व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरात असलेलं Zoom App खरंच धोकादायक आहे का? वाचा, विश्वासार्ह माहिती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोनाव्हायरस आला आणि ह्या व्हायरसने जग अक्षरशः ठप्प केलं. लोकांना घरी बसायला भाग पाडलं त्यामुळे कामकाज थांबलं. पण हे असं किती दिवस चालणार?
मोठे प्रोजेक्ट चालू ठेवणं भाग होतं, विशेषतः आयटी इंडस्ट्रीला आपलं कामकाज थांबवणं शक्य नव्हतं, म्हणून मग लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देण्यात आला.
लोक घरातून काम करायला लागले. परंतु काही काही गोष्टी या टीमने मिळून, चर्चा करून करायच्या असतात. अशा वेळेस मग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कंपन्यांमध्ये व्हायचं.
पण आता घरी राहील्यावर असं कॉन्फरन्सिंग करणे कसं शक्य आहे? यासाठीही धाऊन आलं ते तंत्रज्ञानच. झूम नावाच्या एका अॅपने लोकांची ही गरज भागवली.
तसं आधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग साठी स्काइप वापरलं जायचं, म्हणजे अजूनही वापरलं जातं, पण सध्या चलती आहे ती झुम ॲपची.
एकतर वापरायला सोपा आणि कमी पैशात, मोबाईल मध्ये देखील सहज उपलब्ध होणारं हे ॲप असल्यामुळे बऱ्याच कंपन्यांच्या मीटिंग्ज यावरती सुरू झाल्या, लोक ऑनलाईन क्लासेस घ्यायला लागले.
यामध्ये शाळा-कॉलेजेस ही मागे नाहीत, नातेवाईक एकमेकांशी या ॲपवरून बोलायला लागले.
अचानक बातमी आली की, झूम ॲप हे सुरक्षित आणि विश्वासार्ह नाहीये त्यामुळे ते ॲप लोकांनी वापरू नये. झूम अॅपवर सायबर अटॅक होण्याची शक्यता असून महत्त्वाची माहिती चोरीला जाऊ शकते.
या कारणास्तव भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने झूम ॲप वर होणाऱ्या सरकारी मिटिंग्ज वर बंदी घातली आहे. आणि मग झूम ॲप हा चर्चेचा विषय झाला आहे.
आता झूम ॲप वापरावा की नाही याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
भारत सरकारने झूम ॲपवर बंदी का आणली? झूम ॲप मधल्या त्रुटी काय आहेत?
झूम ॲप ला end to end encryption नाही. हा याचा सगळ्यात मोठा तोटा आहे. यामुळे हॅकिंगची शक्यता वाढते.
जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या मीटिंगचा दहा आकडी कोड माहीत असेल तर अशी एखादी आगंतुक व्यक्ती मीटिंग अटेंड करू शकते.
जर एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असलेली फाईल मीटिंगमध्ये शेअर केली गेली, तर तो डेटा चोरीला जाऊ शकतो.
झूम वरचे व्हिडिओ कॉल प्रत्येक मेंबरला रेकॉर्ड करता येतात आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. तसंच झूमच्या सर्वरवर असणारं व्हिडिओ रेकॉर्डिंग कोणीही हॅक करू शकतो..
झूम कॉल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती इंटरनेटवर सहज पसरले जाते आणि त्या व्यक्तींना ॲडव्हर्टायझिंगचा त्रास वाढू शकतो.
गृहमंत्रालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत त्यानुसार सरकारी मीटिंग झूम ॲपवर होणार नाहीत. कारण इथला पण डेटा चोरीला जाऊ शकतो.
सरकारच्या महत्त्वाच्या गोष्टींवर या बाबतीत धोका निर्माण होऊ शकतो. अशी घटना ब्रिटनच्या कॅबिनेटमध्ये घडलेली आहे. तिथे कॅबिनेटची एक मिटिंग झाली, थोड्याच वेळात ती इंटरनेटवर अपलोड झाली.
