Site icon InMarathi

सगळ्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या WHO ची “ही” आर्थिक गणितं माहितीयेत का?

trump and who inmarathi

Infot online

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाव्हायरस आल्यापासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO कडून दररोज कोरोनाविषयी अपडेट येत आहेत. कोरोनावर सध्या कोणताही इलाज नाही.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काय उपाय करायला हवेत याची माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटना दररोज देत असते.

या आजाराविषयी कशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्या का चुकीच्या आहेत त्याची माहिती देखील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देत असते.

 

 

तसेच जगभरात जे गरीब देश आहेत त्यांना आर्थिक मदतही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून होत असते. अशी बरीच मदत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन करीत आहे.

पण सध्या अमेरिका आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचं मात्र बिनसलेलं असून,

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला देण्यात येणारी आर्थिक मदत आता यापुढे होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

कारण त्यांच्या म्हणण्यानुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाच्या बाबतीत चीनला पाठीशी घातले आणि कोरोना या आजाराबद्दल जगालाच अंधारात ठेवले.

 

france 24

 

अमेरिकेने WHO ला मदत थांबवली असल्यामुळे आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडे येणारा पैसा, जमा होणारा फंड कमी होईल.

या बातम्या आपण वाचतोय, ऐकतोय. आणि मग प्रश्न पडतोय की की WHO काय आहे आणि त्यांच्याकडे इतका पैसा कुठून येतो?

डब्ल्यू एच ओ ची स्थापना सात एप्रिल १९४८ मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाली. सध्या डब्ल्यू एच ओ चं हेडक्वार्टर देखील जिनिव्हा येथेच आहे.

सध्या डब्ल्यू एच ओ चे १९४  देश सदस्य आहेत, पण त्याच्या स्थापनेच्या वेळेस ६१  देशांनी त्या राज्यघटनेवर सही केली आहे.

डब्ल्यू एच ओ सदस्य असणाऱ्या देशांमध्ये सध्या WHO चे १५० ऑफिस आहेत. आणि जगभरात सात हजार कर्मचारी काम करतात.

मुळात डब्ल्यू एच ओ हा युनायटेड नेशन चा एक भाग आहे.

 

linkedIn

 

आणि त्यांचं काम म्हणजे जगभरात ज्या काही आरोग्य समस्या निर्माण होतील त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्या समस्या कमी करण्यासाठी मदत करणे. “सगळ्यांसाठी चांगले आरोग्य” हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.

म्हणजे डब्ल्यूएचओ काम काय आहे, तर संपूर्ण जगात सगळ्या देशांचा हेल्थ रिपोर्ट तयार करणे, वारंवार निराळ्या आजारांबाबत सर्वे घेणे.

WHO ची प्राथमिकता ही influenza वर जास्त आहे कारण दरवर्षी त्यामुळे अनेक मृत्यू होतात. दुसरा संसर्गजन्य आजार म्हणजे HIV!

आणि संसर्गजन्य नसलेले आजार म्हणजे कॅन्सर, हृदयविकार, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, लहान मुलांचे लसीकरण, कुपोषण यासारख्या गोष्टींवर यात लक्ष देऊन त्या कमीत कमी त्रासदायक होतील हे पाहणे.

तसेच वेगवेगळ्या आरोग्यविषयक सर्वे करणे.

 

biospectrum asia

 

सध्या covid-19 चा जगभर जो प्रकोप झाला आहे त्याच्याशी लढण्यासाठी, त्यावर उपाययोजना करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सध्या रात्रंदिवस काम करत आहे.

आता अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिली जाणारी मदत, चीन बाबत पक्षपात केला म्हणून थांबवली आहे. अमेरिकेने सध्याचे फंडिंग का बंद केले आहे?

सध्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष टेड्रोस अंधानोम गाबरेस हे आफ्रिकन आहेत. चीनच्या प्रयत्नांमुळेच ते WHO चे अध्यक्ष बनले.

चीनने कोरोनाव्हायरस संदर्भात केलेल्या कामाचे कौतुक अध्यक्षांनी केलं, ज्याला अमेरिकेने विरोध दर्शवला आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार कोरोना संदर्भात माहिती जगाला सांगण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चीनवर दबाव आणला असता, तर आज अमेरिकेतले इतके नागरिक मृत्यूमुखी पडले नसते.

आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोणाची लागण झाली नसती. याबाबतीत डब्ल्यू एच ने पक्षपात केला म्हणून आता त्यांची मदत थांबवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

 

aaj tak

 

मग प्रश्न येतो की WHO ला ही मदत कुठून मिळते.? दरवर्षी ही मदत किती मिळते?

