाऊ लागले.

 

 

ही डॉक्युमेंटरी त्या अजेय विंडीज संघाची कथा आहे, जिने १९८० ते १९९५ पर्यंत एकही टेस्ट सिरीज हरली नव्हती. या डॉक्युमेंटरीमध्ये काही रियल फुटेज आहेत.

त्या काळातल्या दिग्गज खेळाडूंच्या मुलाखती आहेत. ही डॉक्युमेंटरी सुद्धा युट्युबवर उपलब्ध आहे.

३.द  टेस्ट: अ न्यू एरा फॉर ऑस्ट्रेलियाज़ टीम (२०२०) : डायरेक्टर – एड्रीयन ब्राऊन.

 

 

मार्च २०१८. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीज. तिसऱ्या टेस्ट चा तिसरा दिवस.

ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरोन बँक्रोफ्ट बॉलवर पिवळा पेपर घासताना कॅमेरा मध्ये पकडला जातो. नव्या चेंडूवर तो पेपर घासून चेंडू जुना करण्याचा प्रयत्न तो करत होता.

क्रिकेटच्या कायद्याच्या भाषेत याला ‘बॉल टेम्परिंग’ म्हणतात.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत मोठा तमाशा उभा राहिला होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार आणि उपकर्णधार बदलले गेले.

स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमरोन बँक्रोफ्ट आपल्याच देशात व्हिलन झाले. बॉल टेम्परिंगच्या शिक्षेअंतर्गत तिघांवर निलंबनाची कारवाई झाली.

 

 

याच काळात जस्टीन लँगर ऑस्ट्रेलियन संघाचा कोच तर टीम पेन कर्णधार झाला.यांच्या खांद्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची जबाबदारी आली.

क्रिकेट जेवढं मैदानात खेळत जात त्याही पेक्षा मैदानाच्या बाहेर खेळेल जात. २०१९ चा वर्ल्ड कप येईपर्यंत तिन्ही खेळाडूंच निलंबन संपलं होत.

स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक धाव करण्याच्या यादीत भारताच्या रोहित शर्मा मागोमाग दुसरा होता. वर्ल्ड कपच्या दोन आठवड्यानंतर अँशेस होती.

अँशेसच्या सुरवातीला खेळाडू सोडा स्टेडियममध्ये सामना बघायला आलेले प्रेक्षक सुद्धा स्लेजिंग करत होते. या सगळ्या गोंधळात आपली छाप सोडली ती स्टीव्ह स्मिथने!

 

 

जवळपास संपूर्ण इंग्लंड स्टीव्ह स्मिथला बाद करायला नवीन नवीन पद्धत शोधत होते.

अमेझॉन प्राईमवर असलेली ही आठ एपिसोडची सिरीज सांगते, क्रिकेट खेळणारे खेळाडू सुद्धा आपल्यासारखेच हसतात, तणाव घेतात आणि रडतात सुद्धा.!

क्रिकेटचा मानवी चेहरा ही सिरीज उघड करते.

४.क्रिकेट फिव्हर- मुंबई इंडियन्स (२०१९)

सध्या मध्यावरच थांबलेली आयपीएल मिस करत आहात? थोडीफार कसर ही सिरीज भरून काढेल.

प्रोड्युसर- कोंडे नेस्ट इंटरटेनमेंट कंपनी. मुंबई इंडियन्स-आयपीएल मधली सगळ्यात महागडी आणि यशस्वी टीम.!

२०१८ च्या सिजन मधली मुंबई इंडियन्सची सफर या सिरीजमध्ये रेखाटली आहे.

 

 

वेगवेगळ्या वातावरण,संस्कृतीमधून आलेले खेळाडू एकमेकांशी ताळमेळ ठेवण्यात कसे धडपड करत असतात आणि तेच करता करता एक टीम म्हणून मैदानात खेळायला त्यांना सुख मिळत नाही.

फ्रॅंचाईज लीगमध्ये प्रयोग करायला अजिबात वेळ आणि परिस्थिती नसते. दुखापत ही खेळाडूला अजिबात परवडणारी नसते.

संघाच्या प्लेइंग ११ मध्ये असताना जर दुखापत झाली की संघातली जागा गमवण्याचे चान्सेस जास्त असतात.

२०१८ मध्ये मुंबई लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडलेली. २०१९ मध्ये जबरदस्त कमबॅक करत मुंबईने टायटल आपल्या नावावर केले होते.