म्हणूनच या ॲपची सुरक्षितता धोक्यात आली आहे असं म्हटलं जातं.
सध्या बऱ्याच देशांमध्ये झूम ॲप वापरण्यावर बंदी आली आहे. सिंगापूरमध्ये हा अँप वापरण्यावर बंदी आली कारण ऑनलाइन क्लास चालू असताना तिकडे अश्लील व्हिडिओ पाहिले गेले.
अमेरिकेत देखील देखील या ॲप वर बंदी आली आहे कारण युजरचा वेबकॅम हॅक करता येऊ शकतो. म्हणून झूम ॲपवर तिथे कोर्टात केस सुरु आहे.
गुगल, स्पॅसएक्स याबरोबरच जर्मनी,ऑस्ट्रेलिया, तैवान यासारख्या देशानेही झूम ॲपवर बंदी आणली आहे.
एरिक यूआन या चिनी अमेरिकन तरुणाने हे ॲप विकसित केलं आहे. तोच या कंपनीचा सीईओ देखील आहे. कॅलिफोर्नियामध्ये त्याने स्वतःची कंपनी काढली आहे.
सध्या अॅप बद्दल ज्या तक्रारी वाढल्या आहेत त्याबद्दल एरिकने माफी मागितली आहे, आणि येत्या तीन महिन्यातच या सगळ्या त्रुटी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.
आता जर झूम ॲपच्या या त्रुटी असतील तर, तशा सगळ्याच ॲपमध्ये काहीना काही त्रुटी जरूर आहेत. इंटरनेटवर जर एकदा तुमची माहिती गेली तर त्यात यात खाजगी असे काहीच राहत नाही.
पण म्हणून आपण इंटरनेट वापरणे सोडत नाही. फेसबुक, ट्विटर, इन्स्टा या सगळ्यांना आपली वैयक्तिक माहिती हवी असते.
अगदी इतर कोणतेही अॅप जर तुम्ही डाऊनलोड केलं तरी आपल्या मोबाईल मधील फोन नंबर, मेसेजेस कुठून येतात त्यांची माहिती देणेसुद्धा हे ॲप आपल्याला एक्सेप्ट करायला सांगतात, त्यानंतरच तो ॲप डाउनलोड होतो.
आपल्या ई-मेल अकाउंट ला देखील आपली सगळी माहिती असते. म्हणूनच आपल्याला नको असलेल्या एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातींच्या इ-मेल्स देखील आपल्याला येत राहतात.
जे उत्पादन आपल्याला कधी माहीतही नसतं त्याही ईमेल आपल्याला येत राहतात.
म्हणूनच जेव्हा झूम ॲप वापरू नका असं सरकार सांगत आहे त्याच वेळेस वापरत असाल तर काय काळजी घ्यावी हे ही सांगत आहे. आणि सध्या तर लॉक डाऊनच्या काळात झूम सारख्या ॲपची गरजही निर्माण झाली आहे.
झूम ॲप वापरताना घ्यावयाची काळजी
प्रत्येक मीटिंग च्या वेळेस नवीन यूजर आयडी आणि पासवर्ड वापरणे.
मीटिंग मधील सगळे signed मेंबर आल्यावर इतर कुठल्याही नवीन मेंबरला मॅनेज पार्टीसीपेंट हे ऑप्शन वापरून एन्ट्री ब्लॉक करणे.
स्क्रीन शेअरिंग ऑप्शन फक्त होस्टने वापरणे.
फाईल ट्रान्सफरचं ऑप्शन शक्यतो टाळणे.
आता नवीन सिक्युरिटी टॅब आले असून आता यूजर आणि पार्टीसिपेंट याचा वापर करू शकतात.
वेटिंग रूम हे फिचर वापरून नवीन मेंबरला एंट्री देता येईल.
नवनवीन तंत्रज्ञान माणसाच्या आयुष्यात येत आहे, फक्त ते कसं वापरायचं हे ठरवता आलं पाहिजे. योग्य ती पुरेशी काळजी घेतली तर अवघड काहीच असणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.