डब्ल्यू एच ओ ला दोन प्रकारे मदत मिळते

 

१. डब्ल्यू एच ओ चे सदस्य असणाऱ्या देशांकडून

डब्ल्यू एच ओ चे सदस्य असणारे देश डब्ल्यू एच ओ ला आर्थिक मदत करतात. पण ही मदत, त्या देशाची आर्थिक परिस्थिती, लोकसंख्या यांच्यावर ठरलेली असते.

याचा अर्थ ज्या देशाची आर्थिक परिस्थिती जास्त चांगली आहे अशा देशांकडून जास्त मदत घेतली जाते. मग अशी ही मदत अशी सगळ्यात जास्त कुणाकडून येईल तर अमेरिकेकडून.

कारण अमेरिकाच सध्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्र गणलं जातं. अमेरिकेकडून डब्ल्यू एच ओ ला दरवर्षी चारशे दशलक्ष डॉलर इतकी मदत मिळते.

म्हणजेच डब्ल्यूएचओच्या अर्थसंकल्पापैकी पंधरा टक्के रक्कम ही अमेरिकेकडून येते.

 

the new york times

 

अमेरिकेच्या खालोखाल दुसरी सगळ्यात जास्त मदत मिळते ती बिल आणि मिलींडा गेट फाउंडेशन यांच्याकडून.

२०१८-१९ या वर्षांमध्ये डब्ल्यू एच ओ च्या अर्थसंकल्पाच्या ९.८ टक्के मदत गेट फाउंडेशन कडून मिळाली. डब्ल्यू एच ओ कडे सगळ्यात जास्त पैसा अशा श्रीमंत देशांकडूनच येतो.

चीनकडून देखील WHO ला 86 दशलक्ष डॉलर मदत मिळते.

 

२. ऐच्छिक योगदान

डब्ल्यू एच ओ ला दुसरी जी आर्थिक मदत मिळते ती ऐच्छिक स्वरूपात असते.

मोठ-मोठ्या इंस्टिट्यूशन्स कंपन्या, याशिवाय डब्ल्यू चे सदस्य असलेले देश, या शिवाय मदत देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून आर्थिक मदत मिळते.

ही मदत एका विशिष्ट कामाकरता गोष्टी करिता डब्ल्यू एच ओ खर्च करीत असते. २०१६-१७  मध्ये ८० % फंड हा ऐच्छिक मदतीचा होता.

२०१८-१९ मध्ये बिल आणि मिलिंदा गेट फाउंडेशन यांच्याकडून ४५ % फंड मिळाला.

 

CNBC.com

 

तर जर्मनीकडून १२ %, युनायटेड किंगडम कडून ७ टक्के आणि जपान व साऊथ कोरिया यांच्याकडून प्रत्येकी सहा टक्के फंड यावर्षी जमा झाला होता.

जर २०१८ – १९ या वर्षाचा विचार करायचा झाला तर डब्ल्यू चो कडे यावर्षी एकूण २७४४ दशलक्ष डॉलर जमा झाले. त्यापैकी ५०१ एक दशलक्ष डॉलर एकट्या अमेरिकेने दिले होते!

तर उरलेले २२४३ दशलक्ष डॉलरची ऐच्छिक स्वरूपात मदत मिळाली होती. याचा अर्थ असा आहे की अमेरिका हा डब्ल्यू एच ओ चा सगळ्यात मोठा दाता आहे.

आता कोरोनाव्हायरसच्या लढ्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मार्च महिन्यात ६७५ दशलक्ष डॉलर इतकी मदत मागितली आहे.

तर कोरोनासाठीच आणखीन एक अब्ज डॉलरची गरज पुढील काळासाठी लागू शकते, असंही ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलं आहे.

अमेरिकेकडून येणारा फंड मोठा असून, जर आता अमेरिकेने मदत थांबवली तर कोरोनाविरुद्धच्या युद्धात थोडी अडचण निर्माण होऊ शकते.

म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की,”डब्ल्यूएचओला निधी कपात करण्याची आता ही वेळ नाही.”

 

wall street journal

 

ते म्हणाले, “ह्या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजुटीने काम केले पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेला पाठिंबा दिलाच पाहिजे, कारण covid-19 च्या विरोधात युद्ध जिंकण्यासाठी जगाच्या प्रयत्नांसाठी हे अत्यंत जरुरीचे आहे.”

चीन आता थोडी मदत वाढवून देणार आहे तसंच बिल आणि मिलिंडा गेट फाउंडेशन हेदेखील मदत करणार आहेत. तसेच अन्य देश देखील WHO ला मदत वाढवत आहेत.

युकेने WHO साठी ६५ दशलक्ष डॉलर एवढी मदत करायचे असे ठरवले असून,

साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना २०० दशलक्ष डॉलर इतका निधी देण्याचे ठरवले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version