 

 

नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेली ही सिरीज मुंबई इंडियन्सचा संघ म्हणून असलेला प्रवास खेळाडू,मॅनेजमेंट,फॅन यांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळेल.

५. आऊट ऑफ द अँशेस (२०१०) डायरेक्टर – टिमोथी अल्बोन, लूसी मार्टिन्स, लेजली नॉट

मराठीत सांगायचं झालं तर एकलकोंड्या परिस्थितीमधून बाहेरची कथा!

अफगाणिस्तान, अनेक दशके युद्धाने ग्रस्त. बॉम्बस्फोट,सुसाईड बॉम्बिंग,ड्रोनहल्ले हे इथल्या रोजच्या जीवनाचा अंग.अशातच या देशाने क्रिकेट मध्ये आपला आनंद शोधला.

आणि याच आनंदाच्या मागावर एक कॅमेरा क्रु सलग दोन वर्षे अफगाणिस्तानच्या क्रिकेट यात्रेवर होता.

 

 

ही डॉक्युमेंटरी अफगाणिस्तानची २०१० ची आयसीसी टी-२० चषक क्वालिफाय करायची कथा आहे. दहशतीने ग्रासलेल्या देशाला आनंद साजरा करायला कसा चान्स मिळाला.

अफगाणिस्तान क्रिकेटच्या उदयाची ही कहाणी आहे. जेव्हा खेळाडू आणि कोच ने एक स्वप्न पाहिल तेव्हा त्यांच्या कडे खेळायला स्वतःचे असे मैदान नव्हते.चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट्स इक्विपमेंट नव्हते.

पण, खेळायची जिद्द होती. सुविधा नव्हत्या पण त्याबद्दल तक्रारसुद्धा नव्हती.!

स्पर्धेनंतर जेव्हा अफगाणी क्रिकेट संघ मायदेशी परतला, तेव्हा काबूलच्या रस्त्यावर अफगाणी जनतेने एकच गर्दी केली होती. अफगाणिस्तानसाठी हा एक सुखाचा क्षण होता.

ही डॉक्युमेंटरी युट्युब वर आपण पाहू शकतो.

६.बॉडीलाईन- इट्स नॉट जस्ट या क्रिकेट. (२००२) : डायरेक्टर-लिंकन टेलर

१९३२-३३ मध्ये इंग्लंडचा संघ अँशेस खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली. ब्रिटिश कर्णधार होता डग्लस जॉर्डन तर ऑस्ट्रेलियाचा होता बिल वुडफॉल.

या सिरीजमध्ये सगळ्याच लक्ष होत २४ वर्षीय डोनाल्ड ब्रँडमन वर. १९३० च्या अँशेस मध्ये ब्रॅडमन ने विक्रमी ९७४ धावा ठोकलेल्या.

ही सिरीज ऑस्ट्रेलिया ने २-१ ने जिकलेली.

 

 

आणि याचा बदला घ्यायच्या इराद्याने इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला. ब्रॅडमनला रोखण्यासाठी ब्रिटिश तयारीत आलेले. दोन हत्यार सोबत आणलेले.

बिल वोक आणि हेराल्ड लारवूड.

या दोघांना सक्त ताकीद दिली गेलेली, बॅट्समनला निशाणा बनवून लेग साईडला बाऊन्सर फेकायचा. उसळता बॉल डॉच करायच्या प्रयत्नात बॅट्समन कट आणि आऊट होईल.

क्रिकेटच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये याला बॉडीलाईन बॉलिंग म्हणतात.

 

 

कांगारू यासाठी तयार नव्हते. आणि त्यांचे बरेचसे खेळाडू जखमी झाले. ब्रिटिशांवर जेंटलमेन्सचा खेळ कलंकित करण्याचा आरोप लागला.

वाद एवढा टोकाला पोहोचला की दोघा देशांच्या राजनैतिक संबंधावर पण त्याचा परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार बिल वुडफॉल एका खाजगी मीटिंगमध्ये म्हणाला,

‘इथे फक्त एकच संघ खेळत आहे,  आणि तो इंग्लंडचा संघ नव्हे.’

या वक्तव्यानंतर तर वेगळंचं वादळ उठलं. युट्युब वर उपलब्ध असलेली ही डॉक्युमेंटरी क्रिकेट आणि राजकारण यांचा एक संगम आहे.

क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात विवादित असलेल्या या सिरीजची कथा क्रिकेट प्रेमींसाठी नक्कीच रोचक असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version